Category: मुंबई

Mumbai news

इच्छाशक्ती, अंकूर, एसएसजी, पार्ले स्पोर्ट्सची थरारक सलामी

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी इच्छाशक्ती, अंकूर, एसएसजी, पार्ले स्पोर्ट्सची थरारक सलामी मुंबई, दि. १० (क्रीडा प्रतिनिधी)-प्रभादेवीतील चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत कबड्डीचा रणसंग्राम रंगला आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना अक्षरशः थराराचा झंझावात अनुभवायला मिळाला. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेची सुरुवातच अशी झाली की मैदानात प्रत्येक चढाईसोबत श्वास रोखले जात होते. आघाडीवरून पिछाडी, पिछाडीवरून आघाडी, एका गुणाने निसटलेला विजय, तर कधी शेवटच्या क्षणी साधलेली बरोबरी,  अशा नाट्यमय घडामोडींनी कबड्डीप्रेमींना अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवले. पहिल्या दिवशी रंगलेल्या थरारात इच्छाशक्ती क्रीडा मंडळ, एसएसजी फाउंडेशन, पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि अंकुश स्पोर्ट्स क्लब यांनी दमदार विजयांसह स्पर्धेत विजयी सलामी दिली. टी-२० विश्वचषकाच्या गदारोळानंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या चढाई-पकडीच्या युद्धाने कबड्डीप्रेमींना अस्सल ग्रामीण थराराची मेजवानी दिली. शेवटच्या क्षणी स्पर्धेत उतरलेल्या पालघरच्या इच्छाशक्ती क्रीडा मंडळाने आपल्या झंझावाती खेळाने प्रेक्षकांचा उत्साह अक्षरशः द्विगुणित केला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, स्पर्धा संयोजक आणि आमदार महेश सावंत, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे विश्वास मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. एलआयसी, मुथुट फायनान्स, इंडियन ऑइल यांच्या पुरस्काराने सुरू झालेल्या या स्पर्धेत लायन्स स्पोर्ट्स क्लबविरुद्धच्या सामन्यात यश निंबाळकर आणि योगेश राठोड यांच्या वेगवान चढायांनी इच्छाशक्तीला ३६-२० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसर्‍या डावात लायन्सच्या राज आचार्य आणि विशाल कटकटे यांनी झुंजार खेळ करत सामना रंगतदार केला. एका क्षणी २०-३६ पिछाडीवर असलेल्या लायन्सने इच्छाशक्तीवर लोन चढवत धावसंख्या ४१-३९ पर्यंत नेली आणि सामना अक्षरशः नखशिखांत थरारला. अखेर इच्छाशक्तीने ४२-४० अशी निसटती बाजी मारत विजय खेचून आणला. प्रो कबड्डीतील सुपरस्टार खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेल्वेला अजिंक्यपद मिळवून देणार्‍या पंकज मोहितेने एसएसजी फाउंडेशनसाठी अक्षरशः वादळी खेळ केला. त्याच्या ११ गुणांच्या झंझावाती चढायांच्या जोरावर एसएसजीने प्रतिस्पर्ध्यावर ५३-३१ असा एकतर्फी विजय मिळवला. सूरज जाधव, तेजस टक्के आणि आशिष चौधरी यांनीही दमदार साथ दिली. सुशांत साहिल याच्या तुफानी पकडींनी अंकुश स्पोर्ट्स क्लबला सिद्धीप्रभा फाउंडेशनविरुद्ध ३४-२७ असा शानदार विजय मिळवून दिला. सिद्धीप्रभाकडून रुपेश साळुंखे याने अष्टपैलू खेळ करत १६ गुणांची कमाई केली, मात्र त्याचा झुंजार प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि गोल्फादेवी सेवा मंडळ यांच्यातील लढतही तितकीच रंगतदार ठरली. अक्षय तावडे आणि प्रशांत पवार यांच्या खेळाने पार्लेला जोर मिळाला, तर धनंजय सरोज आणि शार्दुल हरचेकर यांच्या चढायांनी गोल्फादेवीने पहिल्या डावात १८-१८ अशी बरोबरी साधली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आघाडीसाठी जीव तोडून संघर्ष केला. शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या या लढतीत पार्ले स्पोर्ट्स क्लबने ३५-३४ असा निसटता विजय मिळवला. पार्लेने आपल्या दुसर्‍या सामन्यात अमर क्रीडा मंडळाचा ४५-२८ असा पराभव करून दुसरा विजयही नोंदवला. इच्छाशक्तीच्या दुसर्‍या सामन्यातही थराराचा कळस गाठला. यश निंबाळकरच्या वेगवान चढायांनी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबविरुद्ध इच्छाशक्तीला २४-१६ अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसर्‍या डावात गुड मॉर्निंगच्या शार्दुल पाटीलने तुफानी चढायांनी इच्छाशक्तीच्या बचावफळीची अक्षरशः झोप उडवली. त्याने १६ गुणांची कमाई करत सामना शेवटच्या मिनिटाला ४१-४० असा आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता, मात्र निर्णायक क्षणी यश निंबाळकरने शेवटच्या चढाईत दोन गुण मिळवत इच्छाशक्तीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शार्दुल पाटीलने अखेरच्या चढाईत एक गुण मिळवत सामना ४२-४२ असा बरोबरीत सोडवला आणि मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी या थराराला जोरदार दाद दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा आमदार मिलिंद नार्वेकर यांची विधान परिषदेत मागणी केतन खेडेकर मुंबईच्या ऐतिहासिक विक्टोरिया टर्मिनस (VT) रेल्वे स्थानकाचे सर्वप्रथम सन १९९६ मध्ये नाव बदलून ‘छत्रपति शिवाजी टर्मिनस’ (CST) करण्यात आले होते. तद्नंतर जून २०१७ मध्ये या नावात ‘महाराज’ शब्द अधिकृतरित्या जोडण्यात आला आणि  या स्थानकाचे नाव ‘छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) करण्यात आले. हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. खेदाची बाब हि आहे की, या स्थानकाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देवून सुमारे २० वर्षाचा कालावधी लोटला तरीदेखील या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आजतागायत बसविण्यात आलेला नाही. या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी राज्य आणि केंद्र शासनाकडे केली आहे. या स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा केंद्र सरकारने समावेश केला असल्याची ग्वाही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी माहे डिसेंबर २०२५ मध्ये दिली आहे. त्यानुसार शिवरायांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी या स्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा तातडीने शुभारंभ करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी औचित्याच्या मुद्दयाद्वारे श्री मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेत केली.

मुंबई, पालघर, ठाणेला उष्णतेचा ऑरेंज अर्लट

मुंबई : मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितलं जात आहे. उद्याही पालघर, ठाणे आणि…

मुंबई, पालघर, ठाणेला उष्णतेचा ऑरेंज अर्लट

मुंबई : मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितलं जात आहे. उद्याही पालघर, ठाणे आणि…

“लवकर या, लवकर जा”

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महिलांना गिफ्ट मुंबई : जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा झाला याचे औचित्य साधून आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना मोठी गिफ्ट झाली. लवकर या आणि लवकर जाण्याची सुट महीलांना…

वंचितचा पंतप्रधान मोदींविरोधात एल्गार २३ मार्ला आरएसएस मुख्यालयावर मोर्चा

वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चात काँग्रेसही होणार सहभागी ० आरएसएस मुख्यालयासमोर धरणे आंदोलनही करणार मुंबई : देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी तडजोड केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आणि वंचित…

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट मुंबई  : मॉरिशस प्रजासत्ताकाच्या भारतातील उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भारत-मॉरिशस संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सुनेत्रा अजित पवार व शीलाबाई बाप्पू यांच्यामध्ये भारत–मॉरिशस संबंध, महाराष्ट्र–मॉरिशस ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध, व्यापार-गुंतवणूक संधी तसेच पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मॉरिशसचे कॉन्सुल जनरल डॉ. डी. के. बकटोवार, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, दयानंद बाप्पू उपस्थित होते.

ना अर्थ… ना संकल्प…  जयंत पाटीलांचा हल्लाबोल 

  मुंबई –     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ना ‘अर्थ’ आहे… ना कोणता ‘संकल्प’ आहे….या अर्थसंकल्पातून फक्त काँट्रॅक्टर लोकांचे भले होणार आहे आणि तेही फक्त मोठे काँट्रॅक्टर…

युद्धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गॅसची आणीबाणी

युद्धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गॅसची आणीबाणी स्लग – केंद्र सरकारकडून गॅससाठी एस्मा कायदा लागू गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आधी घरगुती गॅसला प्राधान्य मग औद्योगिक वापरासाठी होणार…

मुंबई मराठी पत्रकार संघात ‘एआय परिषद २०२६’ चे आयोजन

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे माध्यमविश्वात मोठे परिवर्तन घडत आहे. पत्रकारिता, कथाकथन आणि चित्रपट निर्मिती यामध्ये एआय च्या वाढत्या वापराचा वेध…