Category: होम

 करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची मोठी चालना!

   १८० कोटींच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचा सविस्तर आढावा; पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात पनवेल : उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा परिसराच्या विकासाला आता मोठी चालना मिळणार असून, करंजा परिसरातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे नियोजन, प्राधान्यक्रम आणि अंमलबजावणी याबाबत करंजा सोसायटी येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून आणि प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस मत्स्यपालन विभागाचे अधिकारी, करंजा सोसायटीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते. यावेळी करंजा परिसराच्या विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. करंजा हा परिसर मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी व्यवसायाशी जोडलेला असून, येथील मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन गरजा, व्यवसायाशी संबंधित अडचणी, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता मच्छीमार बांधवांच्या व्यवसायाला आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाला अधिक सुविधा मिळतील, या दृष्टिकोनातून कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. बैठकीदरम्यान उपस्थित मच्छीमार बांधव आणि करंजा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील विविध समस्या, मागण्या आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. विकासकामे राबविताना स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा आणि अपेक्षा लक्षात घेणे आवश्यक असल्याचे आमदार महेश बालदी यांनी यावेळी स्पष्ट केले. १८० कोटी रुपयांच्या निधीतून प्रस्तावित विकासकामांची प्रक्रिया पुढे नेण्यात येत असून, पुढील तीन महिन्यांत या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यामुळे करंजा परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे. विकासकामे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. करंजा परिसराच्या विकासाबरोबरच मच्छीमार बांधवांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक समस्या सोडविणे आणि परिसराचा भविष्यातील विकास सुनिश्चित करणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. विकासकामांच्या अंमलबजावणीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत आणि मंजूर निधीचा योग्य पद्धतीने वापर होऊन त्याचा थेट लाभ स्थानिक नागरिकांना मिळावा, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. “करंजा परिसरातील मच्छीमार बांधव हे आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि स्थानिक विकासाचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अडचणी दूर करून त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे विकासकामांचे नियोजन करताना मच्छीमार बांधवांच्या सूचना आणि अपेक्षांना प्राधान्य दिले जात आहे,” असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्राधान्य आहे. करंजा परिसराच्या विकासासाठी १८० कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जात आहेत. या माध्यमातून करंजा परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि स्थानिक नागरिकांच्या सुविधांमध्ये मोठी भर पडेल. विकासकामे केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” या बैठकीमुळे करंजा परिसरातील मच्छीमार बांधवांच्या विविध प्रश्नांना योग्य दिशा मिळण्याबरोबरच आगामी विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून करंजा परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस जयविंद्र कोळी, नारायण नाखवा, राजेश नाखवा, भारत नाखवा, सागर नाखवा, शिवदास कोळी यांच्यासह पदाधिकारी, मच्छीमार बांधव, मत्स्यपालन विभागाचे अधिकारी आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, नावासमोर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय, कौशल्य विकास, स्टार्टअप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन यांसारख्या विविध योजना राबविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. गणेशभक्तांनी उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करावा, अशा शुभेच्छा देत शिंदे यांनी उपक्रमासाठी आयोजकांचे आभार मानले. रण्याचा प्रयत्न आहे का, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. विभागप्रमुख संतोष ढमाले यांनी लोकमान्यनगरच्या विनाशावर विकासाची इमारत उभी करू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या घरांवर बुलडोझर…

लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून रिंग मेट्रो नको; हजारो नागरिकांचा एल्गार

अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली लोकमान्यनगरातील हजारो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असा आक्रमक इशारा लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीने…

 प्रयोगशाळेतील संशोधन आता शेताच्या बांधावर उतरणार?

