Category: होम

अखिल भारतीय आमंत्रितांच्या बॅडमिंटन स्पर्धेत’ ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचचे खेळाडू चमकले !

जोसेफ दिलराज आणि अक्षीत जोडीचे पुरुष दुहेरीत दिमाखदार विजेतेपद” ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध राज्यांमधील अनेक खेळाडू गेली काही वर्ष प्रगत बॅडमिंटनचे धडे गिरवीत आहेत यातीलच केरळ राज्यातील खेळाडूंनी ठाण्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे . केरळ राज्यातील बॅडमिंटन विश्वात अत्यंत प्रतिष्ठेची आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘अखिल भारतीय आमंत्रितांच्या बॅडमिंटन टूर्नामेंट’ स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या जोसेफ दिलराज याने अक्षीतसोबत पुरुष दुहेरी गटात शानदार विजेतेपद पटकावत ठाण्याच्या क्रीडा विश्वाचा लौकिक पुन्हा एकदा उंचावला. २४ मे २०२६ रोजी केरळमधील त्रिशूर येथील भव्य हायलाईट मॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल आणि निमंत्रित अशा केवळ ८ पुरुष दुहेरी जोड्यांचा सहभाग होता. संपूर्ण केरळ राज्यातील बॅडमिंटनप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच अत्यंत वेगवान, आक्रमक आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले. हायलाईट मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी प्रत्येक सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धेचे वातावरण अधिक रंगतदार बनवले. देशातील नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला विशेष ग्लॅमर आणि प्रतिष्ठा लाभली होती. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत सराव करणारा जोसेफ दिलराज हा ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू असून, मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली  मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुळे, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर आणि देवांग दलाल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराज्य स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात जोसेफ आणि अक्षीत या जोडीने उत्कृष्ट समन्वय, आक्रमक स्मॅशेस आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी जोड्यांवर वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यातही त्यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि वेगवान खेळ करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या खेळातील सातत्य, कोर्ट कव्हरेज आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता विशेष उठून दिसली. आपल्या बॅडमिंटन कारकिर्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या ध्येयाने जोसेफ दिलराज याने स्वतःचे संपूर्ण आयुष्य ठाण्यात स्थायिक करत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले आहे. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाच्या जोरावर त्याने अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमधील आधुनिक प्रशिक्षण सुविधा, स्पर्धात्मक वातावरण आणि प्रशिक्षकांचे बारकाईने केलेले मार्गदर्शन यामुळे अनेक खेळाडूंप्रमाणेच जोसेफचाही खेळ अधिक परिपक्व आणि आक्रमक होताना दिसत आहे. राज्यापासून राष्ट्रीय आणि आता आंतरराज्य स्पर्धांमध्येही अकॅडमीचे खेळाडू सातत्याने यश मिळवत ठाणे शहराच्या क्रीडा परंपरेला नवी उंची देत आहेत. जोसेफ दिलराजच्या या उल्लेखनीय विजेतेपदाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी विशेष आनंद व्यक्त करत, “मोठ्या स्पर्धांमध्ये दबावाखाली खेळण्याची जोसेफची क्षमता आणि त्याची खेळाप्रती असलेली निष्ठा त्याला आगामी काळात आणखी मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी जोसेफ, त्याच्या सहकाऱ्यांचे आणि संपूर्ण प्रशिक्षक वर्गाचे अभिनंदन करत, ठाणे बॅडमिंटन अकॅडमी राज्याबरोबरच देशातील बॅडमिंटन क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करत असल्याचे गौरवोद्गार काढले.

जुहू येथील शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई (अशोक गायकवाड मुंबई -जुहू येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणावर शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे ७० अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे निष्कासित करण्यात आली. यामध्ये अंदाजे ८ हजार चौ. फूट शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. ही कारवाई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच अपर जिल्हाधिकारी(अतिक्रमण/निष्कासन) पश्चिम उपनगर गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), बांद्रा वैशाली परदेशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कारवाईत महानगरपालिका व पोलीस विभागाचे अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईमुळे शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त होऊन ती शासनाच्या ताब्यात आली आहे. लवकरच या जमिनीस संरक्षण भिंत बांधली जाणार आहे.

एसएसटी महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात आणखी एक झेप

अमेरिकेच्या युडॉक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ‘टेक्नोव्हा २.०’ यशस्वी कल्याण : एसएसटी महाविद्यालय आणि अमेरिकेतील युडॉक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिषद ‘टेक्नोव्हा २.० – २०२६’ यशस्वीरीत्या…

मृत्यूशी झुंज देणाऱ्या बिबट्याला जीवनदान

 वन विभागाची थरारक मोहीम यशस्वी!” ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली वनपरिक्षेत्रातील येऊर नियंत्रण क्षेत्रात जखमी अवस्थेत झाडावर बसलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचावमोहीम राबवत यशस्वी सुटका केली. गंभीर जखमी आणि अशक्त झालेल्या या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पाचपाखाडी (इंदिरानगर)  राखीव वन क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ५२० मध्ये ३० मे रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एका झाडावर जखमी बिबट्या बसल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वन विभाग, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ, WWA आणि RAWW संस्थांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या गंभीर जखमी असल्याने त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे दिसून आले. रात्रीच्या अंधारात बचावकार्य धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने वन विभागाने संपूर्ण रात्र परिसरावर कडेकोट नजर ठेवली. अखेर रविवारी सकाळी सहा वाजता शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी बिबट्या मूळ ठिकाणापासून सुमारे ७० ते ८० मीटर अंतर चालत जाऊन झाडीत पडल्याचे आढळले. वन्यजीव अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि बचाव पथकाच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन जेरबंद करण्यात आले. प्राथमिक तपासणीत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चारही पायांच्या तळव्यांना गंभीर जखमा असून मागील पायावरील मोठ्या जखमेमुळे हाड उघडे पडल्याचे दिसून आले. तसेच शरीरावर अनेक ओरखडे आणि जखमांचे व्रण आढळले. उपचारासाठी या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील बिबट्या बचाव केंद्रात हलविण्यात आले असून त्याच्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. वन विभाग, बचाव पथक आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयामुळे एका  वन्यजीवाचा जीव वाचविण्यात यश आल्याने या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कोट बिबट्याच्या शरीरावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे पकडून तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. बचाव पथकाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी झाली असून बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मयूर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक

: अजितदादा नंतर अहिल्यादेवींचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभ – सुनेत्रा पवार मुंबई : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा…

अखेर साक्षीचा शोध लागला; १००० सीसीटीव्ही तपासून मुंब्रा- दिवा पोलिसांना यश

आरती परब दिवा : दिवा परिसरातून हरवलेल्या ८ वर्षीय साक्षी विजयकुमार पांडे हिचा अखेर सुखरूप शोध लागल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण दिवा शहराने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंब्रा- दिवा पोलीस स्टेशनच्या पथकाने सलग दोन ते तीन दिवस अहोरात्र मेहनत घेत तब्बल १००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून ही यशस्वी शोधमोहीम पूर्ण केली. मुलगी हरवल्याची माहिती समोर येताच दिवा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने तातडीने विशेष पथके तयार करून दिवा ते बदलापूर परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू केली. विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी कसून प्रयत्न केले. या मोहिमेत दिवा शहरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून माहिती प्रसारित करून मुलीचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस- रात्र तपास सुरू ठेवत प्रत्येक धागा तपासला. अखेर अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि साक्षी पांडे हिचा सुखरूप शोध लागला. मुलगी सुरक्षितपणे सापडल्यानंतर कुटुंबीयांसह नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. या यशस्वी शोधमोहीमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, अमोल कोळेकर, रोहित केदार, तेजस सावंत, गणेश जाधव, विनायक माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा तसेच दिवा आणि मुंब्रा पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने मोलाची भूमिका बजावली. पोलिसांच्या तत्परतेमुळे, नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि सातत्यपूर्ण तपासामुळे एका चिमुकलीला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यश आल्याने पोलिस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १ जूनला ‘स्वर संध्या’

सारेगमप लिटल चॅम्प फेम अंजली गायकवाड व ज्ञानेश्वरी गाडगे यांचे सुमधुर गायन पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”,…

माहिती फलक न लावल्यास होणार कारवाई

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा बाजार समित्यांना इशारा हरिभाऊ लाखे नाशिक : कांद्यासाठी १,५८० रुपये क्विंटलचा दर निश्चित झाल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्रांबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली जात नसल्याची बाब समोर येत असून, त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक नाफेडच्या खरेदी केंद्रासह बाजार समितीने कांदा खरेदी केंद्राची योग्य माहिती देणारा फलक, त्यावरच कांद्याचा दर आणि खरेदी केंद्राकडे जाणारे फलक दर्शनी भागात लावावेत, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. कांद्याच्या मागील महिन्यात गडगडलेल्या भावामुळे बळीराजाला मोठा फटका बसला. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलनेही झाली. त्याचे सर्वाधिक पडसाद नाशिक, लासलगाव, निफाडमध्ये उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यात येऊन आंदोलन केले. त्यानंतर शासनाने दखल घेत, कांद्याला १,५८० रुपयांचा दर निश्चित करीत नाफेडद्वारे त्याची खरेदीही सुरू केली. अशातच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही त्यातील बारीकसारीक बाबी शोधून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली. त्यात प्राधान्याने नाफेडचे केंद्र तसेच बाजार समितीत कांदा खरेदी केंद्र कुठे आहे, याची माहितीच शेतकऱ्यांना दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर आता जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रत्येक खरेदी केंद्राकडे जाणारा मार्ग दर्शविण्याचे, स्पष्ट फलक अन् त्यावर कांद्याच्या दरांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. पथके कांद्याच्या लागवडीपासून, साठवणूक व माहिती, विक्रीतील घोळ, घोटाळा अन् फसवणूक यावर नियंत्रणासाठी आता कृषी, पणन आणि महसूल विभागाचे एकत्रित पथक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तालुका स्तरावर कार्यरत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली कुठलीही अडचण, समस्या या पथकांकडे मांडावी. त्यावर त्यांना योग्य तो सल्ला अन् मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. 0000000000

हेडलाईटच्या प्रकाशावरून वाद, तरुणावर जीवघेणा हल्ला

कल्याण  : कल्याण पुर्वेतील  कोळसेवाडी परिसरात मोटारसायकलच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यांत पडल्याच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद हिंसक वळणावर गेला. तिघा तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना…