Author: bittambatami.com

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण : जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि सत्यमेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य व मासिक पाळी जनजागृती विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व मुलींनी…

ठाणे महानगरपालिका व शेल्टर असोसिएट्सच्या वतीने   राजे श‍िवाजी विद्यालयात ‘मासिका महोत्सव’

ठाणे : जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएट्स संस्था आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य नगर येथील राजे शिवाजी शाळेत “मासिका महोत्सव” आयोजित करण्यात आला. मासिक पाळी…

माथेरानच्या ई रिक्षा स्टँडने घेतला मोकळा श्वास

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींची अनधिकृत टपऱ्यांवर धडक कारवाई मुकुंद रांजाणे माथेरान : मागील दोन ते तीन वर्षांपासून दस्तुरी ते टपाल पेटी नाक्यापर्यंत जागोजागी अनधिकृतपणे टपऱ्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र विद्रुपीकरण पहावयास मिळत आहे. पावसाळ्यात याच टपऱ्यांवर प्लास्टिक टाकण्यात येते त्यामुळे आपण एखाद्या ग्रामीण भागात आलो आहोत की काय असा भास पर्यटकांना झाल्याशिवाय राहत नाही. दिवसेंदिवस अशाप्रकारे वाढत्या टपऱ्या आगामी काळासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. इथले पर्यावरण त्याचप्रमाणे झाडी नष्ट होण्यास कारणीभूत ठरू शकतात ही बाब ओळखून नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी २८ मे  रोजी सायंकाळी स्वतः दस्तुरी येथील ई रिक्षा स्टँडवरील सर्व अनधिकृत टपऱ्या काढून टाकल्या आहेत. त्यामुळे रिक्षा स्टँड भोवती जो काही टपऱ्याचा गर्हाडा निदर्शनास येत होता तो काहीअंशी का होईना दूर करण्यात आला असूच ई रिक्षा स्टँडने मोकळा श्वास घेतला आहे. बहुतेक टपरी धारक हे परिसरातील असून काही वर्षांपूर्वी इथे स्थानापन्न झालेले आहेत. दस्तुरी पासून ते टपाल पेटीच्या नाक्यापर्यंत सर्वत्र ह्या टपऱ्या वाढत चाललेल्या आहेत. ई रिक्षा स्टँड ते अमन लॉज स्टेशन पर्यंत संपूर्ण रस्ता मोकळा झाल्यास पर्यटकांना, नागरिकांना चालणे सुलभ होऊ शकते. बाजारपेठ मधील मुख्य रस्त्यावरील सुध्दा जी काही हॉटेल धारकांनी विद्रुपीकरण केलेली आहेत ती सुद्धा वेळीच काढून टाकल्यास संपूर्ण भाग सुंदर आणि स्वच्छ राखण्यासाठी नगरपरिषदेला मदत होऊ शकते असे नागरिक बोलत आहेत. शासकीय अधिकारी वर्ग नियमितपणे दस्तुरी पासून आरामात ई रिक्षांची सुविधा उपभोगून येत असतात.परंतु डोळ्यासमोर दिसत असून सुद्धा ही अनधिकृत कामे हटविण्यास दिरंगाई करत होते. केवळ पगारापूरते कामे करणारी काही अधिकारी मंडळींची जबाबदारी असताना देखील बघ्याची भूमिका बजावत होते. अखेरीस स्वतः नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी ही अनधिकृत कामे दूर केली आहेत. 00000000

 “राजकारण बाजूला ठेवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!”

NEET घोटाळा नाशिकमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन हरिभाऊ लाखे नाशिक : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज दिनांक २९ मे २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकचे जिल्हाध्यक्ष मिहिर प्रमोद गजबे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतनजी गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा महासचिव विश्वनाथ भालेराव, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष रवी पगारे, दामोदर पगारे, राजू दादा दोत्रे, डॉ. अनिल कुरे, अमोल चंद्रमोरे, दीपक पगारे, युवराज मनारे, ताराचंद मोतमल आदी उपस्थित होते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने अनिकेत काशीद, आदित्य निरभवणे, सम्यक बच्छाव, श्रेयस अहिरे, विजय सावंत, पूर्वेश, यश जाधव, ऋत्विक जाधव, वैभव वानखेडे, सम्राट संघारे, प्रणव खंडीजोड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी बोलताना मिहिर गजबे म्हणाले, “पेपर फुटीच्या या सत्रामुळे देशातील अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा.” आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीने, “हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे आवाहन केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशातील सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा आर्थिक व मानसिक संघर्ष यावर पाणी फेरले गेले असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. NEET ची फेरपरीक्षा तात्काळ जाहीर करून ती पूर्णपणे विनामूल्य घेण्यात यावी. Public Examinations (Prevention of Unfair Means)…

