Author: bittambatami.com

राजस्थान महिला समितीतर्फे काजली महोत्सव साजरा

कल्याण : राजस्थान महिला समितीतर्फे काजली महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित हा कार्यक्रम राजस्थानी संस्कृती आणि वातावरणाशी एकरूप होऊन मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख…

पेन्शन दुरुस्तीसाठी मुंबईत विशाल प्रदर्शन

रमेश औताडे मुंबई : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या विचारार्थ अटी व शर्तींमध्ये १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन दुरुस्तीचा समावेश न केल्याने, देशभरातील केंद्र सरकारी पेन्शनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याविरोधात ‘रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन’ व ‘नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशन’  च्या वतीने २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  येथील मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयावर विशाल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे पेन्शन अधिनियम प्रमाणीकरण कानून तात्काळ रद्द करण्याची, आठव्या वेतन आयोगाच्या (विचारार्थ अटी) मध्ये सुधारणा करण्याची, १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर्सच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची, ५० टक्के मूळ वेतन व पेन्शनमध्ये समाविष्ट करण्याची आणि २५ टक्के अंतरिम मदत त्वरित देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या सर्व विभागांतील रेल्वे पेन्शनर्ससह केंद्र सरकारी पेन्शनधारकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जोनल अध्यक्ष एन. हरिदासन, जोनल कार्याध्यक्ष  अरविंद माने आणि जोनल महामंत्री आर. के. सारस्वत यांनी केले आहे. 0000

मुंबईतील आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीत घसरण

– प्रजा फाउंडेशन कडून मुंबईतील आमदारांचा लेखाजोखा रमेश औताडे मुंबई : मुंबईतील आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीचे धक्कादायक चित्र प्रजा फाउंडेशनच्या ‘मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड २०२६’ अहवालातून समोर आले आहे. १५ व्या विधानसभेतील मुंबईच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या १२व्या विधानसभेच्या तुलनेत तब्बल ७२ टक्क्यांनी घटली असून, प्रश्नांची गुणवत्ताही ५० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर घसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याच्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रजा फाउंडेशनने मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला. हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीतील मुंबईतून निवडून आलेल्या ३३ आमदारांच्या कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले आहे. आमदारांचा सभागृहातील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न, प्रश्नांची गुणवत्ता आणि नागरिकांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व या बाबींचा अहवालात आढावा घेण्यात आला आहे. अहवालानुसार, १५व्या विधानसभेत एकूण २,२१३ प्रश्न विचारण्यात आले. याउलट १२व्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन २००९ ते पावसाळी अधिवेशन २०१० या कालावधीत ७,९५५ प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजेच प्रश्न विचारण्याचे प्रमाण तब्बल ७२ टक्क्यांनी कमी झाले आहे. याचबरोबर आमदारांच्या कामगिरीचे सरासरी गुणही कमी झाले आहेत. १२व्या विधानसभेत मुंबईतील आमदारांची सरासरी ६१ गुण होती. ती १४व्या विधानसभेत ५४ पर्यंत घसरली आणि १५व्या विधानसभेत किंचित वाढून ५५ झाली. मात्र, प्रश्नांच्या गुणवत्तेची सरासरी १२व्या विधानसभेतील ५० टक्क्यांवरून १५व्या विधानसभेत केवळ ३३ टक्क्यांवर आली आहे. 00000

तिसऱ्या मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईचा अशोक शर्मा व पारस विजेते

चिंचवड ( पुणे)  येथील एस अरेना येथे शीख हेल्पलाइन फाऊंडेशन आणि हंड्रेड मास्टर्स बॅडमिंटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात समारोप झाला. स्पर्धेच्या…

– मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून रुग्णांना दिलासा

– पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत अशोक गायकवाड मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग तसेच मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात झालेला सामंजस्य करार आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होत असून त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला. करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना एकूण ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. या कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर व गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. याच धर्तीवर इतर नामांकित संस्थांसोबतही सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर अधिकाधिक रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. 00000

 रायगड क्रॉसर्सच्या मोठ्या विजयात सलमान शेख चमकला

 बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग मुंबई, २४ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर हायस्कूलच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई लेगमध्ये सोमवारी १३ वर्षांखालील मुलांच्या…

एसएसईआय बुद्धिबळ स्पर्धेत दृष्टीदोष असलेल्या ६० खेळाडूंचा सहभाग

– शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या ३ऱ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजन कल्याण : वडाळा येथील शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटने आपल्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात दृष्टिहीन खेळाडूंसाठी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेने केली. हा कार्यक्रम ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड आणि ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत ३० विशेष बुद्धिबळ पटांवर एकूण ६० खेळाडूंनी सहभाग घेतला. अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केवळ वैद्यकीय उपचारांपलीकडे जाऊन पुनर्वसन, आत्मविश्वास वाढवणे आणि स्वावलंबी जीवन जगण्यास सक्षम करणे, या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब या उपक्रमात दिसून आले. या स्पर्धेने दृष्टिहीन खेळाडूंना – ज्यामध्ये एसएसईआयच्या पुनर्वसन आणि कमी दृष्टी सेवांमधील रुग्णांचाही समावेश होता अशांना एकत्र आणले आणि त्यांना त्यांचे बुद्धिबळातील कौशल्य, आत्मविश्वास तसेच जिद्द प्रदर्शित करण्यासाठी एक सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.  यात १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला; यापैकी काही खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील होते आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.

 कल्याणमध्ये पुन्हा कुत्र्यांची दहशत

 चिमुकल्याच्या हाताचा खोलवर चावा कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात पाळीव कुत्र्याने एका चिमुकल्यावर केलेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साई शरण इमारतीत घडलेल्या या घटनेत कुत्र्याने चिमुकल्याच्या हाताचा जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात त्याच्या हाताला खोलवर जखम झाली असून, जखम एवढी गंभीर होती की हाताचे मांस बाहेर आले. हल्ल्याची संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला इमारतीच्या परिसरात असताना अचानक पाळीव कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या हाताला जोरदार चावा घेतल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरातील नागरिकांनी पाळीव कुत्रे पाळताना आवश्यक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते का, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी लहान मुले व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी संबंधितांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने समोर येत असताना प्रशासनाने केवळ घटना घडल्यानंतर कारवाई न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

– ठाण्याच्या राजाने रचला इतिहास, सरावादरम्यान उभारले ९ थर

ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपखाडी, नामदेववाडी नाका येथे तब्बल ९ थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचला. गेल्या अनेक वर्षांपासून सरावाच्या ठिकाणी…