दापोलीत कृषी क्षेत्रातील दिग्गजांची ‘परीक्षा’ – ५४व्या संयुक्त कृषी संशोधन-विकास समिती बैठकीत शेतकरीकेंद्री संशोधनावर खल अशोक गायकवाड रत्नागिरी :  शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणींपासून संशोधन दूर राहिले, तर प्रयोगशाळांतील निष्कर्षांचा उपयोग काय? बदलते हवामान, पिकांवरील संकटे, उत्पादनखर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता अशा कोंडीत शेतकरी सापडलेला असताना कृषी संशोधनाला थेट शेतकऱ्यांच्या बांधाशी जोडण्याचे आव्हान दापोलीतील बैठकीसमोर आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सर विश्वेश्वरैय्या सभागृहात उद्घाटन होणार आहे. कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी असतील. मंत्री भरत गोगावले, उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आशिष जयस्वाल आणि खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यातील कृषी संशोधनाची सद्यस्थिती, त्याची उपयुक्तता आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या यंत्रणेवर बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. कृषी आयुक्त सुरज मांढरे, विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी सचिव परिमल सिंग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल यांचीही उपस्थिती राहणार आहे. चौकट बैठकीपुढचे खरे आव्हान संशोधन झाले, निष्कर्ष आले; पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? कृषी संशोधनाचा प्रत्यक्ष शेतीत वापर वाढवणे, शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्यांवर उपाय शोधणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर ठोस दिशा मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये तीन ठळक मुद्दे आहेत. शेतकरीकेंद्री संशोधनाला प्राधान्य देण्याचे आव्हान, बदलत्या हवामानाशी जुळणाऱ्या शेती तंत्रज्ञानावर भर, संशोधनाचा प्रयोगशाळेतून थेट शेताच्या बांधापर्यंत प्रवास. 0000

 बांदल चाळीतील १४९ कुटुंबांना महापालिकेकडून घरे मिळणार

खासदार नरेश म्हस्केंसह नगरसेवक संजय वाघुलेंच्या प्रयत्नांना यश ठाणे : मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नौपाड्यातील बांदल चाळीत ५० वर्षांपासून राहणार्‍या १४९ कुटुंबांना ठाणे महापालिकेकडून घर मिळणार असून, या चाळीतील रहिवाशांच्या बायोमेट्रिक…

पिंपरी डीवायपीसीओइ आणि रावेत पीसीसीओईआर विजयी

 आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा पिंपरी, पुणे : आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस मुले आणि मुलींच्या स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईआर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या संघाने ताथवडे येथील इंदिरा कॉलेज संघाचा पराभव करत विजय मिळवला. मुलींच्या स्पर्धेत रावेत येथील पीसीसीओईआर संघाने आकुर्डी येथील पीसीसीओई संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि रावेत येथील पीसीसीओईआर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  तत्पूर्वी झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यांमध्ये डॉ. डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संघाने राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय संघाचा व इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ताथवडे संघाने पीसीसीओई संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मुलींच्या स्पर्धेत रावेत येथील पीसीसीओईआर संघाने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय संघ आणि पीसीसीओई, सासवड येथील पीडीइए कॉलेज ऑफ फार्मसी संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलांच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण १८ विविध महाविद्यालयांचे संघ तसेच मुलींच्या स्पर्धेत एकूण ८ विविध महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले.स्पर्धेचे उद्घाटन पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सह सचिव डॉ. अक्षय काशीद, डॉ. गणेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. गणेश चव्हाण, निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल कमलापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईआरचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मिलिंद थोरात यांनी केले. यशस्वी संघांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचा अंतिम निकाल :- मुले विजयी :- आकुर्डी डीवायपीसीओइ, उपविजयी :- ताथवडे आयसीसीएस, तृतीय :- निगडी पीसीसीओई,; मुली विजयी :- रावेत पीसीसीओईआर, उपविजयी आकुर्डी पीसीसीओई, तृतीय :- पिंपरी डीवायपीएसीएससी. 0000

मोहन नाखवा यांचे निधन

ठाणे : ठाण्यातील जुन्या फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे संस्थापक सदस्य आणि मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज मोहन नाखवा यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यसमयी त्यांचे वय ८४ वर्ष होते. फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे भरवशाचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणाऱ्या मोहन नाखवा यांना क्रिकेटच्या जोडीने मल्लखांब आणि फुटबॉल खेळाच्या जोडीने भारतासह परदेशात पर्यटन करण्याची आवड होती. बी. टेक असणाऱ्या मोहन नाखवा यांनी नामदेव अँड कंपनी आणि आमोद इंजिनिअर्स वर्क्स या दोन कंपन्यांची स्थापना केली होती. फ्रेंडशिप क्रिकेट क्लबतर्फे श्री आनंद भारती समाजाच्या सभागृहात  झालेल्या शोकसभेत मोहन नाखवा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्री आनंद भारती समाजाचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत सर्वश्री ॲड रमाकांत कोळी, जगदीश कोळी, विजय नाखवा, प्रफुल्ल नाखवा, हर्षद नाखवा, गिरीश तांडेल यांनी समयोजित श्रद्धांजली वाहिली. देवेशू ठाणेकर यांनी नाखवा परिवाराच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोहन नाखवा यांचे चिरंजीव आमोद ,सुन मुक्ता, कन्या डॉ शिल्पा आणि जुई हे नाखवा कुटुंबिय उपस्थित होते.  फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे सचिव प्रल्हाद नाखवा यांनी शोकसभेचे सूत्रसंचालन केले. 0000

खबरदार, वीज चोरी सापडली तर नाव सार्वजनिक होणार

कल्याण : वीज चोरीमुळे महावितरणच्या महसुली नुकसानीचा भार प्रामाणिकपणे वीज देयक भरणार्‍या ग्राहकांवर पडत असल्याने यापुढे वीज चोरी सापडल्यास महावितरण आपल्या पध्दतीने शॉक देणार आहे. वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाचे नाव आणि पत्ता प्रकाशित करण्यात येणार आहे. वीज चोरी मुळे महसुली नुकसान तर होतेच आहे सोबतच शॉर्ट सर्किट, रोहित्र भार वाढल्याने नादुरुस्त होणे, आगीच्या घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे महावितरणने वरील निर्णय घेतला आहे. वीज चोरी करताना आढळून आल्यास संबंधित ग्राहकाचे नाव सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणचे संचालक संचलन धनंजय औंढेकर यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन वरील निर्णय घेतला आहे. वीज चोरी हा सामाजिक अपराध आहे. अनेकदा वीज चोरी करतेवेळी प्राणांतिक अपघात झाले आहेत. वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी अनधिकृत वीज जोडणी अधिकृत करण्याचे आवाहन महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी केले आहे. मागील महिन्यात कल्याण परिमंडळात ११७५ वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून याचे मुल्यांकन झाल्यानंतर संबंधित ग्राहकांची नावे सार्वजनिक करण्याचा महावितरणचा मानस आहे.  

राहुल पिंगळे यांच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा संवाद

ठाणे- काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियाना’ अंतर्गत महाराष्ट्रातील नवनियुक्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांसाठी नाशिक येथे विशेष निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांनी…

गणेशभक्तांच्या गावाकडच्या प्रवासासाठी २९०० एसटी गाड्या सज्ज

‘सण-उत्सव हीच आपली संस्कृती, परंपरा पुढे नेऊया’-  एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला असून, तब्बल २९०० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव राम रेपाळे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, नगरसेवक राजेश मोरे, अनिल भोर, विभागप्रमुख अमित जयस्वाल, किरण नाकती आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, समाजाला एकत्र आणणारी आणि आपली संस्कृती व परंपरा जपणारी मोठी परंपरा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. आजही त्याच परंपरेला पुढे नेत सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक प्रबोधन, विविध विषयांवरील देखावे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. आनंद दिघे साहेबांनी गणेशोत्सव स्पर्धेला सुरुवात करून या उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड दिली, असे सांगत शिंदे यांनी ठाण्यातील गणेशोत्सवाच्या परंपरेचा उल्लेख केला. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी यांसारखे आपले सण-उत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरे झाले पाहिजेत आणि पुढील पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याची मोठी इच्छा असते. मात्र, प्रत्येकाला रेल्वे किंवा अन्य वाहतुकीचे तिकीट मिळेलच असे नाही. त्यामुळे ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिंदे म्हणाले. दरवर्षी हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळानंतर सण-उत्सवांवरील निर्बंध हटवून नागरिकांना उत्साहाने आपले सण साजरे करता यावेत, यासाठी निर्णय घेतल्याचे सांगताना शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील विविध निर्णयांचाही आढावा घेतला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठी समाधान देणारी योजना असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांशी आपले ‘लाडका भाऊ’ म्हणून नाते निर्माण झाले, याचा आनंद आणि समाधान असल्याचे ते म्हणाले.