Month: June 2026

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्यासाठी केडीएमसी महापौर, आयुक्तांची पाहणी

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, नगरसेविका अनघा देवळेकर…

१५ जूनला नवी मुंबईत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व शुभारंभ

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवा बळकटीकरणांतर्गत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, नवी मुंबईच्या महापौर सुजाता…

 कल्याण लोकसभा मतदारसंघात होणार दहा लाख वह्यांचे वाटप

 खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिक्षणाला बळ देणारा लोकहिताचा उपक्रम कल्याण :  कल्याण लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून यंदा तब्बल दहा लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्यांना मिळणार असून विशेषतः गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरणार आहे. शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा आणि विकासाचा महत्त्वाचा पाया मानला जातो. कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यंदा ही कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरांमध्ये, ग्रामीण भागात तसेच शाळांमध्ये वह्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे पालकांवरील शैक्षणिक खर्चाचा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अधिक उत्साहाने करता येणार आहे. शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने प्रयत्नशील आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व घटकांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वह्यांचे वाटप करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 नगरपालिका सभांचे थेट प्रक्षेपण करा

स्थानिकांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान : सत्ता स्थापन होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही सभागृहात सर्वसाधारण सभा झालेली नाही त्यामुळे जनतेच्या समस्या, विकास कामे, प्रलंबित प्रश्न, पर्यटनाच्या वाढीसाठी धोरणात्मक निर्णय याबाबत काही ठोस उपाययोजना करता आलेली नाही. आज १५ जूनला नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण सभेतील विषय जनतेला माहीत व्हावे यासाठी ही सभा थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. जवळपास तीन वर्षापेक्षा अधिक काळ प्रशासकीय राजवट असल्याने त्या कार्यकाळात जो काही अनागोंदी कारभार सुरू होता. जी कामे पूर्ण करण्यासाठी घाईघाईने प्रयत्न करण्यात आले ती कामे पूर्णपणे निकृष्ठ दर्जाची आणि शासनाच्या पैशाची एकप्रकारे उधळपट्टी झाल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत ह्या गोष्टींचा उहापोह जनतेसमोर यायला हवा. कोणती कामे कशाप्रकारे मार्गी लावली गेली आहेत. काही महत्वपूर्ण कामे पूर्ण झालेली नसताना सुध्दा संबंधित ठेकेदारांना बिले अदा करण्यात आली आहेत. यामध्ये काय गौडबंगाल आहे हे सर्व जनतेच्या निदर्शनास आले पाहिजे यासाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सुध्दा ही सर्वसाधारण सभा थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात यावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ कलम ८१ (२) नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सार्वजनिक असली पाहिजे,कोणत्याही नागरिकाला सभेला हजर राहण्याचा अधिकार आहे. कोट सभा लाईव्ह असणे पारदर्शक कारभाराचे लक्षण आहे आहे.जनतेला या गावाविषयी घेतलेल्या निर्णयांची थेट माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.आपला लोकप्रिय लोकप्रतिनीधी प्रभागातील समस्या कशा मांडुन सोडुन घेतोय हे त्या मतदाराला पाहायला भेटले तर या लोकशाहीत यापेक्षा मोठा आनंद नाही. भास्करराव शिंदे–उद्योजक माथेरान

 गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील बिल्डरांना गिळंकृत करू देणार नाही – अंकुश राजपूत

 कल्याण पूर्वेत मनसेच्यावतीने ५८ वृक्षांचे वृक्षारोपण कल्याण : कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील कोणत्याही बिल्डरांना गिळंकृत करू देणार नाही असा इशारा मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेत गणेश टेकडी येथे ५८ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अंकुश राजपूत बोलत होते. राज ठाकरे हे एकमेव नेते असे आहेत जे त्यांच्या वाढदिवसाला देखील कुठलीही गोष्ट कोणत्याही कार्यकर्त्यांकडून मागत नाहीत. राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिनी कार्यकर्त्यांना झाडे लावण्याचे तसेच पाणवठे तयार करण्याचे आवाहन केले होते. जंगलातील झाडे तोडल्यामुळे जंगलातील प्राणी शहरात येत असून हि झाडे तोडण्यामागे बिल्डर लॉबी असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीवर मनसेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हि टेकडी काही वर्षांपूर्वी खूप मोठी होती, मात्र आता हि टेकडी कमी झाली असून आजूबाजूच्या बिल्डरांनी पोखरून खाल्ली असल्याचा आरोप यावेळी अंकुश राजपूत यांनी केला. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार गणेश टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले असून, नागरिकांनी देखील त्यांना जिथे जिथे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करा. अनेक ठिकाणी झाडे तोडून इमारती उभ्या केल्या जात असून यामुळे प्रदूषण वाढले आहे. आजार वाढले आहेत. सत्तेत असलेले सरकार देखील झाडांची कत्तल करत असून, नाशिक मध्ये महाकुंभ मेळ्यासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मनसेची नाशिक मध्ये सत्ता असताना कुंभमेळा झाला होता. यावेळी एकही झाड तोडण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील झाडे न तोडता वृक्षारोपण करण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी केले आहे. ००००

