Author: bittambatami.com

बीओबी टेबल टेनिस स्पर्धेत मिथुन, सुभ्रदिता विजेते

मुंबई: बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय टेबल टेनिस संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये मिथुन निमसटकरने पुरुष गटाचे तर सुभ्रदिता कर्माकरने महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. तोडीस तोड खेळ करीत रंगलेल्या अंतिम सामन्यात अखेर…

आयुक्तांच्या घराभोवती खड्ड्यांचे साम्राज्य

 केडीएमसी प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप कल्याण : कल्याण-बिवली महानगरपालिका  क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांची डोकेदुखी वाढवली असून, आता मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत मार्गापर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे…

६७ महिन्यांपासून वेतन थकीत, कर्मचाऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू!

 केशव बनसोडे यांच्या मृत्यूची चौकशी करून कुटुंबीयांना थकीत वेतन व आर्थिक मदत द्या — डॉ. डी. एल. कराड अनिल ठाणेकर ठाणे-जालना जिल्ह्यातील आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी केशव…

अजित पवार गटाला धक्का

ठाण्यातील युवक पदाधिकाऱ्यांचा डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटात प्रवेश अनिल ठाणेकर ठाणे- ठाण्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागली आहे. अजित पवार गटातील ओवळा – माजीवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख  आणि ब्लाॅक अध्यक्ष गोश्फाक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस,  आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेला अनुसरून आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व स्वीकारून मोठ्याप्रमाणात युवक पक्ष प्रवेश करू लागले आहेत. आज युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवा नेते वीरू वाघमारे यांच्या पुढाकाराने अजित पवार गटातील ओवळा – माजीवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख  आणि ब्लाॅक अध्यक्ष गोश्फाक शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माथाडी सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, ओबीसी सेलच्या महिलाध्यक्ष मनिषा पाटील, बिपीन गेहलोत आदी उपस्थित होते.

३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- महापौर शर्मिला पिंपळोलकर

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टिझर अनावरण सोहळयास अभिनेते आदिनाथ कोठारे, निलेश साबळे यांची उपस्थिती संपदा सावंत ठाणे (२४) :  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार, ३० ऑगस्ट रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. ‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये २५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दिपक जाधव,  शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते (श.प)अभिजीत पवार, नगरसेवक बाबाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त १ मनिष जोशी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, अभिनेते व निर्माता मंगेश देसाई आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टिझरचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते, अभिनेते नीलेश साबळे व आदीनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट व मॅरेथॉनच्या सन्मानचिन्हांचे अनावरण करण्यात आले. मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही २१ किलोमीटर पुरुष व महिला, १८ वर्षांवरील पुरुष १० किलोमीटर आणि १८ वर्षांवरील महिला १० किलोमीटर या प्रमुख गटांसाठी टाइम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. २१ किलोमीटर पुरुष व महिला गटातील स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन पुन्हा महापालिका भवन येथेच समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम क्रमांकाला १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला ५० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकाला ३० हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकाला २० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय इतर आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. १८ वर्षांवरील महिलांसाठी १० किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ १० हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. १८ वर्षांवरील पुरुषांची १० किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन मिलेनियम टोयोटा येथे समाप्त होईल. या गटासाठीही प्रथम २५ हजार, द्वितीय २० हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ १० हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. १५ वर्षांवरील मुले-मुलींसाठी ५ किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन ते माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक या मार्गावर होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ८ हजार, द्वितीय ५ हजार, तृतीय ५ हजार ५००, चतुर्थ ५ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ४ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ३ किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम ५ हजार ५००, द्वितीय ५ हजार, तृतीय ४ हजार ५००, चतुर्थ ३ हजार ५०० आणि पाचव्या क्रमांकासाठी ३ हजार रुपयांचे पारितोषिक आहे. शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. ६० वर्षांवरील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी १ किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महापालिका भवन येथून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांत ३ किलोमीटरची स्पर्धा होणार आहे. महापालिका भवन येथून सुरू होऊन याच ठिकाणी या स्पर्धेचा समारोप होईल. या गटातील विजेत्यांना प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ‘रन फॉर फन’ ही १ किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. विजेत्यांना प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्पर्धक विजेता ठरला तरी पारितोषिकाची संख्या आणि रक्कम समान राहणार आहे. मॅरेथॉनमध्ये २५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याने स्पर्धा मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. धावपटूंना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच होत असलेल्या या महापौर वर्षा मॅरेथॉनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ठाणेकरांनी या मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता शहराच्या क्रीडा संस्कृतीचा उत्सव म्हणून सहभागी व्हावे. शालेय विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने धावून मॅरेथॉनचा उत्साह वाढवावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.

