मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या गुजराती नगरसेवकांना बृहन्मुंबई गुजराती समाज आयोजित एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. नवनीत गुजराती समाज भवन येथे झालेल्या या समारोहात पद्मभूषण डॉ कुंदन व्यास, बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेमराज शाह, माजी खासदार मनोज कोटक, प्रवीण छेडा, जितुभाई मेहता, डॉ. नागजी रीटा, राजेश दोशी, जितेंद्र पटेल, संध्या विपुल दोशी, सिद्धार्थ शर्मा, संदिप दिलीप पटेल, सुनीता मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. (छाया : विरल जोशी) हा फोटो खालच्या बातमीत घेणे
बिळवसच्या श्रीदेवी सातेरी जल मंदिरात २६ जुलैला आषाढी जत्रोत्सव….!
०००००००० मालवण : भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेली सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरीचा(जलमंदीर ) आषाढ महिन्यात होणारा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी २६…
कास्ट्राईब महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा
– किशन जावळे व संदेश शिर्के यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता रायगड-अलिबाग : (अशोक गायकवाड )—-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासमवेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्या आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक गुरुवारी, दि.११ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक अडचणींवर बैठकीदरम्यानच थेट फोन लावून तात्काळ निकाल काढला व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने सरळ सेवा भरतीतील अनुशेष भरणे, अनुकंपा भरती प्रक्रियेला गती देणे आणि अधिसंख्य पदांच्या सद्य:स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आश्वासित प्रगती योजना लागू करणे, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजूर करणे, निलंबन व पेन्शन प्रकरणांचा जलद निपटारा करणे या आर्थिक व प्रशासकीय लाभांच्या मागण्यांवर भर देण्यात आला. यासोबतच तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे संकलन बदल करणे, सेवा वर्ग करणे आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ३ डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी देण्याबाबत आणि पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना महसूल विभागात काम करताना येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवर मार्ग काढण्यावर यावेळी विचारविनिमय झाला. याव्यतिरिक्त, दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्याचा सामाजिक उपक्रमही या बैठकीत निश्चित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला आश्वस्त करताना सांगितले की, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सर्व मागण्यांबाबत प्रशासन पूर्णपणे सकारात्मक असून, कर्मचाऱ्यांचा कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. या बैठकीला कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व संघटनेचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश सदावर्ते, रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, दिव्यांग विभागाचे सचिव शिवाजी बिवराळे, जिल्हा परिषद विभाग रायगडचे जिल्हाध्यक्ष खंडू बागुल, कार्याध्यक्ष सचिन ओव्हाळ, कोषाध्यक्ष विकास बडे, चिटणीस संतोष साळगावकर आणि उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार व रायगड जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. शेवटी रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे यांनी प्रशासनाचे आणि उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानल्यानंतर बैठकीची सांगता झाली.
Heading – एमआयडीसी फेज दोनमध्ये दारुड्यांच्या हैदोस
नोकरदार महिला त्रस्त कल्याण : डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील जेथे प्रोबेस स्फोट झाला होता त्या W – १६० ते W – २५१ या लेन मधील कारखान्यासमोर गटाराच्या बाजूस काही तरुण, मध्यमवयीन दारुडे हे रोज सायंकाळी दुचाकी व अन्य वाहनांत येऊन दारू व इतर व्यसने करीत आहेत. सायंकाळ ते रात्री पर्यंत या दारुड्यांचे प्रताप तेथे चालू असतात. येथील कंपन्यांतून सायंकाळी सुटणाऱ्या महिला समक्ष हे प्रकार चालू असल्याने महिला वर्ग दहशतीखाली असून या दारुड्यांनी नशेत काही दुष्कृत्ये केली तर मोठा अनर्थ होणार आहे. हे नशेखोर दारुडे ठराविक प्रकारची म्हणजे मास्टर्स डीलाईट ही दारू पित असून त्याच्या लाल रंगाच्या प्लास्टिक बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आणि चकणा साठी घेतलेले पेपर, कागदी डिश या बाजूच्या गटारात फेकून ते अस्वच्छता करीत आहेत. यामुळे गटारात या बाटल्यांचा खच जमा होत आहे. केडीएमसी, एमआयडीसी प्रशासन तर ही गटारे कधीच साफ करीत नाहीत. त्यामुळे येथे दुर्गंधी वाढली आहे. या संदर्भात येथील महिला उद्योजक वर्षा महाडिक यांनी याबाबत फोनवरून तोंडी तक्रार ही मानपाडा पोलिसांना आणि केडीएमसी एमआयडीसी यांच्याकडे केली असून लवकरच यावर कडक कार्यवाही करावी असे त्यानी सांगितले आहे.
