Category: मुंबई

Mumbai news

ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना पितृशोक

उलवे : उलवे नोडमधील मोरावे गावचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन भोकाजी पाटील यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ते ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांचे वडील होत. दिवंगत…

प्रवाशांच्या अपेक्षांना विश्वासाची नवी गती

रमेश औताडे मुंबई : प्रवाशांची सुरक्षितता, आराम, विश्वसनीयता आणि टिकाऊपणा या बाबतच्या वाढत्या अपेक्षांमुळे भारताचे प्रवासी वाहतूक क्षेत्र एका मोठ्या परिवर्तनातून जात आहे. या बदलत्या बाजार पेठेतील गतिशीलतेला स्टारझ ने प्रवाशांच्या अपेक्षांना विश्वासाची नवी गती दिली आहे. असे मत एम जी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  अनिल मोहन कामत यांनी व्यक्त केले. भारतातील अग्रगण्य एमजी ग्रुपने “ प्रवास २०२६ “ मध्ये आपल्या ‘स्टारझ’ नेक्स्ट-जनरेशन प्रीमियम कोच प्लॅटफॉर्मचे अनावरण केले.  गांधीनगरच्या महापौर मीराबेन पटेल यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  दरियापूरचे आमदार  कौशिक जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उद्घाटनानंतर तीन दिवस  नवनवीन कल्पना, उत्पादनांचे प्रदर्शन, व्यावसायिक संबंध आणि उद्योग सहकार्य असे  कार्यक्रम होणार आहेत. एम जी ग्रुपने आघाडीच्या ओईएम राज्य परिवहन उपक्रम , खाजगी फ्लीट ऑपरेटर्स आणि संस्थात्मक ग्राहकांना सेवा देणारा एक विश्वसनीय मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. ००००

Heading – ठाणे वाहतूक विभागात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

 १२ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहर वाहतूक विभागातील पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदलीचे आदेश पोलिस उपआयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी जारी केले आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांनुसार एकूण १२ पोलिस निरीक्षकांना विविध वाहतूक उपविभागांमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आले आहे. हे आदेश ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले असून तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. बदल्यांनुसार पोनि. संजय महादेव जाधव यांची कळवा वाहतूक उपविभागातून राबोडी वाहतूक उपविभागात, पोनि. विजयकुमार देशमुख यांची वाहतूक नियंत्रण कक्षातून वागळे वाहतूक उपविभागात, तर पोनि. मिलिंद झांजे यांची कल्याण वाहतूक उपविभागातून कोळसेवाडी वाहतूक उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पोनि. राजू पिंगारे, पोनि. जयपालसिंग राजपूत, पोनि. कृष्णदत्त डखोळे, पोनि. उमेश सावंत, पोनि. युवराज म्हसे, पोनि. दामोदर घने, पोनि. विजय अहिरे, पोनि. अंकुश हुल्के आणि पोनि. रणजित नलवडे यांच्या देखील विविध वाहतूक उपविभागांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. पोनि. रणजित नलवडे यांची प्रशासन शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 कल्याणच्या पाणीप्रश्नासाठी विधानसभेत आवाज

 कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी आमदार सुलभा गायकवाड यांची ५० कोटींच्या विशेष निधीची मागणी कल्याण : कल्याण पूर्व व कल्याण पश्चिम शहरांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी उल्हास नदीपात्रात फुटल्याने लाखो नागरिकांना सलग दोन दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणचा गंभीर पाणीप्रश्न महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये उपस्थित करण्यात आला. ही घटना केवळ तांत्रिक बिघाड नसून नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित अत्यंत गंभीर बाब असल्याचे अधोरेखित करत शासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी विधानसभेत लक्षवेधी द्वारे केली आहे. सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली ही मुख्य जलवाहिनी आता पूर्णपणे जीर्ण झाली असून, दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारच्या दुर्घटना घडण्याची शक्यता कायम असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. वारंवार तात्पुरत्या दुरुस्त्या करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी त्यातून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळत नसल्याचेही नमूद करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर विधानसभा पावसाळी अधिवेशनात “पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन” द्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. उल्हास नदीपात्रातून जाणाऱ्या विद्यमान जलवाहिनीऐवजी सुरक्षित सिमेंट काँक्रीट पुलावरून नवीन मुख्य जलवाहिनी उभारण्यात यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी स्वतंत्र स्टँडबाय जलवाहिनीही उभारण्यात यावी, यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला ५० कोटींचा विशेष निधी तात्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पिण्याचे पाणी हा राजकारणाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भविष्यात लाखो कल्याणकरांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचेही सुलभा गायकवाड यांनी आपल्या निवेदनात सांगितले. दरम्यान, शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक निधी मंजूर करावा आणि कल्याण शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

– बीएलओ/एसआयर रद्द करा, टीइटी सक्ती नको, तात्काळ FIR मागे घ्या

– मागण्यासाठी शिक्षकांचे आंदोलन अनिल ठाणेकर ठाणे : BLO/SIR रद्द करा, शिक्षकांना TET सक्ती नको, तात्काळ FIR मागे घ्या. या मागण्यासाठी मुंबईतील शिक्षकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आझाद मैदान येथे जोरदार आंदोलन केले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.याप्रसंगी शिक्षक आमदार किरण सरनाईक, किशोर दराडे, विक्रम काळे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जयंत आसगावकर, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे, उपाध्यक्ष नंदा कांबळे, केशव जाधव, राजेश सुर्वे, देवीदास पंडांगळे आदी उपस्थित होते. शिक्षण विभागाने पगार कपातीचे पत्र काढूनही हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक आंदोलनात सहभागी झाले होते. शिक्षणमंत्री मा.  दादाजी भुसे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या BLO SIR ड्युटीच्या प्रश्नांबाबत महानगरपालिका आयुक्त, शिक्षण उपायुक्त आणि महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासोबत संयुक्त मिटिंग  घेऊन निर्णय घेण्याचे सांगितले. यापुढे मुंबईतील एकाही शिक्षकांवर ड्युटी नाकारली म्हणून FIR  होणार नाही तसेच ज्यांच्यावर FIR झाले आहेत ते तात्काळ मागे घेण्याबाबत आदेश देण्यात येईल, असे आश्वासन दिले. TET सक्तीतून शिक्षकांना दिलासा देण्याबाबत शासन सकारात्मक असून कार्यरत शिक्षकांसाठी वेगळी परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा विचार करत आहोत, असे शिक्षणमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. BLO/SIR ड्युटी करताना मृत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक कोटी नुकसान भरपाई द्यावी, शाळांच्या वेळा पूर्वीप्रमाणेच पूर्ण वेळ कराव्यात, महाविद्यालयातील विद्यार्थी (NCC, NSS) आणि सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना BLO/SIR ड्युटी लावली अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी केली. शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास शाळा वाचवण्यासाठी, विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवण्यासाठी अनुदानित शिक्षणाची व्यवस्था टिकवण्यासाठी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराला विरोध करण्यासाठी पुढील आंदोलनात सर्व पालकांना रस्त्यावर उतरवणार असे सुभाष मोरे म्हणाले. आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात शिक्षक भारती (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना),बी.एल.ओ. ड्युटी अन्याय निवारण मंच, बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक महासंघ मुंबई कोकण विभाग,महामुंबई शिक्षण संस्था,मुंबई (बृहन्मुंबई) माध्यमिक (उच्च माध्यमिक) शाळा मुख्याध्यापक संघटना,मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना, शिक्षण बचाव मंच,प्रहार शिक्षक संघटना, आदर्श शिक्षक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी मतदार यादी पडताळणी करुन घ्यावी

ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील आपल्या नाव रद्द होऊ शकते असा इशारा नगरसेविका मालती पाटील आणि शिवसेना…

Heading – विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा

 उल्हासनगर महापालिकेचे आवाहन सुनिल इंगळे उल्हासनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियान सुरू करण्यात आले असून, या मोहिमेत उल्हासनगर शहरातील सर्व पात्र नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने केले आहे. महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या अभियानादरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना फॉर्म (Enumeration Form – EF) उपलब्ध करून देणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह हा फॉर्म काळजीपूर्वक भरून निर्धारित कालावधीत संबंधित BLO यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांकडून गणना फॉर्म प्राप्त होतील, त्यांचाच समावेश मसुदा मतदार यादीमध्ये करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मतदार यादीतील अपात्र, मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सन २००२ नंतर प्रथमच इतक्या व्यापक स्वरूपात मतदार यादीची पडताळणी होत असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही मतदाराचे नाव सुनावणीची संधी दिल्याशिवाय मतदार यादीतून वगळले जाणार नाही. तसेच नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक घोषणापत्र (Declaration Form) सादर करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय तक्रारी व अपील दाखल करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अधिक माहितीसाठी मतदार मदत क्रमांक १९५० वर संपर्क साधावा किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आपल्या घरी भेट देताच त्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने सर्व नागरिकांना केले आहे.

संभाजीनगरात १८ ते २३ जुलैदरम्यान राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

 देशभरातील ८०० खेळाडूंचा सहभाग मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि संभाजीनगर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा स्टेडियम येथे राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन…

अपरान्त जयंती विशेषांकाचे प्रकाशन

 बौद्ध साहित्य संशोधकांसाठी मोलाचा संदर्भग्रंथ ठरेल – ज.वि. पवार मुंबई, प्रतिनिधी : काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकाशनास विलंब झालेल्या ‘अपरान्त’ जयंती विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक तथा अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज.वि. पवार यांच्या हस्ते रविवारी मुंबई…

सेंट अँड्र्यूस कॉलेज मध्ये जुनिअर कॉलेज शिक्षकांचा होतोय छळ

मुंबई : बांद्रा येथील सेंट अँड्र्यूज कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्राचार्या डॉ. सिबिल थॉमस यांच्यामुळे प्रचंड मानसिक छळ सहन करावा लागत आहे आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणात काम करावे लागत आहे. त्यांनी…