विवाहविषयक जाहिरातीतून महिलांना गंडविणाऱ्या भामट्याला अटक

– घटस्फोटित, दिव्यांग आणि असुरक्षित महिलांना लक्ष्य; गुन्हे शाखेची मोठी कारवाई मिरा -भाईंदर : एका महत्त्वपूर्ण कारवाईत, गुन्हे शाखा युनिट-१ ने एका आंतरराज्यीय ठगाला अटक केली आहे. हा आरोपी विवाहविषयक संकेतस्थळे आणि वर्तमानपत्रांमधील जाहिरातींच्या माध्यमातून घटस्फोटित, दिव्यांग, मानसिकदृष्ट्या अक्षम आणि असुरक्षित महिलांना लक्ष्य करत असे. तसेच, बनावट विवाह आणि खोट्या ओळखीचा वापर करून त्याने या महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही अटक २०२२ मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात करण्यात आली आहे. या प्रकरणात एका ७५ वर्षीय महिलेने आरोप केला होता की, आरोपीने “अजय अग्रवाल” असल्याचे भासवून २०१९ मध्ये तिच्या ४५ वर्षीय मुलीशी लग्न केले आणि नंतर कुटुंबाची ९७ लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने लखनौमध्ये घर बांधून देण्याचे आणि नवीन फ्लॅट घेऊन देण्याचे आश्वासन देऊन त्या कुटुंबाला त्यांचा मीरा रोड येथील फ्लॅट विकण्यास प्रवृत्त केले. त्याने टप्प्याटप्प्याने ८२ लाख रुपये रोख रक्कम घेतल्याचा आरोप आहे. आणखी एका घटनेत, त्याने पीडितेला कौटुंबिक लग्नासाठी दिल्लीला नेले आणि तिथे तिला सोडून पळून जाण्यापूर्वी ३३ तोळे सोने व हिऱ्यांचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचा मागोवा घेत त्याला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे शोधून काढले आणि २४ मे २०२६ रोजी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून “जयप्रकाश गुप्ता” या नावाने बनवलेले बनावट आधार कार्ड, तीन मोबाईल फोन आणि एक एटीएम कार्ड जप्त केले. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपीचे खरे नाव अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असे आहे. महिलांचा विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी तो अजय अग्रवाल, अजय संतोष सिंग आणि जयप्रकाश रमेशचंद्र गुप्ता अशा विविध बनावट नावांचा वापर करत असे. पोलिसांनी सुमारे २० लाख रुपये किमतीची BMW X१ कार देखील जप्त केली आहे, जी कथितरित्या फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून खरेदी करण्यात आली होती. पुढील तपासात असे समजले की, आरोपी अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या आणखी एका गुन्ह्यात हवा होता; तिथे त्याने एका महिलेशी बनावट ओळख सांगून लग्न केले आणि तिची २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. अशाच पद्धतींचा वापर करून आरोपीने अनेक राज्यांमधील २५ हून अधिक महिलांची फसवणूक केली असावी, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. तपासादरम्यान आरोपीचा मुलगा अविरल ऊर्फ प्रखर अनुज कुमार त्रिवेदी (वय २७) याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे; त्याच्यावर फसवणूक करण्यात वडिलांना मदत केल्याचा आरोप आहे. त्याला या प्रकरणात सह-आरोपी करण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट-१ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “आरोपीने बनावट ओळख निर्माण करून आणि लग्न व सहजीवनाचे आश्वासन देऊन महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले व त्यांची फसवणूक केली.” प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की, देशभरातील २५ हून अधिक महिला त्याच्या फसवणुकीला बळी पडल्या असाव्यात. “आम्ही अशा कोणत्याही महिलेला किंवा कुटुंबाला आवाहन करतो ज्यांची या व्यक्तीने मॅट्रिमोनिअल प्लॅटफॉर्म्स किंवा लग्नाच्या प्रस्तावाद्वारे फसवणूक केली असेल, की त्यांनी त्वरित ‘क्राइम ब्रँच युनिट-१’ शी संपर्क साधावा,” असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर पोलीस या कथित देशव्यापी फसवणुकीच्या जाळ्याची व्याप्ती तपासण्याचे आणि आणखी पीडितांचा शोध घेण्याचे काम करत आहेत.

उल्हासनगरात मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गुलाब पवार यांची निवड

सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगरात मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ठाणे वैभवचे उल्हासनगर प्रतिनिधी गुलाब पवार यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळी पार पडली. मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय राजगुरू यांनी आपला पदभार नवयुक्त अध्यक्ष गुलाब पवार यांच्याकडे सोपवला. त्यावेळी ज्येष्ठ दिनेश गोगी, राजू गायकवाड, रामेश्वर गवई प्रमोद दळवी, संजय राजगुरू तसेच पत्रकार सुनील इंगळे, शिवाजी वाघ, प्रकाश सोनवणे आधी पत्रकारांनी गुलाब पवार यांना शुभेच्छा दिल्या. गुलाब पवार यांची उल्हासनगर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव होत आहे. ००००००००

१० कोटीच्या महावितरण, बीएसएनएल केबल चोरी टोळीचे राज्यभर जाळे

 अधिकाऱ्यांसह नाशिकमधील बड्या राजकीय नेत्यांचाही सहभाग ? हरिभाऊ लाखे नाशिक –महावितरण कंपनी तसेच बीएसएनएलच्या महागड्या भूमिगत केबलची चोरी करणाऱ्या टोळीचे जाळे उदध्वस्त करण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आले असले तरी हे…

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे राज्याच्या विकासात आणि सामाजिक उपक्रमांत मोलाचे योगदान : देवेंद्र फडणवीस

मुंबई : गेल्या सात वर्षांत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने महाराष्ट्रात जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला असून,…

डॉ. हेमराज शाह यांनी सत्तेशिवाय समाजसेवेचा आदर्श निर्माण केला : डॉ. कुंदन व्यास

गुजराती नगरसेवक सन्मान सोहळ्यात डॉ. हेमराज शाह यांच्या कार्याचा गौरव मुंबई : कोणतीही राजकीय सत्ता किंवा पद हाती नसतानाही बृहन्मुंबई गुजराती समाजाची स्थापना करून, सात मजली गुजराती समाज भवन उभारून आणि…