घोड्यावर बसून कल्याणमध्ये कॉंग्रेसचे मेलोडी चॉकलेट वाटप

इंधनदरवाढ आणि वाढत्या महागाईचा केला निषेध कल्याण : इंधन दरवाढीच्या विरोधात कल्याणात काँग्रेसचे अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले. स्टेशन परिसरात काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी घोड्यावर बसून मेलोडी चॉकलेटचे वाटप केले. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधनदरवाढ आणि त्यामुळे होत असलेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  कल्याण स्टेशन परिसरात  निषेध आंदोलन करत भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान याच घोड्यावर बसून कॉंग्रेसने तहसीलदार कार्यालय गाठत, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

श्रमजीवी संघटनेचे पाण्यासाठी मडकं आंदोलन

मिरा -भाईंदर :निवडणुकीपूर्वी पाणी देणार असं आश्वासन देणारे आज दिसत नाहीत आणि गरिबांना,  आदिवासीना पाणी मिळत नाही,  असं म्हणत श्रमजीवी संघटनेच्या सुलतान पटेल यांच्या नेतृत्वाखाली हंडा / मडक मोर्चा काढण्यात आला. महापालिकेच्या…

भाईंदर शहरात मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांना एकही वीट रचू देणार नाही

प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा! मिरा -भाईंदर :मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी माणसाचा सन्मान राखावाच लागेल हाच बाणा पुन्हा एकदा दाखवून देत मिरा -भाईंदरमध्ये घडलेल्या एका संतापजनक घटनेविरोधात मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पवित्र घेतला. स्वतःच्या कष्टाने आणि स्वाभिमानाने ‘शिंदे गुळाचा चहा आणि नाश्ता सेंटर’ चालवून कुटुंबाचा आधार बनलेल्या मराठी भगिनी सौ. रविना शिंदे यांना ‘तू मराठी आहेस’ म्हणून घर नाकारण्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी या नात्याने मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविना यांच्या स्टाॅलला भेट देऊन तिच्या हातचा चहा पिला आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली आणि शिंदे कुटुंबाला धीर दिला. एवढेच नव्हे तर मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या त्या संबंधित घरमालकाला तत्काळ घटनास्थळी बोलावून घेत मंत्री सरनाईक यांनी अत्यंत कठोर शब्दात त्यांची कानउघडणी केली आणि त्याला कायदेशीर परिणामांची जाणीव करून दिली. पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश; कायदेशीर कारवाईचा बडगा या संतापजनक प्रकाराची केवळ दखल न घेता, मंत्री सरनाईक यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. संबंधित घरमालकाविरोधात पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तातडीने पत्र देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी माणसाच्या स्वाभिमानाशी आणि हक्काशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. ते पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दांत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मातीत राहून मराठी माणसाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. जर कोणी चुकीच्या पद्धतीने दादागिरी, दंडुकेशाही किंवा गुंडगिरी करत असेल, तर त्याला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल.  यापुढे कोणत्याही मराठी माणसाला घर नाकारले गेल्याचे समोर आले, तर तिथे जाऊन थेट जाब विचारा, अशा कडक सूचना मी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अखंड पुरवठ्यासाठी इंडियन ऑइलचा राज्य प्रशासनाशी समन्वय

मुंबई : देशातील विविध भागांमध्ये इंधनाच्या मागणीत वाढ होत असतानाही इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) ने पेट्रोल (एमएस), डिझेल (एचएसडी) आणि एलपीजीचा अखंड व सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आपली कार्यप्रणाली…

मुदत संपूनही पार्किंग वसूली सुरू

घाणेकर नाट्यगृह, आशर संकुलात नगरसेवक संजय वाघुले यांचा आरोप, कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणे : महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह व पोखरण रोड क्र. २ येथील आशर कॉम्प्लेक्समधील वाहनतळाची मुदत संपल्यानंतरही महापालिकेच्या स्थावर व मालमत्ता विभागाच्या संगनमताने संबंधित कंत्राटदारांकडून पार्किंग शुल्काची वसूली सुरू आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे. या वसूलीतून ठाणे महापालिकेच्या नुकसानीबरोबरच हजारो ठाणेकरांची लूट करण्यात आली. या प्रकरणी संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील वाहनतळाच्या ठेकेदाराची मुदत २०२३ मध्ये आणि आशर कॉम्प्लेक्स मधील वाहनतळाची मुदत २०१६ मध्ये संपुष्टात आली. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने नवीन निविदा काढलेली नाही. मात्र, या ठिकाणी आजही बेकायदेशीर पद्धतीने पार्किंग वसूली केली जात आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या नावाच्या कागदी पावत्या वाहनधारकांना देऊन दिशाभूल केली जात आहे. तसेच त्यातून हजारो ठाणेकरांची फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. या प्रकरणी १५ मे रोजीच्या महासभेत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, या महासभेत ऐनवेळी सर्व विषय मंजूर झाल्यामुळे प्रश्नांवर चर्चा करता आली नाही. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बेकायदेशीरपणे पार्किंग शुल्काची वसूली करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

मंगळवारी केडीएमसी क्षेत्रात पाणी कपात

कल्याण : भारतीय हवामान खात्याने घोषित केल्यानुसार यावर्षी अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्याने ३१/०८/२०२६ पर्यंत पेयजलाचे नियोजन करण्याचे निर्देश सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्त आहेत. त्यानुसार…