स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांना भावपूर्ण अभिवादन
०००००००० मुंबई : स्वातंत्र्यसैनिक, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर आणि ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त गोदी कामगारांच्या वतीने शनिवारी (१३ जून) माझगाव येथील कामगार सदनमध्ये…
टिटवाळ्यात वीज प्रश्नावर नागरिक आक्रमक
एका दिवसात ७०० नागरिकांचा पाठिंबा कल्याण: टिटवाळ्यातील वाढत्या वीज समस्यांविरोधात सुरू झालेल्या जनआंदोलनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, केवळ एका दिवसात ७०० हून अधिक नागरिकांनी सह्या करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. जनतहित फाउंडेशनचे संस्थापक रितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मांडा पूर्व येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर सुरू असलेल्या या मोहिमेची सध्या संपूर्ण टिटवाळ्यात जोरदार चर्चा आहे. वारंवार होणारी वीज खंडित होणे, कमी-जास्त दाबाचा पुरवठा आणि वाढत्या गैरसोयींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हजारो ग्राहकांकडून नियमित महसूल वसूल केला जात असतानाही मूलभूत सेवा सुरळीत मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रितेश कांबळे यांनी लोकशाही मार्गाने नागरिकांना एकत्र आणत सह्या मोहीम सुरू केली. या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता हा प्रश्न आता केवळ वीजपुरवठ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो जन भावनांचा विषय बनल्याचे दिसून येत आहे. “आज नाही तर कधीच नाही” या भूमिकेतून अनेक नागरिक आंदोलनस्थळी येत असून, आपल्या हक्कासाठी आवाज उठविण्याची वेळ आता आल्याची भावना व्यक्त करत आहेत. केवळ सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून प्रश्न सुटणार नाहीत, तर संघटित लोकशक्तीच प्रशासनाला जागे करू शकते, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. दरम्यान, वीज समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून आणखी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
मुंबईतील रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्यांबाबत नागरिकांमध्ये चर्चा
प्रशासनाकडून स्पष्टतेची अपेक्षा अनिल ठाणेकर ठाणे : मुंबईतील काही भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला आणि फूटपाथवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दादर, चर्नी रोड तसेच काही इतर भागांमध्ये अशा पट्ट्या दिसून आल्याने त्यांच्या उद्देशाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.काही जैन धर्मीय संघटनांच्या मते, ही कृती धार्मिक श्रद्धेशी संबंधित असून, पायाखाली लहान जीव-जंतू चिरडले जाऊ नयेत यासाठी अशा प्रकारच्या खूणा केल्या जातात. मात्र, दुसरीकडे काही नागरिकांनी सार्वजनिक रस्ते आणि फूटपाथ यांचा वापर सर्वांसाठी समान असल्याचे सांगत अशा प्रकारच्या चिन्हांकनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक जागांवर कोणत्याही प्रकारचे रंगकाम अथवा चिन्हांकन करण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत माहिती देण्याची मागणी होत आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, जर ही धार्मिक प्रथा असेल तर तिची माहिती आणि अधिकृत परवानग्यांविषयी प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. तसेच अशा प्रकारच्या कृतीमुळे भविष्यात कोणतेही गैरसमज किंवा सामाजिक तणाव निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरातील विविध धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा सुसंवाद हे मुंबईचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांबाबत पारदर्शकता आणि कायद्याचे समान पालन होणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, या पांढऱ्या पट्ट्यांचे स्वरूप, उद्देश, त्यासाठी घेण्यात आलेल्या परवानग्या आणि संबंधित नियमांविषयी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी आणि सार्वजनिक जागांच्या वापराबाबतचे नियम सर्वांसाठी समानपणे लागू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ००००००००
आता ‘उलटी गिनती’ सुरु- वैभव नाईक
वैभववाडीत भाजपामधून आउटगोईंग…! उबाठा सेनेत प्रवेश…! वैभववाडी : देशात, राज्यात सर्वत्र भाजपामध्ये ‘इनकमिंग’ सुरु असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला ‘आउटगोईंग’चा फटका बसला असून नेर्ले गावचे सरपंच, उप सरपंच यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह ‘उबाठा’ सेनेत प्रवेश केला आहे. ‘उबाठा’ सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. सिंधुदुर्गात आता ‘उबाठा’ सेनेत प्रवेश करण्यास सुरुवात झाल्याचे सांगून आता ‘उलटी गिनती’ सुरु झाल्याची प्रतिक्रिया नाईक यांनी व्यक्त केली आहे. वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो नागरिकांनी काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश घेऊन पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजप पक्षाला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. शिवसेना नेत्यांनी भगवी शाल घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना माजी खासदार राऊत म्हणाले, अनेक संकटे झेलून शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही.भाजपच्या सत्ता काळात देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्हा एका कुटुंबाच्या हातात आपण दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची अपरिमित हानी झाली असून ड्रग्स, गांजा,दारू यासारख्याअवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे.पालकमंत्र्यांच्या मेहरबानीमुळे गोव्यातील ‘कॅसिनो’ देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झाला आहे. मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही.वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत आहे. नागरिकांना गॅस, पेट्रोल, डिझेल मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, नेर्ले गावावर सत्ताधाऱ्यांकडून जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला हे कौतुकास्पद आहे. तुमचा निर्णय चुकला असे कधीही तुम्हाला वाटणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची एकहाती सत्ता आहे. परंतु कुठल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. महागाईच्या प्रश्नावर आपल्याला आंदोलन करावे लागणार आहे असे ते म्हणाले. सत्ताधारी पक्ष अपयशी ठरतो तेव्हाच त्यांचे त्यांचे कार्यकर्ते विरोधी पक्षाकडे वळतात. कार्यकर्त्यांना वापरायचे आणि नंतर फेकून द्यायचे असा राणे कुटूंबाचा देखील इतिहास आहे. परंतु आपण आता शिवसैनिक झाला आहात. आपल्याला न्याय देण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहेत.सिंधुदुर्गातील अवैध धंदे त्यांना रोखता आले नाहीत.त्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनीच जिल्ह्यात अवैध धंदे वाढले असल्याचा आरोप केला आहे. या पक्षप्रवेशाने नितेश राणे आणि भाजपा विरोधात पहिली ठिणगी वैभववाडीत पडली असून आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे लोण पसरणार आहे हे निश्चित असा विश्वास युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला.
‘पुरब की ठुमरी’तून सुनंदा शर्मा आणि मालिनी अवस्थींच्या सुरांची मेजवानी
१५ जून रोजी रविंद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम मुंबई : महाराष्ट्र ललित कला निधीतर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुणिदास संगीत सम्मेलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुगम शास्त्रीय संगीताचा आगळावेगळा कार्यक्रम ‘पुरब की ठुमरी’ सोमवार, १५ जून रोजी…
