Category: होम

नाशिक-शिर्डी रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

हरिभाऊ लाखे नाशिक: नाशिकरोड ते साईनगर शिर्डी दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी सुरू करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेला प्रभावित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे सर्वेक्षणाला ३४ गावांमधून विरोध होत असतानाच अचानक रेल्वे प्रशासनाने भूसंपादनाबाबत अधिसूचना जारी केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध असताना सुपीक शेतीजमिनी संपादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. रेल्वे विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी २ (निर्माण) भुवनेशकुमार गुप्ता एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार नाशिकरोड ते साईनगर शिर्डी दरम्यान ९५.०५९ किलोमीटर लांबीच्या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रस्तावित मार्गामुळे नाशिक तालुक्यातील विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, जाखोरी, देवळाली, चेहेडी, संसरी, मोहगाव, पंचक, चाडेगाव, ब्राह्मणवाडे आदी गावांसह सिन्नर तालुक्यातील २३ गावांतील सुपीक शेती क्षेत्र बाधित होणार आहे. शेतकऱ्यांनी इंडिया बुल्स कंपनीमार्फत पूर्वीच सुमारे ३० किलोमीटर क्षेत्राचे भूसंपादन झाले असून, नाशिकरोड (एकलहरे) ते सिन्नर मार्गावरील अधिग्रहित जमिनीचा पर्यायी मार्ग म्हणून विचार करता येऊ शकतो असे सुचविले आहे. यामुळे नवीन भूसंपादनाची गरज कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टळून कमी खर्चात प्रकल्प तयार होईल, असे म्हटले आहे. यासंदर्भात बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले आहे. कोट भूसंपादन प्रक्रियेची जबाबदारी प्रशासनाकडे आहे. आमच्याकडे आलेल्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी व आक्षेप थेट रेल्वे प्रशासनाकडे मांडण्याचे सुचवले आहे. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नाशिक कोट या प्रकल्पामुळे नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ३४ शेतीप्रधान गावे प्रभावित होणार आहेत. या गावांतील शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. पर्यायी मार्गाचा प्रस्ताव दिल्यानंतरही तो स्वीकारला गेला नाही, तर प्रकल्पग्रस्त शेतकरी उग्र आंदोलन करतील. – विजय जाधव रेल्वे लाइन विरोध कृती समितीचे कार्यवाह कोट आमचे १९६७ पासून वडिलोपार्जित बागायती क्षेत्र नाशिक ते एकलहरा येथे कोळसा वाहतुकीसाठी दिले आहे. त्यामुळे आम्ही अल्पभूधारक झालो आहे. आताच्या रेल्वेसाठीही जमीन जात असल्याने आमच्यावर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इंडिया बुल्सचा मार्ग वापरावा. – अमोल जाधव, प्रकल्पबाधित शेतकरी

 अबब..! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिवा स्थानकात अवतरला ‘यमराज’

– रेल्वे पोलिसांची अनोखी जनजागृती मोहीम आरती परब दिवा: रेल्वे प्रवासादरम्यान जीव धोक्यात घालून रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना सावध करण्यासाठी दिवा स्थानकात रेल्वे पोलिसांनी अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेत…

 आधुनिकीकरणाबरोबरच `एआय’चा ठाणे अग्निशमन दलाने वापर करावा

 भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांची लक्षवेधी सूचनेवर मागणी ठाणे: मुंबई अग्निशमन दलाने आपत्कालीन व्यवस्थापन आणि आगीच्या घटनांवर वेगाने नियंत्रण मिळविण्यासाठी एआय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्याच पद्धतीने…

 १५ दिवसात एसटीच्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाखांची वाढ

प्रति दिन उत्पन्न ३ कोटी रुपयांनी वाढले ठाणे : परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत…

घोडबंदर रोडला चिमाजी आप्पांचे नाव देणे योग्यच मात्र इतर मराठा योद्ध्यांचाही गौरव व्हावा – धनगर प्रतिष्ठान

००००००००० ठाणे: वसईच्या ऐतिहासिक लढाईत पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकविणारे थोर पराक्रमी योद्धा चिमाजी आप्पा यांच्या शौर्याचा गौरव व्हावा, यासाठी ठाण्यातील घोडबंदर रोडला त्यांचे नाव देऊन वसई विजय…

केवळ भाजी व फळे विक्रीचीच गावदेवी मंडईत परवानगी द्यावी-संजय वाघुले

००००००००००० अनिल ठाणेकर ठाणे- गावदेवी मंडईत केवळ भाजी व फळे विक्रीचीच परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे केली. तसेच ठाणे अग्निशमन दलातील रिक्त पदे…

ठाण्यातील अनेक हॉटेलांमध्ये पोटमाळ्यांना आगीचा धोका-नारायण पवार

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहरातील अनेक हॉटेलांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने पोटमाळे उभारले असून, त्याखाली किचन थाटण्यात आली आहेत. अशा धोकादायक हॉटेलांमध्ये कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते, अशी भीती भाजपचे ज्येष्ठ…

 गायक स्वर्गीय रविंद्र रानडे यांना सूर स्वरांजली

 ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य गहिवरले मुंबई, दि. (प्रतिनिधी): स्वर हार्मनी वाद्यवृंदाचे खंदे गायक आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे लाडके सदस्य रविंद्र रानडे यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर बोरीवली पूर्व येथील वैश्य समाज…

 परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

 प्रवाशांची दोन्ही बाजूंनी लूट स्वच्छता कर वसूल करूनही प्रवाशी ‘मोफत’च्या लाभापासून वंचित योगेश चांदेकर पालघरः राज्याचे परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एक जूनपासून राज्यातील…

रवींद्र माणगावे अध्यक्षपदी तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी करुणाकर शेट्टी यांचा दमदार विजय

वर्षांच्या इतिहासात विदर्भातून प्रथमच उपाध्यक्षपदाची निवडणूक शताब्दीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र चेंबरची ऐतिहासिक झेप मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (मॅकिया)च्या २०२६-२८ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये रविंद्र माणगावे यांची अध्यक्षपदी…