Category: महाराष्ट्र

Maharashtra News

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

अहिल्यानगर : माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत…

परळ येथे एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबीर संपन्न 

०००००००० ०००००००० परळ: फेस्कॉम, मुंबई प्रादेशिक विभागाचे सुरेश ईश्वर पोटे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र, परळ येथे एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत संपन्न झालेल्या या शिबिराचा लाभ ७० ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात यशस्वीपणे पार पडला.  शिबिरासाठी योगेश तोडकर व मनोहर शिंदे यांनी मोलाचे योगदान व मार्गदर्शन केले. स्वामी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात एनसीएमसी नोंदणी शिबिर आयोजित केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सुरेश पोटे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.…

महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय- रामशेठ ठाकूर

 रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा साजरा उलवे : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे शुक्रवारी ‘कृतज्ञता सोहळा’ एम. जी. ग्रुपतर्फे दणक्यात साजरा करण्यात आला. रामशेठ हे सुप्रसिद्ध उद्योजक असल्याने त्यांचा भव्य सत्कार बांधकाम व्यावसायातील डेल्टा ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन गाजीपारा, टुडे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर ब्रदेशभाई शहा, सोनाली रिअॅलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर मयुरेश चौधरी यांच्या हस्ते एम. जी. ग्रुपचे प्रमुख महेंद्रशेठ घरत यांनी करून दाखवला. यावेळी रामशेठ ठाकूर यांना गुरू समजून आयुष्याची वाटचाल करणारे महेंद्रशेठ घरत यांनी गुरुदक्षिणा म्हणून रोलॅक्सचे अनोखे घड्याळ भेट दिले आणि गुरु-शिष्याचे नाते अनोखे असते हे दाखवून दिले. सत्काराला उत्तर देताना माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, “महेंद्रशेठ  यांनी दातृत्वाचा वसा माझ्याकडून घेतला आहे; परंतु तो एक पाऊल पुढे जाऊन माझ्यापेक्षा वेगळे समाजोपयोगी काम करतोय. घरे, बंगले, गाड्या आपल्या सहकाऱ्यांना देऊन त्यांचेही आयुष्य उजळत आहे. जे मलाही जमले नाही. ‘सुखकर्ता’ बंगल्यावरून दिनदुबळ्यांची, गरजवंतांची तो ज्या पद्धतीने सेवा करतोय, याचा मला रास्त अभिमान आहे. त्याने आज कामगार क्षेत्रात जागतिक पातळीवर आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. बैठका व पर्यटनाच्या माध्यमातून त्याने संपूर्ण जग पालथे घातले आहे. हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे राजकारणात आमचे प्रवाह वेगळे आहेत, पण नातेसंबंधांत ते कधीही आडवे येणार नाहीत, याची काळजी आम्ही दोघांनीही घेतली आहे.” यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत रामशेठ ठाकूर यांच्या जुन्या आठवणींत रमले होते. ते म्हणाले, “रामशेठ ठाकूर हे शेलघरचे जावई आहेत. दिवंगत ज. आ. भगत साहेबांची कन्या शकुंतलाताई त्यांच्या सहचारिणी आहेत. त्यामुळे शेलघर गावावर त्यांचे विशेष प्रेम आहे. भगत साहेबांच्या ओसरीत असलेला रामशेठ ठाकूर साहेबांचा फोटो पाहत मी मोठा झालो. पुढे ते शिक्षक झाले, तेव्हा ते वाशीला राहत होते. त्यावेळी मी त्यांच्या घरी बीएमटीसीने जायचो. प्रशांत आणि परेशही तेव्हा लहान होते. त्यामुळे छान गप्पागोष्टी रंगायच्या. रामशेठ यांनी एकदा आम्हाला चेंबूरला चित्रपट पाहायलाही नेले होते, अशी आठवणही महेंद्रशेठ यांनी यावेळी सांगितली. गेल्या ५० वर्षांपासून त्यांना मी पाहत आलोय. त्यांनी मला अक्षरशः हाताला बोट धरून राजकारणात आणले. माझ्या आजच्या वाटचालीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे ऋण माझ्यावर आहेत. ते सर्वच बाबतीत मोठे आहेत, पण आजही माझे ऐकतात. त्यामुळे राजकीय वादळे कितीही आली तरी आमचे कौटुंबिक संबंध कायमच मधुर राहतील,” असा विश्वासही महेंद्रशेठ घरत यांनी बोलून दाखवला. सध्या मी कामगारांच्या हक्कांच्या लढाईसाठी पूर्वनियोजित बैठकांसाठी जिनिव्हाच्या दौऱ्यावर जात आहे. त्यामुळे २ जून या रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवशी मी प्रत्यक्ष भारतात नाही. त्यामुळे त्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या ‘सुखकर्ता’ विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महेंद्रशेठ घरत जिनिव्हा दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांना फोर व्हीलर भेट दिल्या. त्यांच्या चाव्या रामशेठ ठाकूर, उद्योजक मयुरेश चौधरी यांच्या हस्ते दिल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर महेंद्रशेठ घरत यांनी हास्य फुलविले. नाना गडकरी यांनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड. अविनाश ठाकूर, मो. का. मढवी गुरुजी आणि घरत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) आणि बेस्टतर्फे जागतिक तंबाखूमुक्त दिन २०२६ निमित्त आयोजित “तंबाखूमुक्त बेस्ट” उपक्रमादरम्यान बेस्टचे चालक आणि वाहक उपस्थित होते. कुलाबा येथील बेस्ट इलेक्ट्रिक हाऊसमध्ये आयोजित या उपक्रमात तंबाखूविरोधी जनजागृती मोहीम, हवन समारंभ, कॅन्सर किड्स अपील, तंबाखूचे व्यसन सोडलेल्या बेस्ट चालक आणि वाहकांचा सत्कार, बेस्ट बसमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती पोस्टर्सचे अनावरण तसेच महिला वाहकांच्या नेतृत्वाखाली प्रभावी फलक मोहीम आयोजित करण्यात आली. या उपक्रमाद्वारे मुंबईच्या सार्वजनिक परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखूमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. ०००००००००

काशिनाथ माटल यांच्या “सावट” कथासंग्रहाला सातार,कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचा ३रा राज्यस्तरीय पुरस्कार!

सातारा दि.३०:ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांच्या “सावट” या कथासंग्रहाला कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.प्रतिष्ठानच्या वतीने कादंबरी,कवितासंग्रह,बाल साहित्य,उत्तेजनार्थ इत्यादी उत्कृष्ट मराठी वांग्मय निर्मितीला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले…

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे हे ३६ वर्षाच्या सेवापूर्ती नंतर नियतवयोमानानुसार निवृत्त झाले. यानिमित्तानं आयोजित सन्मान सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात काल संपन्न झाला. या कार्यक्रमास…

नाशिकमध्ये पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर

हरिभाऊ लाखे नाशिक : महापालिकेमार्फत पाथर्डी फाटा- पाथर्डी गाव पिंपळगाव खांब फाटा या महत्त्वाच्या मार्गावरील नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मान्सूनपूर्व तयारीला वेग देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील ओएफसी, महा आयटी सीसीटीव्ही आणि एमएनजीएल गॅस पाइपलाइनची सर्व युटिलिटी कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या नवीन नाशिक विभागाअंतर्गत येणारा हा डांबरी रस्ता सुमारे ३.८६२ किलोमीटर लांबीचा असून, ३१ मे २०२६ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. वाढती वाहतूक आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता रस्ते मजबुतीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. सध्या मार्गावरील नादुरुस्त पॅचेसची दुरुस्ती सुरू असून, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. स्टॉर्म वॉटर लाइन अंतर्गत २०० मीटर काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. महापालिका प्रशासनाने ओएफसी, गॅस पाइपलाइन आणि ड्रेनेज कामांमुळे भविष्यात पुन्हा रस्ते खोदकाम होऊ नये यासाठी संबंधित विभागांसोबत समन्वय बैठका घेतल्या आहेत. वाहतुकीवरील परिणाम कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कामांचे नियोजन करण्यात आले असून, दर्जेदार साहित्याचा वापर करून पावसाळ्यात खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी विभागीय पथक सतर्क ठेवण्यात आली असून रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या आणि युटिलिटी नेटवर्कचा एकत्रित आढावा घेऊन कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. कोट महापालिकेकडून संबंधित विभाग व यंत्रणांच्या समन्वयातून कामांना गती देण्यात येत आहे. मान्सूनपूर्व सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुविधायुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. – मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका, नाशिक

काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने…!

पेट्रोल -डिझेल -गॅस दरवाढीविरुद्ध सिंधुदुर्ग: पेट्रोल – डिझेल-गॅस दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘रद्द करा, रद्द करा,…

 “राजकारण बाजूला ठेवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!”

NEET घोटाळा नाशिकमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन हरिभाऊ लाखे नाशिक : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज दिनांक २९ मे २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकचे जिल्हाध्यक्ष मिहिर प्रमोद गजबे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतनजी गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा महासचिव विश्वनाथ भालेराव, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष रवी पगारे, दामोदर पगारे, राजू दादा दोत्रे, डॉ. अनिल कुरे, अमोल चंद्रमोरे, दीपक पगारे, युवराज मनारे, ताराचंद मोतमल आदी उपस्थित होते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने अनिकेत काशीद, आदित्य निरभवणे, सम्यक बच्छाव, श्रेयस अहिरे, विजय सावंत, पूर्वेश, यश जाधव, ऋत्विक जाधव, वैभव वानखेडे, सम्राट संघारे, प्रणव खंडीजोड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी बोलताना मिहिर गजबे म्हणाले, “पेपर फुटीच्या या सत्रामुळे देशातील अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा.” आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीने, “हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे आवाहन केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशातील सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा आर्थिक व मानसिक संघर्ष यावर पाणी फेरले गेले असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. NEET ची फेरपरीक्षा तात्काळ जाहीर करून ती पूर्णपणे विनामूल्य घेण्यात यावी. Public Examinations (Prevention of Unfair Means)…

– ५ जून रोजी सोलापुरात होणार राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा

२ जूनपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने शुक्रवार, ५ जूनला राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथे होणाऱ्या या परीक्षेमुळे राज्य परीक्षा पास झालेल्या पंचांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या परीक्षेबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण पंचांनी राष्ट्रीय परीक्षेला बसावे आणि राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी २ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पूर्ण करावी. यासाठी प्रशांत पाटणकर (मो. क्र. ९९६७५६२४६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने पंचांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. 0000000000