Category: होम

पुरुष आणि महिला एकेरीत राहुल बैठा, रथिका सीलन विजेते

 बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुली स्क्वॉश स्पर्धा मुंबई, ३ सप्टेंबर: ४९व्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश स्पर्धेत पुरुष आणि महिला गटामध्ये दुसरा मानांकित राहुल बैठा आणि तिसरी मानांकित रथिका…

 अव्वल मानांकित हेजल जोशीची आगेकूच

 मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धा मुंबई, ३ सप्टेंबर : गोरेगाव स्पोर्ट्स क्लब आणि बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व…

भायखळ्यात एल आय सी पुरस्कृत दहीहंडी सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: संत हारळे चैरिटेबल ट्रस्ट LIC पुरस्कृत यांच्या वतीने आयोजित ‘दहीहंडी मनसे सराव शिबिर २०२६’ भायखळा घोडपदेव येथे उत्साहात पार पडले. या सराव शिबिराला विविध गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

रायगडच्या खेळाडूंचे घवघवीत यश…

 राष्ट्रीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा मुंबई… नांदेड येथे आयोजित १७व्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या या यशात रायगडच्या खेळाडूंनी मोठा हातभार लावला.रायगडच्या खेळाडूंनी या स्पर्धेत  ३१ सुवर्ण,  १४ रौप्य आणि…

ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी

 सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या ‘ज्युनिअर सायंटिस्ट’चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक अनिल ठाणेकर ठाणे-ठाणे जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत…

 नताशा आव्हाड यांनी घेतले ठामपा प्रशासनाला फैलावर

 छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रकरणी अनिल ठाणेकर ठाणे – छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सध्या अनागोंदी माजली आहे. जेवणात झुरळ मिळत आहेत. शौचालयात घाणीचे साम्राज्य आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना २४ तास काम करूनही सुविधा दिल्या जात नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी पालिका अधिकारी भगवान शिंदे आणि रूग्णालय अधिष्ठात्री स्वप्नाली कदम यांना चांगलेच फैलावर घेतले. जर, येत्या आठ दिवसात परिस्थितीत सुधारणा केली नाही तर रूग्णालयातच आंदोलन केले जाईल,  असा इशारा नताशा आव्हाड आणि गटनेते अभिजीत पवार यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील अनागोंदीबाबत नताशा आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी गटनेते कार्यालयात संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांकडून असंबद्ध माहिती दिल्याने नताशा आव्हाड आणि अभिजीत पवार हे चांगलेच संतप्त झाले. या बैठकीनंतर बोलताना नताशा आव्हाड म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात एका रुग्णांच्या जेवणात झुरळ सापडले होते. या संदर्भात आम्ही रूग्णालयाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी तेथे एवढी अस्वच्छता होती की आम्हाला तिथे उभे राहणे शक्य होत नव्हते,  कॅन्टीनच्या बाजूला एक शौचालय आहे,  त्या शौचालयामध्येच  कॅन्टीनमधील भांडी धुतली जात होती. याच ठिकाणी बांधकामाचा राडारोडा पडलेला होता. याबाबत, ठामपाच्या बांधकाम विभागाचे अधिकारी  भगवान शिंदें यांना विचारणा केली असता, “आम्ही एकदम पटापट हे काम करू”, असे उत्तर दिले. त्यांचे हे उत्तर गोलमाल आहे.  आम्ही सहा महिन्यांपूर्वी विजिट केली होती, तेव्हाही कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते, आजही कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे. रुग्णालयाच्या बाहेर बायोमेडिकल वेस्ट, चक्क सॅनिटरी पॅडसारख्या वस्तू उघड्यावर टाकल्या जात आहेत. सर्वात मोठा विषय म्हणजे, प्रशिक्षणार्थी डाॅक्टर्स चोवीस- चोवीस तास,  काम करतात. त्या नंतर ते हॉस्टेलच्या रूममध्ये जेव्हा जातात,  तेव्हा तिथेही त्यांना घाणीत आराम करावा लागत आहे. प्रसाधनगृहातील नळ॔  तुटलेली आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांचे पाणी बंद केले होते. हा प्रकार मानवतेला अनुसरून नाही. आम्ही हा प्रकार सहन करणार नाही, असेही नताशा आव्हाड म्हणाल्या. गटनेते अभिजीत पवार यांनी, सदर बैठकीत भगवान शिंदे हे उडवाउडवीची उत्तरे देत होते. पार्किंगच्या वादातून ते प्रशिक्षणार्थी डाॅक्टर्सवर झालेल्या वादाचा ते राग काढत आहेत. दिवसरात्र काम करणाऱ्या डाॅक्टर्सचे पाणी तीन दिवस बंद करण्यात आले होते. हे सहन करण्यासारखे नाही. आता त्यांना आठ दिवसाची मुदत दिली आहे. आठ दिवसात जर मार्ग निघाला नाही तर अकरा तारखेला आम्ही रूग्णालयावर धडक देऊ आणि सुविधा मिळेपर्यंत तिथेच बसून राहू, असा इशारा दिला.

 ठाणे शहरात एमडीविरोधी पोलिसांची मोठी कारवाई

दोन स्वतंत्र कारवायांत ४ आरोपी अटकेत; २ किलो ८२३ ग्रॅम एमडीसह ५ कोटी ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहरात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ४ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २ किलो ८२३ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ कोटी ६६ लाख ३७ हजार २९० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहिली कारवाई १ सप्टेंबरला रात्री १.५० वाजता घोडबंदर रोडवरील गायमुख बसस्टॉपजवळ करण्यात आली. या कारवाईत मोजीम अब्दुल्ला शेख (वय ४१, रा. मिरारोड) आणि तबरेज अब्दुल्ला शेख (वय ५१) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून अनुक्रमे ५६७ ग्रॅम व ५६ ग्रॅम एमडी, तसेच त्यांच्या ताब्यातील ॲक्सेस स्कूटरच्या डिक्कीतून आणखी १ किलो ४८ ग्रॅम एमडी, असा एकूण १ किलो ६७१ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. या एमडीची किंमत ३ कोटी ३४ लाख २० हजार रुपये असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४६/२०२६ नोंद करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे करीत आहेत. अटक आरोपींना ३ सप्टेंबर रोजी पोलिस कोठडी मंजूर झाली आहे. दुसरी कारवाई कोपरी येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ करण्यात आली. या कारवाईत अब्दुल रेहमान मोईद्दीन कादर शेख (वय ३३, रा. गोवंडी, मुंबई) याच्याकडून १ किलो १५२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. या अमली पदार्थाची किंमत २ कोटी ३० लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासात एमडीचा पुरवठा करणाऱ्या आफ्रिदी मोहम्मद वली शेख (वय २७, रा. रूम सीवुड, नवी मुंबई) यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४८/२०२६ नोंद असून, एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना ताटे करीत आहेत. अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेला एमडी आरोपींनी कोणाकडून आणला आणि कोणाला विक्री करणार होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या तपासातून अमली पदार्थांच्या पुरवठ्याची साखळी आणि त्यामागील अन्य व्यक्तींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने केली. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

जांभूळ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार!

विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन अशोक गायकवाडv मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे जांभूळ येथे इंग्रज राजवटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालकीची असलेल्या जमिनीवर त्यांच्या स्मृतींना साजेसे उचित स्मारक उभारण्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी शासनाकडे प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी दिले. मुंबईतील विधानभवन येथे डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांची भेट घेऊन जांभूळ येथील स्मारकाच्या प्रलंबित प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. या वेळी स्मारक उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय कार्यवाहीला गती देण्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना बनसोडे यांनी, महसूलमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, महिला व बालविकास मंत्री, ठाणे जिल्हाधिकारी, कल्याण तहसीलदार तसेच संबंधित सर्व शासकीय अधिकारी आणि डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक विधानभवनात आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीत प्रलंबित बाबींचा आढावा घेऊन स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तव्याशी व मालकीशी संबंधित जांभूळ येथील जमिनीला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना साजेसे स्मारक उभारण्याची मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत आहे. या शिष्टमंडळात डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे, महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कुसुम गौतम गेडाम, नाट्य व मालिका अभिनेत्री करुणा कातखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ०००००००

वरळी येथे परिवर्तन दहीहंडीचे आयोजन

मुंबई : परिवर्तन इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पांडे यांनी परिवर्तन दहीहंडीचे आयोजन शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ सकाळी ११ ते रात्री १० वा. पर्यंत जांबोरी मैदान, वरळी (मुंबई) येथे केले…

वरळीच्या दहीहंडी सराव शिबिरात अंध गोविंदाची चर्चा

केतन खेडेकर मुंबई : शिवसेना वरळी विभागप्रमुख दत्ता नरवणकर आणि विधानसभा प्रमुख प्रशांत गवस यांच्या वतीने वरळी गांधी नगर येथे दहीहंडी सराव शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सर्व…