Month: June 2026

कल्याण-डोंबिवलीत १७ ते १९ जून दरम्यान २० टक्के पाणीकपात

डोंबिवली : दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच कल्याण-डोंबिवलीत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असे. मात्र, यंदा ‘अल निनो’ आणि ‘आयओडी’च्या प्रभावामुळे उन्हाळा अत्यंत रणरणता गेला असून, पावसाळ्याची सुरुवातही लांबणीवर…

 कल्याणच्या बुद्धभूमीचा वाद पुन्हा चिघळणार?

आजपासून स्थानिकांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा कल्याण: कल्याण पूर्वेतील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या विकासासंदर्भात काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘महाबोधी संकुल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्या बैठकीत उपस्थित असलेल्या काही बौद्ध संघटना, स्थानिक भंते यांनी आता या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्या प्रमुख मागण्या अद्याप मान्य झालेल्या नसल्याचा दावा करत १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शांत झालेला बुद्धभूमीचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कल्याण पूर्वेतून वालधुनी उड्डाणपूल जात आहे. हा उड्डाणपूल जात असलेली जागा ही बुद्धभूमी फाउंडेशनची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर या पुलाच्या उभारणीसाठी पालिका प्रशासनाने या जागेवरील गौतम बुद्धांच्या मूर्ती चुकीच्या पद्धतीने बाजूला केल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक मंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत वालधुनी येथील सुमारे ३० एकर जागेवर बौद्ध विहार, स्तूप, विपश्यना केंद्र, रुग्णालय, संशोधन व शैक्षणिक संकुलासह आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादावर पडदा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, बुद्धभूमी फाउंडेशन व भिक्खू संघाशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी आता वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते, बुद्धभूमी परिसरासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूळ प्रश्नांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. परिसरातील कथित अतिक्रमण, जागेच्या मालकी व सीमांकनाचे प्रश्न, पूर्वी झालेल्या कारवाईची चौकशी, तसेच बुद्धभूमीच्या मूळ स्वरूपाचे संरक्षण यासंदर्भातील मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, १५ जूनपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित मागण्यांबाबत शासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या महाबोधी संकुल प्रकल्पामुळे बुद्धभूमीचा विकास होणार असल्याचा दावा एका बाजूने केला जात असला, तरी दुसरीकडे मूळ प्रश्न सुटल्याशिवाय विकास आराखड्याला मान्यता देता येणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे बुद्धभूमीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता १५ जूनपासून प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शासनाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजाच्या मुख्य मागण्या काय? ३० मे २०२६ रोजी झालेल्या कारवाईत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती हटवणे, बौद्ध स्तूप व भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती पाडणे, तसेच ४२ झाडांची तोड करण्यात आल्याचा आरोप स्थानिक भंतेनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ निलबांची मागणी करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्यावर गुन्हा नोंदवून निलंबित करावे, तसेच कारवाईत सहभागी ६०-७० जणांची ओळख पटवून अटक करावी अशी ठाम मागणी स्थानिक भंतेजी यांनी केली आहे. तसेच, विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते प्रेम ऑटो सर्कल दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल बुद्धभूमी परिसराला बाधा न आणता वालधुनी नदीलगत घ्यावा, तसेच बाधित जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. याचबरोबर” बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र ”विकसित करून भव्य बुद्ध विहार, विपश्यना केंद्र, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल व ५० मीटर उंच बुद्ध मूर्ती उभारण्याची मागणी ही करण्यात आली आहे.

ग्राहकांच्या तक्रारींमध्ये स्मार्ट मीटरमुळे मोठी घट

मुंबई :राज्यात महावितरणतर्फे आतापर्यंत १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडींग होते. राज्यात स्मार्ट मीटरचे प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या आहेत.…

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपचे पाटील – कथोरे आमनेसामने

ठाणेः ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांमधील वाद ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपचे मुरबाड विधानसभा…

प्रसिध्द रील स्टार प्रेम भाटी यांचा खडीवर दुचाकी घसरून मृत्यू

कल्याण : कल्याण जवळील मोहने येथील प्रसिध्द रील स्टार प्रेम भाटी (३०) यांचा शनिवारी मध्यरात्री मोहने येथील आपल्या घरी दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर पडलेल्या खडीवर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू…

पाऊस लांबल्याने शहापूरमध्ये तीव्र पाणीटंचाई

धरणांचा तालुका असलेल्या शहापूरमध्ये पाण्यासाठी रणकंदन कसारा: मुंबई, ठाणे आणि कल्याणची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा पाऊस लांबल्याने पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. भातसा, तानसा, वैतरणा आणि मध्य वैतरणा या महाकाय धरणांच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींना मात्र घोटभर पाण्यासाठी डोंगर-दऱ्या तुडवत मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. एकीकडे प्रकल्पांसाठी लाखो लिटर पाणी सहज उपलब्ध होत असताना दुसरीकडे तहानेने व्याकूळ झालेल्या आदिवासींच्या वाट्याला कोरडी घागर आणि प्रशासनाची उदासीनता आली आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या योजनांमुळे आणि पाऊस उशिरा पडल्याने शहापूरमधील पाणीटंचाई आता मानवी संकटात रूपांतरित होत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूरमध्ये शेकडो गावे आणि पाड्यांतील नागरिकांना उन्हाळा सुरू होताच पाण्यासाठी डोंगर-दऱ्या पालथ्या घालाव्या लागतात. विहिरी, कुपनलिका, ओढे आणि नदीपात्रे कोरडी पडल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुले मैलोनमैल चालत पाण्याचा शोध घेत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, टंचाई निवारणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. २००८ पासून मंजूर असलेल्या अनेक नळपाणी पुरवठा योजना आजही भ्रष्टाचार, दिरंगाई आणि निष्क्रियतेच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. परिणामी, धरणांच्या उंबरठ्यावर राहणाऱ्या आदिवासींच्या नशिबी आजही पाण्यासाठीची वणवण कायम आहे. एका बाजूला नागरिक घोटभर पाण्यासाठी त्रस्त असताना दुसऱ्या बाजूला मोठ्या रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांसाठी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिकांच्या मते, रोज तीन ते चार लाख लिटर पाणी विविध प्रकल्पांकडे वळवले जात असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. गरीब आदिवासींना पाणी मिळत नसताना प्रकल्पांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. टंचाईग्रस्त भागात बांधण्यात आलेले अनेक बंधारे निकृष्ट कामांमुळे पाणी साठवण्यात अपयशी ठरत आहेत. पाटबंधारे आणि वन विभागाने दुरुस्ती केलेल्या काही बंधाऱ्यांमध्येही पाणी टिकत नसल्याने ते कोरडे पडले आहेत. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांवर खर्च झालेला निधीही वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. कळभोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच जया सोमनाथ वाख म्हणाल्या, मुंबईकर धरणातील शुद्ध पाण्याचा आनंद घेत आहेत; पण धरणालगत राहणाऱ्या आम्हाला पाणीही मिळत नाही. हा आमच्या नशिबी आलेला अन्याय आहे. यंदा हवामानातील बदल आणि एल निनोच्या परिणामामुळे पाणीस्रोत झपाट्याने आटत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या योजनांमुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहापूरमधील आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे. धरणांच्या कुशीत राहूनही तहानेने होरपळणाऱ्या या नागरिकांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यात मिळाला तरुणांना रोजगार

 नगरसेविका रेश्मा निचळ यांचा उपक्रम कल्याण : शिवसेना, ताठे स्टाफिंग आणि के. सोपानराव निचळ फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात कल्याण पूर्वेतील अनेक बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळाला. केडीएमसीच्या प्रभाग क्र. ११ च्या शिवसेना नगरसेविका रेश्मा निचळ आणि विभाग प्रमुख किरण निचळ यांच्या वतीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी निचळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या असून १०वी, १२वी,  आयटीआय, डिप्लोमा तसेच सर्व शाखांच्या पदवीधर उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी थेट मुलाखत घेऊन त्वरित निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये अनुभवी  आणि फ्रेशर या  दोघांसाठीही संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच आलेल्या उमेदवारांना  करिअर बाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले असून सोमवार पासून ते कामाच्या ठिकाणी रुजू देखील होणार आहेत. या रोजगार मिळालेल्या युवकांनी नगरसेविका रेश्मा निचळ आणि विभाग प्रमुख किरण निचळ यांचे आभार मानले.

फटका गँगच्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केली अटक

कल्याण : शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या अमरावती एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या हातावर बांबूने फटका मारून त्याचा महागडा मोबाईल पाडून चोरी करणाऱ्या फटका गँगच्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या…

नगरपालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने अलेक्झांडर हॉटेलमध्ये विनापरवाना कामांना वेग !

मुकुंद रांजाणे माथेरान : धनाढ्य मंडळींनी बिनधास्तपणे अव्वाच्या सव्वा बांधकामे करा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशीच काहीशी भूमिका बजावत माथेरान नगरपालिका प्रशासन अधिकारी आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या सत्तेतील ज्या…

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉलचे वाटप

रायगड -अलिबाग : (अशोक गायकवाड )—अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील पादत्राणे दुरुस्ती व्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक व्यवसाय करता यावा या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या गटई स्टॉल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील…