Category: होम

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

कल्याण : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका सचिव किशोर शेळके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या…

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कृपाआशीर्वादाने विनापरवाना कामे पूर्णत्वाकडे !

मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानला सध्याच्या घडीला नगरपालिकेत ताळमेळ दिसत नसल्याने गावात कोणकोणती कामे सुरू केली आहेत त्याबाबत ठावठिकाणा दिसून येत नाही. तर दुसरीकडे विनापरवाना कामांना ऊत आल्याचे देखील पहावयास मिळत आहे. आणि या विनापरवाना कामांना अप्रत्यक्षपणे काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभत असल्याने या कामांवर आक्षेप घेतला तरीसुद्धा अशाप्रकारची कामे युद्धपातळीवर सुरूच आहेत.यामागे मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाले असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे. माथेरान मध्ये जानेवारी महिन्यापासून बेबी डिसोझा मार्गावर विनापरवाना जांभ्या दगडातील रस्त्याचे काम सुरू होत असल्याने नगरपालिका विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे तूर्तास हे काम बंद करण्यात आले होते.सर्व साहित्य नगरपरिषदेने जप्त सुध्दा केले होते. परंतु सद्यस्थितीत आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे. प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे की अशा विनापरवाना कामांना आर्थिक लोभापायी  अप्रत्यक्षपणे पाठींबा देत आहेत असा प्रश्न स्थानिकांना सतावत आहे. नियमबाह्य कामांना सध्याच्या काळात प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधी हातभार लावत असून एकीकडे अतिक्रमणवर कारवाईचा दिखावा तर दुसरीकडे विनापरवाना रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत.काही सर्वसामान्य स्थानिक  लोकांना घराच्या दुरुस्ती साठी लागणारे साहित्य आणण्यासाठी बंदी घालण्यात येते आणि दुसरीकडे धनाढ्य लोकांना बंगल्याच्या कामासाठी लागणारे साहित्य आणण्यास मुभा दिली जात आहे.यामुळे नागरिक द्विधामनःस्थितीत सापडले आहेत.आणि विशेष म्हणजे ज्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी याच बेबी डिसोझा मार्गासाठी आकांडतांडव केले होते तीच मंडळी आता मूग गिळून गप्प का बसले आहेत ?की त्यांनीही आपला आर्थिक कार्यभाग अपेक्षेप्रमाणे साधला आहे की काय ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.या कामांशी निगडीत काही अधिकारी वर्गाने तर स्वतःचे आर्थिक दृष्ट्या चांगभलं करून नुकताच अन्य ठिकाणी बदल्या सुध्दा करून घेतल्या आहेत अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे. 000000

अभय मोकाशी शेवटपर्यंत लढत राहिले; ७० दिवस अन्न-पाण्याविना कर्करोगाशी झुंज

वडील बंधू संदेश मोकाशी यांनी कथन केली अंगावर शहारे आणणारी हकीकत मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ झुंझार पत्रकार अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ उत्तर…

 हसत खेळत निवृत्त झाले ‘खेळिराम’- अवकीरकर आणि मुंगेकर यांना दिला टपाल खात्याने निरोप

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय टपाल खात्याच्या बोरीवली पूर्व येथील कार्यालयात सुमारे ३५ वर्षे सेवा बजावणारे खेळिराम अवकीरकर आणि तीस वर्षे सेवा केलेले प्रसाद मुंगेकर हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त…

‘विषारी दारू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्या’

मृत कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे पुणे : फुगेवाडी व हडपसर परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींना कठोरातील कठोर…

– आदिवासी पाड्यांवर भीषण पाणीटंचाई

 श्रमजीवी संघटनेचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा मिरा -भाईंदर : मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासी पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ‘श्रमजीवी संघटने’च्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. मिरा -भाईंदर महापालिका क्षेत्रातील जीवित्त्व नगर, केसरी पाडा, शेंबाड पाडा, वाड्याचा पाडा, शक्ती नगर, चवलीपाडा, मरगळीपाडा आणि केळीचा पाडा या आदिवासी पाड्यांमधील नागरिक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहेत. शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असतानाही, येथील नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्‌मैल पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना नाले आणि खड्ड्यांमधील दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव संघटनेने निवेदनात मांडले आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत जल योजने’द्वारे प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मीरा-भाईंदरमधील २१ आदिवासी गावांमधील नागरिकांनी ७५३ अर्ज सादर केले आहेत. मात्र, प्रशासनाकडून या अर्जांवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यापूर्वीही अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप करत संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्या १. २१ आदिवासी पाड्यांमधील ७५३ अर्जदारांना तातडीने वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात यावे. २. ज्या आदिवासी पाड्यांवर तीव्र पाणीटंचाई आहे, तिथे तातडीने पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने पूर्तता न केल्यास ‘श्रमजीवी संघटना’ तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

