Category: होम

पीटीकेएसची जिम्नॅस्ट ईशिता रेवाळेची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मुंबई: महाराष्ट्रातील मुंबई येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल(PTKS) ची उदयोन्मुख जिम्नॅस्ट ईशिता रेवाळे हिची ग्लासगो (स्कॉटलंड) येथे २४ ते २८ जुलै दरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी(Commonwealth Games 2026) भारतीय संघात…

मातंग महिला हत्या प्रकरणी सखोल तपासणीची मागणी

रमेश औताडे मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मातंग समाजातील महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेबाबत सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत, दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अशा घटना समाजासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. हत्येमागील खरा सूत्रधार आणि कारणांचा सखोल तपास करून कोणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष चौकशी करावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. शासन आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बॉबी देओलच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सचा शुभारंभ

रमेश औताडे मुंबई: कल्याण ज्वेलर्सने, विरारमध्ये आपल्या पहिल्या शोरूमचा भव्य शुभारंभ केला.  महाराष्ट्रातील आपल्या रिटेल विस्तारातील एक मोठा टप्पा ब्रँडने गाठला आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सोहळ्यामध्ये बॉबी देओल यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.  अनेक मान्यवर पाहुणे आणि स्थानिक ग्राहक यावेळी उपस्थित होते. रमेश कल्याणरामन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,”महाराष्ट्र नेहमीच आमच्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक राहिला आहे. विरारमध्ये आमचे पहिले शोरूम सुरू करून आम्ही आमचे स्थान अधिक मजबूत करत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा विस्तार दर्शवतो की, आम्ही या संपूर्ण परिसरातील ग्राहकांपर्यंत कल्याण ज्वेलर्सचा सर्वोत्तम अनुभव पोहोचवण्यासाठी तत्पर आहोत.

मुंबईतील धोकादायक पागडी (उपकरप्राप्त) इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती

 प्रसाद लाड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मुंबई: मुंबईतील धोकादायक उपकरप्राप्त (पागडी) इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेत प्रभावीपणे उपस्थित करणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या सातत्यपूर्ण…

दिवंगत अर्जुन पाटील यांना भजन-कीर्तनद्वारे आदरांजली!

– महेंद्रशेठ घरत यांनी केले पत्रकार कृष्णा पाटील यांच्या परिवाराचे सांत्वन उलवे : उलवे नोडमधील मोरावे गावचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन भोकाजी पाटील (वय- ७८) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांचे ते वडील होत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांनी शनिवारी कृष्णा पाटील यांच्या परिवाराचे सांत्वन केले. यावेळी एम.जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते. दिवंगत अर्जुन पाटील यांनी वारकरी सांप्रदायांशी आपली नाळ जोडलेली होती. ते भजन-कीर्तनात रममाण होत असल्याने त्यांना भजन-कीर्तनद्वारेच आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज सकाळी १० ते १२ ‘गरुड पुराणा’चे वाचन दत्ता म्हात्रे करतील, तर सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत दररोज भजन सेवा असेल. त्यामुळे रविवारी दत्त प्रासादिक भजन मंडळ, गव्हाण. बुवा- देवानंद कोळी, मृदंगमणी- प्रशांत कोळी. सोमवारी श्रीपत बाबा भजन मंडळ, गव्हाण. बुवा- ज्ञानेश्वर म्हात्रे, मृदंगमणी- गौरव म्हात्रे. मंगळवारी जय भवानी प्रासादिक मंडळ, धाकटी जुई. बुवा- मोहन पाटील, वेश्वी. मृदंगमणी- यश रसाळ (दिघोडे). बुधवारी श्रीकृष्ण प्रासादिक महिला भजन मंडळ, बेलपाडा. गायिका- वर्षा ठाकूर, गीता ठाकूर. मृदंगमणी- अलंकार कडू. गुरुवारी साईराम प्रासादिक भजन मंडळ, मोहा. बुवा- राहुल कोळी, मृदंगमणी- जगन्नाथ कोळी. शुक्रवारी कुलदैवत प्रासादिक भजन मंडळ, उलवे, तरघर. बुवा- सिद्धेश पाटील, विनायक खारकर. मृदंगमणी- किरण ओवळेकर, तबलावादक- सागर मढवी. शनिवारी नादब्रम्ह साधना भजन मंडळ, खारघर (रांजणपाडा), बुवा- पंडित निवृत्तीबुवा चौधरी, मृदंगमणी- निलेश पाटील (कोपरा). रविवारी श्री एकादशी भजन मंडळ, मोरावे. बुवा- महादेव पाटील, अंकुश पाटील, दत्ता म्हात्रे. मृदंगमणी- सागर मढवी. सोमवारी गावदेवी प्रासादिक भजन मंडळ, न्हावे. बुवा- महेश पाटील, मृदंगमणी- महादेव ठाकूर हे भजन करतील. मंगळवारी उत्तरकार्य आहे. त्यानिमित्त ह.भ.प. महेश महाराज साळुंखे (पाटणोली) यांचे कीर्तन होणार आहे. यावेळी पखवाज- आदित्य पाटील, गायक- अल्पेश पाटील, विनायक पाटील आणि सहकाऱ्यांची त्यांना साथ लाभणार आहे. हे सर्व कार्यक्रम अर्जुन भवन, मोरावे येथे होणार आहेत. 00000000

एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन

– ज्येष्ठ नागरिक सेवा समितीचा उपक्रम मुंबई: पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीच्या वतीने नुकतेच विरंगुळा केंद्रात सानपाडा येथील भारत ई सेवा केंद्राच्या  सहकार्याने  नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत आणि नगरसेवक निशांत भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एनसीएमसी  स्मार्ट कार्डचे नोंदणी शिबिर संपन्न झाले.  उपमहापौर दशरथ भगत यांनी याप्रसंगी सांगितले की, उरलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अशाच प्रकारचे शिबिर पुन्हा आयोजित केले जाईल.  त्यावेळेस इतर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या शिबिरात १०६ ज्येष्ठ नागरिकांनी एनसीएमसी कार्डसाठी आपल्या नावाची नोंदणी करून,  या योजनेचा लाभ घेतला. शिबिर आयोजन करण्यासाठी पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीचे अध्यक्ष देवेंद्र खाडे, सचिव चंद्रकांत काळे, खजिनदार हेमंत देसाई, इतर पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले. एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, भारत ई सेवा केंद्राच्या विजया विश्वासराव, दिपाली पाटील यांनी मदत केली.  एनसीएमसी म्हणजे राष्ट्रीय सामायिक परिवहन कार्ड असून हे ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेवर आधारित आहे. हे कार्ड मेट्रो, बस, लोकल ट्रेन, टोल, पार्किंग यासाठी वापरण्याची सोय असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसमध्ये ६५ वर्षावरील पुरुषांना  ५० टक्के व ७५ वर्षावरील ज्येष्ठांना विनामूल्य प्रवासाची सवलत मिळते.  महिलांसाठी ही सवलत १२ वर्षानंतर लागू आहे.  खरेदी व इतर रक्कम अदा करण्यासाठी डेबिट कार्ड प्रमाणे हे कार्ड वापरता येते.  या कार्डची एकदाच नोंदणी केल्यानंतर वारंवार कागदपत्रे दाखवण्याची  आवश्यकता  रहात नाही. शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी नाव नोंदणीसाठी शिस्तीचे पालन केले,  त्याबद्दल पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीच्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानण्यात आले. 00000000

शहीद भीमसैनिकांच्या बलिदानावर राजकारण थांबवा – उत्तमराव गायकवाड

रमेश औताडे मुंबई : रमाबाई घाटकोपर शहिद भीम सैनिक स्मृतीला २९ वर्ष झाले आणि त्याचे राजकीय भांडवल सुद्धा भरपूर झाले. परंतु शहिदांचा परिवार कसा जगत आहे. त्यांना मरणारे आजही मोकाट आहेत. त्यांना कोणाचे संरक्षण आहे. ती समीक्षा करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते उत्तमराव गायकवाड यांनी केले.  शहिद भीम सैनिक स्मृती दिनानिमित्त आयोजित आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा मुंबई प्रदेशच्या वतिने समिक्षा अभियान प्रारंभ करताना बोलत होते. अभियानात प्रामुख्याने स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक हिरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष विकास काटे, रिपब्लिकन नेते मंगेश पगारे, चिंतामण गांगुर्डे, काका गांगुर्डे, झुंजार गवळी प्रफुल्ल इंगोले,गुडु रंगारी उपस्थित होते.  मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार आहे. आम्ही सर्व सहन करू शकतो परंतु आंबेडकरी अस्मितेच्या प्रश्नावर ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या सन्मानार्थ हा लढा आहे असे मत विकास काटे यांनी मनोगत भाषणात व्यक्त केले.

मुदतबाह्य दूध, पाव सोसायटीत फेकणाऱ्या नामांकित ऑनलाईन कंपनीचे गोदाम सील!

अनिल ठाणेकर ठाणे-ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुदतबाह्य दूध, पावाच्या पुड्यांसह विविध नाशवंत माल सोसायटीच्या आवारात फेकून दिल्यानंतर सोसायटीतील रहिवाशी व महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रकार घडला…

कच्छ समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा १५ जुलैला

ठाणे- कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणून साजऱ्या होणाऱ्या आषाढी बीज निमित्त कच्छ समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कच्छ अस्मिता मंचातर्फे यंदाचा ‘कच्छ पागडी…

श्रीराम मंदिरातील कथित लुटीविरोधात माजी खासदार राजन विचारे यांचे आंदोलन

अनिल ठाणेकर ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी घोटाळा व लूटप्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या ‘रामरक्षा आंदोलन’ अंतर्गत माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात श्रीराम मंदिरासाठी देशभरातील भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. “प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या जनतेच्या पैशांचा अपहार झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून सत्य जनतेसमोर यावे,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. राजन विचारे यांनी यावेळी सरकारवर टीका करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘रामरक्षा आंदोलन’ विविध ठिकाणी राबविण्यात येत असून, श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.