Category: होम

 कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे धुमशान

 ओढे नाले तुडुंब, नद्यांनी धोक्याची पातळी ओलंडली    कल्याण : कल्याण तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाच्या धुवाधार बँटिग मुळे ओढे, नाले, तुडुंब झाले. तर उल्हास, काळू, भातसा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सखल भागात पाणी शिरले. कल्याण तालुक्यातील टिटवाळा, खडवली, वाळकस, म्हारळ, वरप,कांबा, रूंदे,नडगाव आदी ग्रामीण परिसरात गत दोन दिवसापासून पावसाचे धुमशान पाहता नाले, ओढे, तुडुंब भरून वाहत होते. तर नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलंडल्याने ग्रामीण परिसरातीलसखल भागात पाणी शिरल्याने जन जीवन विस्कळीत झाले. काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कल्याण तालुक्यातील रुंदे पूल,भातसानदीवरील वाळकस पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. तर खडवली भातसा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जु गावाला पुराचा पाण्याचा वेढा वाढत असल्याने ज्युगावाकडे जाणारा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. उल्हासनदीची धोक्याची पातळीपाहता रायते जुना पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. बल्याणी ते टिटवाळा रस्ता दरम्यान रस्ता खचल्याने रस्त्यावर मोठे भगदाडपडले, या संदर्भात स्थानिक माजी नगरसेवक यांनी यासंदर्भात प्रशासनानेरस्त्या दुरूस्ती संदर्भात पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केले. आता तरीप्रशासनाने लक्ष देऊन संदर्भीत रस्त्याची दुरूस्ती करावी, असे संपर्कसाधला असता सांगितले., तर मोहिली पाणीपुरवठा केंद्र पाण्याखाली गेल्याने केडीएमसी पाणीपुरवठा वितरण व्यवस्थावर यांचा फटका बसल्याने अ, ब, प्रभागासहटिटवाळा, परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. तर जु गावाला पाण्याचा वाढणारा वेढापाहता गावातील गावकरी यांचा अन्न धान्य साठा जीवन आवश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणीगावकऱ्यांनी हलविले असल्याचे तसेच, पुराच्या पाण्याचा  संभाव्य धोका पाहता, प्रशासनची पथकेघडामोडी पाहता परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाययोजना करीत असल्याचे कल्याण तहसीलदारविकास गारूडकर यांनी सांगितले.

राज्य बालनाट्य स्पर्धेत संदेश विद्यालयला ३ पारितोषिकं

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०२५ – २६ मध्ये आयोजित २२व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ नुकताच रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या…

 नाशिकमध्ये मंगळवारी ढगफुटीसह ३०० मिमी पावसाचा इशारा!

 शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, पर्यटनस्थळे व मंदिरे बंद हरिभाऊ लाखे नाशिक –राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असताना मंगळवारी नाशिक, त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसह ३०० मिलीमीटर पावसाचा सर्वात मोठा अलर्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

 रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांचे निधन

गोदी कामगारांनी वाहिली श्रद्धांजली ! मुंबई : महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर  विकास गुप्ते यांचे ६ जुलैला वयाच्या ६५  व्या वर्षी  कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. विकास गुप्ते हे शेवटच्या श्वासापर्यंत कामगार चळवळीमध्ये सक्रिय होते. आझाद मैदान येथे 3 जुलै रोजी चार कामगार कायदे मागे घ्या, या इतर मागण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. रेल्वे कामगारांच्या बैठका घेऊन अन्यायाविरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठविला. अभ्यासू कामगार नेते असल्यामुळे वेतन आयोगामध्ये सातत्याने त्यांचा  सक्रिय सहभाग होता. हिंद मजदूर सभेच्या अधिवेशन आणि  कामगार प्रशिक्षण आयोजनामध्ये त्यांचा नियमित सहभाग होता. रेल्वे कामगारांमधील एक अभ्यासू वक्ता म्हणून त्यांचा नावलौकिक होता.  कामगार चळवळीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. रेल्वे व्यवस्थापनासमोर कामगारांची बाजू ते नेहमी ठामपणे मांडत होते. त्यांच्या निधनाने रेल्वे कामगारांचे तसेच कामगार चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. एका अभ्यासू कामगार नेत्याला कामगार चळवळ मुकली आहे. याची जाणीव नेहमीच कामगार चळवळीला होईल.  विकास गुप्ते यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो. ही प्रार्थना, अशा शब्दांत रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये  आणि जनरल सेक्रेटरी एक मिनिट फक्त सुधाकर अपराज यांनी गोदी  कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

आजा पर्वात, डेहणे रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात

 वाहनांना अपघाताची भीती ठाणे : आजा पर्वात, डेहणे, वाल्मिकी नगर वरपडी गाव कडे जाणाऱ्या रस्त्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशी, विद्यार्थी यांना खड्क्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याने हे खड्डे…

 ‘रुस्तमजी आजियानो एबीसी हौसिंग सोसायटी’ ठाण्यात ठरली उत्कृष्ट हौसिंग सोसायटी

ठाणे : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘रुस्तमजी आजियानो ए बी सी हौसिंग सोसायटी’च्या दरबार हॉलमध्ये सहकार सप्ताह दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाणे उपनिबंधक…

मुंबई महापालिकेच्या तिजोरीत दोन महिन्यांत ₹४,००० कोटींची घटमुंबईकरांच्या पैशाचा हिशेब द्या – विरोधकांचा सवाल

अनिल ठाणेकर मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतील ठेवींमध्ये अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ₹४,००० कोटींची घट झाल्याचा दावा समोर आल्यानंतर मुंबईच्या आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी भाजप-महायुती…

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड वॉर्निंग जारी

अतिमुसळधार पावसासह ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड वॉर्निंग जारी केली असून,…

रिपब्लिकन कामगार युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश उघडे यांची नियुक्ती

राजीव चंदने मुरबाड : रिपब्लिकन कामगार युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी मुरबाड तालुक्याचे कर्तव्यदक्ष रिपाई (आ) तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश उघडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले…

स्वबळावर जागतिक शिक्षणसंस्थेपर्यंत तरुणीची प्रेरणादायी कामगिरी

रमेश औताडे मुंबई : मोठा वारसा नाही, महागडे क्लासेस नाहीत, केवळ बुद्धिमत्ता, अथक मेहनत आणि गुणवत्ता या बळावर एका तरुणीने जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थेचे दरवाजे खुले केले आहेत. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,…