Author: bittambatami.com

माथाडी सुरक्षारक्षक-श्रमजिवी युनियनच्या नवीन कार्यालयाचे आज उदघाटन

नवी मुंबई: अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक-श्रमजिवी आणि जनरल कामगार युनियन तसेच अखिल भारतीय कामगार सहकारी पतपेढीच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन सोमवारी ७ सप्टेंबरला होणार आहे,असे युनियनचे अध्यक्ष राजन म्हात्रे- सरचिटणीस अरुण…

दिवा मुंब्रादेवी कॉलनीतील गुरुदर्शन नगरमध्ये रस्त्याचे लोकार्पण

– नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते उदघाट्न दिवा : दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील गुरुदर्शन नगर येथे ‘वचनपूर्ती’ रस्त्याचे लोकार्पण रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या…

दिव्यात सण, उत्सवाच्या काळात उभारणाऱ्या कमानींवर कारवाईची मागणी

  दिवा : दिवा शहरात सण उत्सवाच्या काळात उभारणाऱ्या कमानींवर पत्रकारांनी कारवाईची मागणी केली आहे. दिवा शहरातील प्रमुख रस्ते, चौक, प्रवेशद्वार, फुटपाथ तसेच सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत कमानींना प्रतिबंध…

कळव्यात ‘लीगल एड क्लिनिक’ सुरू

गरजू नागरिकांना मिळणार मोफत कायदेशीर सल्ला व मदत अनिल ठाणेकर ठाणे : असंघटित क्षेत्रातील कामगार, वंचित महिला, गरजू नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती मिळावी तसेच मोफत…

ठाणे महापालिकेच्या ‘आपत्ती योद्ध्यां’ना राष्ट्रीय शौर्याचा सलाम

  अनिल ठाणेकर ठाणे : संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती योद्ध्यांच्या धाडसाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. अग्निशमन दलातील फायरमन, ठाणे आपत्ती प्रतिसाद…

कोपरीच्या अष्टविनायक चौकात रंगला उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव

एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘नशामुक्तीची हंडी’ अनिल ठाणेकर ठाणे : शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने कोपरी येथील अष्टविनायक चौकात आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री…

 कुलाबा,कफ , परेड, गिरगांवसह उपनगरात गोविंदा पथकांचा जल्लोष

डोंगरीत महिला गोविंदा पथकांच्या मुलींचा जल्लोष दिनेश मराठे मुंबई : शुक्रवारी मध्य रात्री बारा सव्वा बारा वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा मुंबईच्या कृष्ण मंदिरांसह अन्य मंदिरातही संपन्न झाला.गोविंदा गोपाळा चा गजर करीत दक्षिण मुंबईत गोविंदा पथकांची सकाळी १० वाजल्या पासूनच मानाच्या दहि हंड्या फोडण्यास चुरस वाढू लागली.शुक्रवारी दिवसभर मुंबईत आकाशातून श्रावणी सरीवरसरी बरसणाऱ्या पावसाचा शनिवारीही असाच मारा राहिल्यास गोविंदा पथकांना त्याच्या मोठया आव्हानाला सामोरे जावेच लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र शनिवारी मुंबईच्या काही भागात अगदीच तुरळक झालेल्या वरुणराजाच्या श्रावणी जलधारांचा होणारा अभिषेक, उंचावर बांधलेल्या दहीहंडीच्या उंचीच्या थरांचा अंदाज घेत विविध गोविंदा पथकांनी मोठया रुबाबात सलामी फोडल्या. खास करून मुंबईच्या दक्षिण टोकाकडील कुलाबा, कफ परेड, वाळकेश्वर येथून पुढे फोर्ट, काळबादेवी, मलबार हिल,डोंगरी,उमरखाडी, गिरगावसह दक्षिण मुंबईतील मानाच्या दहीहंड्या गोविंदा पथकांनी विजयी सलामी देत फोडल्या. यावेळी गोविंदांच्या हंडी फोडण्याचा थरार आणि साहस पाहताना लोकांच्या काळजाचे ठोके चुकत होते. गोविंदांची शिस्तबद्धपणे एकावर एक मानवी मनोऱ्यांचे थर रचत दहीहंडी सर करण्यासाठी चाललेली लगबग माझगाव, डोंगरी, मशीद बंदर, कुलाबा, कफ परेड, मेट्रो, फोर्ट, वाळकेश्वर, मलबार हिल, उमरखाडी, कुंभारवाडा, खेतवाडी, भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल, बीडीडी चाळ, ग्रांट रोड, गिरगाव, ताडवाडी परिसरात पाहायला मिळत होती. ‘अरे बोल बोल बोल… बजरंग बली की जय’ आणि ‘गोविंदा रे  गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा ‘ चा जयघोष करीत उमरखाडी नाक्यावर मनसेच्या राजन दळवी, आज्ञा भोसले आणि वीरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या हंडया विविध गोविंदा, महिला गोविंदा पथकांनी रचलेल्या चार, पाच आणि सहा थरांच्या पहिल्याच प्रयत्नात फुटल्याने त्यांनी मोठा जल्लोष केला. जे.जे. रुग्णालयाच्या नवयुग गोविंदा,यंग उमरखाडी गोविंदा,श्रीराम महिला गोविंदा पथक, श्रीकृष्ण गोविंदा पथक, यांनी ४,५,६,७ थरांची दहीहंडी मानवी मनोरे रचत तीन एक्के लावत सलामी देत पहिल्याच प्रयत्नात लीलया फोडल्या. तरुण गोविंदाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हंडी फोडल्यानंतर बक्षीस स्वीकारताना ओसंडून वाहताना दिसत होता.मुंबईकर गोविंदा आणि दहीहंडीचा थरारक खेळ अगदी सकाळपासून अनुभवत होते; तर गोविंदा आला रे आला, गोविंदा रे गोपाळा, शोर मच गया शोर, मच गया शोर सारी नगरी रे, ‘हमाल दे धमाल’मधील’ ढाक्कुमाकुम’सारखी लोकप्रिय गाणी सर्वत्र वाजत होती.या गाण्याच्या चालीवर तरुणाई जमिनीवर पाय रोवत ठेका देताना दिसत होती.गोकुळाष्टमीला उमरखाडीतून निघालेल्या पौराणिक शोभायात्रेचे गोविंदा प्रेमीनी,आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले.उमरखाडी येथील मनसेच्या दही हंडी सोहळ्यात शाखा अध्यक्ष  राजन दळवी,महिला शाखा अध्यक्ष आज्ञा भोसले, उषा पाटील, आशा पाटील, रुषाली लांडगे, राजेंद्र म्हात्रे, ललित ठाकूर, जी के वाघेला, रणछोड राठोड, संजय लांडगे यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.

लाकडाची भट्टी वापरणाऱ्या नामांकित बेकरीवर एफडीएची कारवाई

पाव तयार करून शहरातील विविध दुकानांमध्ये केला जात होता पुरवठा कल्याण : पाव तयार करण्यासाठी लाकडाची भट्टी वापरल्याच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने कल्याणमधील नामांकित प्रिन्स बेकरीवर कारवाई करून ती…

वृक्षारोपणातून पालिका अधिकाऱ्यांनी दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश

दिनेश मराठे मुंबई : निसर्गाच्या संवर्धनासाठी संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा सुप्रसिद्ध अभंग रचला. जवळपास पावणेचारशे वर्षे होऊनही या अभंगाचे महत्त्व आजही अबाधित आहे. सजीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईतील, राज्यातील तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प पूर्ण केल्यास खऱ्या अर्थाने आपली वसुंधरा हरित होईल आणि भविष्यातील पिढीला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असा संदेश पालिकेच्या बी वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंगरी येथील सिताराम शेनॉय उद्यानात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता राकेश कुमार झा, सहाय्यक अभियंता रुपेश भडांगे, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश जोगदंड, सहाय्यक अभियंता अरुण वैद्य, डोंगरी पब्लिक स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर शालेय विद्यार्थी, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डोंगरी, उमरखाडी आणि सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन मार्गावर वृक्ष दिंडी काढून झाडे लावा, झाडे जगवा  पृथ्वी वाचवा असा संदेश दिला. ००००००

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माहीम विधानसभा व धगधगती मुंबई परिवार यांच्या वतीने आयोजित दहीकाला उत्सव २०२६ साजरा करण्यात आला. अमर सुभाष गोविंदा पथक यांनी आठ थर लावून ही दहीहंडी फोडली.त्यांना सन्मानचिन्ह,रोख रक्कम देताना नगरसेवक निशिकांत शिंदे शाखाप्रमुख शैलेश माळी आयोजक विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, भीमराव धुळप, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे,आदी मान्यवर उपस्थित होते. या उत्सवाला नगरसेवक यशवंत किल्लेदार, स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती दर्शवली होती. ०००० ०००००