Month: April 2026

राज्यातील सोनार समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक-पंकज भोयर

मुंबई / रमेश औताडे राज्यांतील गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून काही मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. लवकरच एक बैठक घेऊन मागण्या पूर्ण करू. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने मुंबईत आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले. सोनार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून न्याय मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार चित्राताई वाघ यांनी विधान भवनात सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर मार्ग काढण्यासाठी खूप पाठपुरावा केला. सोने गहाण ठेवण्याच्या प्रकियेत हा घटक खूप महत्त्वाचा असतो, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले. प्रमुख मार्गदर्शक संजीव खडके, अध्यक्ष डॉ राजेंद्र दिंडोरकर, कार्यकारी सचिव सतीश पितळे, खजिनदार दीपक देवरुखकर, सल्लागार भरत ओसवाल, पद्मिनी ताई शंकरशेट आदी मान्यवर उपस्थित होते.

आनंद नगर मधील बुद्धविहाराचा कायापालट होणार

ठाणे :  गेलीं अनेक वर्षें मोडकळीस आलेल्या आनंद नगर मधील बुद्धविहार आता नव्या रूपात साकारले जाणार आहे. १९ एप्रिलपासून या बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीच्या कामास सुरवात होणार आहे. पूर्व ठाण्यातील आनंद नगर विभागात असलेल्या बुद्धविहाराची अवस्था खराब झाली होती. त्यातच गेली अनेक वर्षे पुनर्बांधणीचे काम या ना त्या कारणाने रखडले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनीच पुढाकार घेऊन निधी गोळा करून बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १९ एप्रिलपासून बांधकामाला सुरुवात होत आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, निरंजन डावखरे,माजी आमदार रवींद्र फाटक, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीसाठी  आनंदनगर बौद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बनकर, उपाध्यक्ष आनंद कांबळे, राहुल लोंढे, वृक्षाली जाधव – दळवी, सचिव प्रविण गायकवाड, खजिनदार संजय बुकाणे, सहसचिव हिरा वानखेडे, सहखजीनदार राजू साबळे, अमोल जोशी, दिलीप जाधव, नितीन दुधसागर, सुनील सौंदाणे, भरत उबाळे, सुनील कदम प्रवीण झेंडे आणि इतर  मेहनत घेत आहेत.

विलेपार्ल्याला साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेती प्रकल्प

मुंबई: महापौर आणि उपमहापौर आयुक्तांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई  विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत…

‘पळसाची पाने’ मुंबईत विक्रीसाठी

 शहापूरच्या गरीब आदिवासींना मिळतेय रोजी रोटी अविनाश उबाळे ठाणे : जंगलात रानावनात डोंगर कपारीत राहणार्‍या आदिवासी समाजाने आपल्या दोन वेळच्या घासासाठी जंगलात भटकंती करताना रोजगाराच्या वाटा या स्वतः शोधल्या आहेत.कशासाठी तर वितभर पोटासाठी सरकारी मदतीची वाट न पाहता जगण्यासाठीचा हा संघर्ष आदिवासींचा कायम दिसतो आहे. कशासाठी तर वितभर पोटासाठी प्रत्येक मोसमात त्याने वेगवेगळे व्यवसाय करून काबाडकष्ट करून दोन पैसे मिळवून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित आहेत.शहापूर तालुक्यातील वाशिंद, किन्हवली, डोळखांब, खर्डी, कसारा ,तानशेत, उंबरमाळी, आघई ,तानसा, दहागाव पिवळी, माहुली, या ग्रामीण भागातील आदिवासी बहुल वस्त्यावरील आदिवासी हे दरवर्षी पळसाची पाने विक्रीचा व्यवसाय करतात.जवळपास या व्यवसायातून आदिवासी समाजाची बहुतांश कुटुंब आपली रोजीरोटी चालवितात. दाट जंगलात, डोंगर कपारीत भटकंती करून आदिवासी पुरुष,महिला ही पळसाची पाने मोठ्या मेहनतीने खुडून आणतात.नंतर या पानांचे गठ्ठे बांधून ते जंगलातून पायपीट करत डोक्यावर वाहून मध्य रेल्वेच्या कसारा खर्डी, आटगाव, आसनगाव, वासिंद,या रेल्वे स्थानकात आणून रेल्वेने पुढे मुंबई, दादर, ठाणे, डोंबिवली,कल्याण या शहरातील फुलमंडईत विक्रीसाठी नेतात. फुले बांधण्यासाठी पळसाच्या पानांना फुल मंडईत मोठी मागणी असते.पळसाच्या पानाच्या विक्रीतून त्यांना रोज ४०० ते ५०० रुपयांची कमाई होते.असे या व्यवसायातील सुकरी निरगुुडा या आदिवासी महिलेने माहिती देताना सांगितले.काही आदिवासी हे पळसाची पानं ही उत्तर भारतीय लोकांना रेल्वे स्थानकातच अगदी अल्प दरात विक्री करतात.यातून स्थानिक आदिवासींना दोन पैसे मिळतात.पळसाच्या पानांच्या विक्रीचा हा शहापूरातील आदिवासींचा पिढीजात व्यवसाय आहे.या व्यवस्यातून आदिवासी कुटुंबे आपली रोजीरोटी भागवतात पळसाच्या पानांच्या व्यवसायासोबत आदिवासी मोठ्या कौशल्याने बांबूपासून टोपल्या,सूप, इरणा,चाप,कनगा आदी वस्तू बनवितात.या सर्व वस्तू साधारण पावसाळा मोसमाच्या नंतर हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या मोसमात शहरांतील आठवडी बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात.यातून त्यांना दररोज ३००ते ४०० रुपयांची कमाई होते. त्यांच्या बांबू हस्तकलेच्या व्यवसायाने देखील देखील आदिवासींना रोजगार प्राप्त करून दिला आहे.

 महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून शाबासकी अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी भरभरुन शाबासकी दिली. विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य ‘केसरीच्या बालमा’ या गीतासह सादर केले तसेच ओडिशाचे संबलपुरी ढलकाई नृत्य लोकगीतासह सादर केले. भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता. भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा, नृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे. संपूर्ण देश फुलांच्या हराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा विकसित भारत या संकल्पने मागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी दोन्ही राज्यांचे सौंदर्य, इतिहास, वारसा, स्वातंत्र्यलढा, संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले. यावेळी ‘म्हारो राजस्थान’ हे राजस्थानचे व ‘बंदे उत्कल जननी’ हे ओडिशाचे राज्यगीत ऐकविण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकर, समितीचे सदस्य, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ अविनाश ढाकणे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ प्राची जांभेकर उपस्थित होते. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (प्रशासन) करुणा वावडणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत दिग्गज संघांची धडक

युवा पलटन, भारत पेट्रोलियम, मुंबई पोस्टलसह ११ संघांची पुढील फेरीत मजल मुंबई :प्रभादेवी येथे आयोजित ‘ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा-२०२६’ स्पर्धेत दिग्गज संघांनी दमदार कामगिरी करत बाद…

न्यू इंदिरानगर येथील सॅटिस पूल प्रकल्पातील बाधित नागरिकांना मिळाला दिलासा

ठाणे : ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिसपूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देवून खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या…

ठाण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जोरदार आंदोलन

ठाणे : प्रशासनाच्या कथित असंवेदनशील कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने ठाण्यात जोरदार आंदोलन छेडले. प्रांताध्यक्ष तथा आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशानुसार, शिक्षक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांच्या नेतृत्वाखाली…

विश्व् विजेत्या प्रशांतची हार तर सौरभ मते पहिल्यांदाच उपांत्य फेरीत दाखल

 राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन वाशी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ६०…