प्रतीतीची एकहाती आघाडी तर मयांकचे वर्चस्व कायम

आशियाई कनिष्ठ क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा मुंबई, २४ ऑगस्ट: मुंबईतील आयटीसी मराठा शेरेटन येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ मुलींच्या क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत, अव्वल मानांकित डब्ल्यूएफएम प्रतीती बोरदोलोई हिने सातव्या फेरीत डब्ल्यूसीएम…

२९ ऑगस्टला “मैत्री”  संकल्पनेवर साकारणार मंगळागौर २०२६ स्पर्धा !

 विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व परिषा प्रताप सरनाईक यांचा अभिनव मंगळागौर उपक्रम अनिल ठाणेकर ठाणे- विहंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि परिषा प्रताप सरनाईक यांच्या वतीने, दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रावण महिन्यानिमित्ताने ठाण्यासह ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २९ ऑगस्ट , दुपारी ३ वाजता, आयलीफ रिट्झ बँक्वेट हॉल, आर मॉल, ३ रा मजला, घोडबंदर रोड, ठाणे  येथे हा पारंपरिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी सोहळा उत्साहात पार पडणार आहे. विहंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे नेहमीच कॅन्सर जनजागृती उपक्रम राबविले जातात, त्यापैकी एक उपक्रम म्हणजे “मंगळागौर”. दरवर्षी नव्या आणि वेगळ्या संकल्पनांवर आधारित मंगळागौर सादरीकरण पाहायला मिळते. मागील वर्षी “ऐतिहासिक रणरागिणींचा सन्मान” ही संकल्पना होती. यंदा “मैत्री” ही संकल्पना घेऊन विविध महिला संघ आपले  सादरीकरण करणार आहेत. मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, पारंपारिक खेळ तर जपले जातात त्याचबरोबर महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सर संदर्भात देखील जनजागृती केली जाते. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय, प्रार्थनास्थळे यांच्या आजूबाजूला पानटपऱ्या, हातगाड्या मधून पान-गुटखा, ड्रग्स, चायनीस पदार्थ विकले जात असून त्यातून नवीन पिढी आहारी जाऊन त्याच्या आरोग्याला घातक ठरत आहे. आपण आपल्या मुलांना कोणत्या गोष्टींचे ज्ञान दिले पाहिजे व कोणत्या गोष्टीपासून दूर ठेवावे याबाबत पालकांनी व समाजाने जागृत असले पाहिजे यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने मंगळागौर हे एक उत्तम माध्यम आहे असे नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक महिलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्थानिक महिला ह्या काही उच्चभ्रू समाजात राहतात, काही चाळीमध्ये राहतात, काही आदीवासी महिला आहेत, काही घरकाम करणाऱ्या आहेत तर काही महिला उच्च शिक्षित असून एकत्र स्पर्धेत भाग घेतात ही एक कौतुकाची गोष्ट आहे. हे सादरीकरणं पारंपरिक पद्धतीने किंवा आधुनिक (Fusion) शैलीने सादर होणार आहे. ही मंगळागौर स्पर्धा सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरणार आहे. त्याप्रमाणे पारंपारिक व आधुनिक (फ्युजन) कॅटेगिरीला प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक रु. २१,०००/-, द्वितीय पारितोषिक रु. १५,०००/-, तृतीय पारितोषिक रु. १०,०००/- तसेच सर्व ग्रुपमधून ज्या ग्रुपने वेगळे सादरीकरण केले असेल त्या ग्रुपला “सुपरस्टार-२०२६” म्हणून जम्बो  बक्षिस म्हणून रु. २५,०००/- चे पारितोषिक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान स्पर्धक महिलांसोबत उपस्थित प्रेक्षकांसाठीही विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे सहभागाच्या आनंदात भर पडेल. ठाणे व परिसरातील प्रेक्षकांनी उपस्थित राहून महाराष्ट्रातील या अनोख्या परंपरेचा हा उत्सव अनुभवावा, असे आवाहन विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा, नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 0000000

 दिवा शहरात ठाकरेंच्या शिवसेनेत युवकांचा भव्य पक्षप्रवेश

– जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न  दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, उपशहर प्रमुख मारुती पडळकर, विभाग प्रमुख योगेश निकम यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश दिवा, दि.24 ऑगस्ट : शिवसेना (उद्धव…

भारतम्’ सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीच्या विविधतेचे दर्शन

गाझियाबाद : राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद येथील हिंदी भवनमध्ये एमपी फाउंडेशनच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ‘भारतम्’ आयोजित करण्यात आला. भारतीय कला, संगीत, नृत्य आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचे एकाच व्यासपीठावर…

सिंधुदुर्ग पुन्हा ‘शिवसेनामय’ करू

 उद्धव ठाकरे -आदित्य ठाकरे लवकरच कोकण दौरा करणार…! – सुभाष देसाई चर्चा केली सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )–धुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख…