Author: bittambatami.com

 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर रुजू

 जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून स्वागत सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील खातेप्रमुखांनी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. अपूर्वा बासूर या २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी असून, प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी वाशिम येथे अतिरिक्त सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले.

एमएससी बँक प्रायोजित महापौर चषक मोफत शालेय कॅरम स्पर्धा २६ सप्टेंबरपासून

मुंबई : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय मुलामुलींची मोफत एकेरी कॅरम स्पर्धा २६ सप्टेंबरपासून…

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धा

टॉप सीडेड सोहम पाठकला पुरुष एकेरीचे जेतेपद मुंबई : गोरेगाव स्पोर्ट्स क्लब आणि बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धेत…

सीबीएसई राष्ट्रीय तायक्वाँडो स्पर्धेसाठी हित्ती साळवीची निवड

मुंबई : खेलो तायक्वांडो अकादमीची उदयोन्मुख खेळाडू हित्ती दिनेश साळवी हिची १४ वर्षांखालील मुलींच्या ३८ किलो वजनी गटात होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय तायक्वाँडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात…

 डहाणुकर कॉलेजचे जलतरणातील वर्चस्व कायम

आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धा २०२६ २५ वैयक्तिक पदकांसह सलग तिसऱ्यांदा पुरुष संघाचे विजेतेपद डोंबिवली : म. ल. डहाणुकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), विलेपार्ले यांनी आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धा २०२६ मध्ये दमदार कामगिरी…

विद्यार्थ्यांच्या गणित कौशल्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

  रमेश औताडे मुंबई : देशभरातील विद्यार्थ्यांच्या मानसिक गणिताच्या कौशल्याला व्यासपीठ देणाऱ्या यू सी एम ए एस राष्ट्रीय स्पर्धा २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित…

आज आरसीएफ क्रिकेट निवडचाचणी

  मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे (एमसीए) आयोजित स्पर्धांमध्ये राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर (आरसीएफ) क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आरसीएफ स्पोर्ट्स क्लबतर्फे क्रिकेट निवडचाचणी (ट्रायल्स) आयोजित करण्यात आली आहे. ही चाचणी सोमवारी…

योगासन स्पर्धेत एसआयए, एसएसटीचा दबदबा!

– मुलींच्या वैयक्तिक गटात एसआयएचे क्लीन स्वीप भानुदास गायकवाड डोंबिवली : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागीय क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रगती महाविद्यालय, डोंबिवली (पूर्व) यांच्या आयोजनाखाली आंतरमहाविद्यालयीन योगासना स्पर्धा प्रगती…

दिवा प्रभागातील विकासकामांची आयुक्त सौरभ राव यांच्याकडून पाहणी,

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिवा : दिवा प्रभाग समिती हद्दीतील विविध विकासकामांची ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा सविस्तर आढावा घेतला.…