प्रताप सरनाईक यांनी जिंकली प्रवाशांची मने

एसटीच्या उपहारगृहात मंत्र्यांची साधी-सरळ भेट अशोक गायकवाड संगमेश्वर : एसटी बसस्थानक म्हटले की अनेकांच्या मनात अस्वच्छता, गर्दी, कळमळट वातावरण आणि उपहारगृहांबाबतच्या तक्रारींचे चित्र उभे राहते. मात्र संगमेश्वर बसस्थानकात शुक्रवारी रात्री घडलेले दृश्य या सर्व समजुतींना छेद देणारे ठरले. कारण महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी चक्क प्रवाशांसोबत बसून एसटीच्या कॅन्टीनमधील गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला. कोकण दौऱ्यावर असलेल्या मंत्री सरनाईक यांनी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर बसस्थानकाला भेट दिली. नव्याने उभारलेल्या या आधुनिक बसस्थानकात संध्याकाळीही प्रवाशांची मोठी वर्दळ होती. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपलब्ध सुविधांबाबत आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी करून स्वच्छता व व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. स्वच्छ, टापटीप आणि प्रसन्न वातावरणाने नटलेल्या या बसस्थानकाची पाहणी करत असताना त्यांची पावले नकळत एसटीच्या उपहारगृहाकडे वळली. उपहारगृहात अनेक प्रवासी गरमागरम भजी, वडापाव, चहा आणि कॉफीचा आनंद घेत होते. त्या सुगंधाने आणि प्रसन्न वातावरणाने मंत्रिमहोदयांनाही मोह आवरला नाही. त्यांनी थेट प्रवाशांमध्ये जाऊन बसत गरमागरम वडापाव आणि कॉफीची चव चाखली. एका मंत्र्याने कोणताही बडेजाव न करता सर्वसामान्य प्रवाशांसोबत बसून एसटीच्या कॅन्टीनमधील पदार्थांचा आस्वाद घेणे, हा अनुभव उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. क्षणभर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. राज्याचे परिवहन मंत्री आपल्या शेजारी बसून गप्पा मारत वडापाव खात आहेत, हे दृश्य पाहून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी झळकत होता. संगमेश्वर बसस्थानकातील हा प्रसंग केवळ एका पाहणी दौऱ्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर एसटीच्या बदलत्या चेहऱ्याचे आणि प्रवाशांशी जपल्या जाणाऱ्या आत्मीय नात्याचे प्रतीक ठरले. स्वच्छता, सुविधा आणि गुणवत्तेचा संदेश देणाऱ्या या भेटीने लालपरीच्या सेवेत होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनाची जिवंत साक्षच प्रवाशांना अनुभवायला मिळाली.

महिला स्वसंरक्षणाच्या उपक्रमाची मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार दखल

 भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला विश्वास कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३४ व्या भागाचे सामूहिक श्रवण रविवारी कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा परिसरात उत्साहात पार पडले. भाजप नगरसेविका हेमलता पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठीत सामाजिक संस्थांच्या प्रमुख, सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार आणि नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम झाल्यानंतर भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपला संकल्प व्यक्त केला. गेल्या वर्षीच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सुरू केलेल्या महिला स्वसंरक्षणाच्या लाठी-काठी प्रशिक्षण उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये दखल घेतील असा विश्वास यावेळी भाजप नेते नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमामध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तींना केले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्यासह प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय कल्याण केंद्राच्या प्रमुख अलका दीदी, श्री संत गजानन शेगांव भक्त मंडळ कल्याण विश्वस्त गणेश खैरनार, नितिन चौधरी, मयुरेश आगलावे, रवी गुप्ता, शत्रुघ्न भोईर, डॉ.सुनिल हरपाले, ॲड.समृद्ध ताडमारे, रोहीत लांबतुरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवादातून देशातील सकारात्मक बदल, सामाजिक उपक्रम, क्रीडा क्षेत्रातील यश तसेच पर्यावरण संवर्धन यावर भर दिला. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करत पारंपरिक भारतीय पेयांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. आंबा पन्हे, ताक, सोलकढी, कोकम सरबत यांसारखी पारंपरिक पेये शरीरासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरबाडकरांवर अन्याय, काँक्रीट रस्ता झाला, आता टोलचा भुर्दंड!

राजीव चंदने मुरबाड : सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू असलेले कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र रस्ता पूर्ण होताच या मार्गावर टोल वसुली सुरू होणार असल्याने मुरबाडकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस, काळी-पिवळी टॅक्सी, व खाजगी खासगी चारचाकी वाहनांसह सर्वच वाहनांना टोल भरावा लागणार आहे. यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या सर्वच वाहनांचे भाडे वाढणार असून त्याचा थेट आर्थिक फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “वास्तविक रस्त्याच्या कामाचे संपूर्ण देयक ठेकेदाराला अदा करण्यात आलेले असताना पुन्हा जनतेकडून टोल वसूल करणे अन्यायकारक आहे. काँक्रीटचा रस्ता करून सामान्य जनतेचे हित नेमके काय साधले, हेच कळत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मुरबाड तालुक्यातील नागरिकांना या टोलमधून पूर्णपणे मुक्त करावे,” अशी ठाम मागणी रमेश हिंदुराव यांनी केली आहे. तसेच हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येत या अन्यायाविरोधात लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. काँक्रीट रस्त्यामुळे प्रवास सुखकर होईल हे खरे, पण त्यासाठी रोजच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असेल तर हा विकास कुणासाठी, असा प्रश्न आता मुरबाडकर विचारत आहेत.

डोंबिवलीतील रेल्वे ग्राऊंड वाचवण्यासाठी भाजप-शिवसेनेचे आंदोलन

आरती परब डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मुला-मुलींसाठी आणि खेळाडूंसाठी महत्त्वाचे मानले जाणारे रेल्वे ग्राऊंड वाचवण्यासाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून मैदानाच्या काही भागात बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक खेळाडू आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डोंबिवली पश्चिमेतील मोठ्या मैदानांपैकी एक असलेल्या या रेल्वे ग्राऊंडवर दररोज शेकडो युवक-युवती विविध खेळांचा सराव करतात. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावित बांधकामामुळे मैदानाची जागा कमी होऊन खेळाडूंना अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज रेल्वे मैदानात स्थानिक तरुण, खेळाडू आणि नागरिकांसह भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत मैदानावरील बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा होईपर्यंत कोणतेही काम सुरू करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. आंदोलनानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीपर्यंत काम स्थगित ठेवण्याचे मान्य केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. त्यामुळे डोंबिवलीतील खेळाडूंना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी तसेच शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैदानाच्या संरक्षणासाठी पुढील काळातही लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.