Category: होम

जेएनपीए ते सफाळे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्ग कार्यान्वित

पालघर : भारत सरकारच्या डेडेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या मालवाहतुकीसाठी विशेषत्वाने राखीव लोहमार्गाचा पहिला टप्पा २५ मे रोजी कार्यान्वित करण्यात आला. जेएनपीए ते सफाळे असा टप्पा…

– ५ जून रोजी सोलापुरात होणार राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा

२ जूनपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने शुक्रवार, ५ जूनला राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथे होणाऱ्या या परीक्षेमुळे राज्य परीक्षा पास झालेल्या पंचांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या परीक्षेबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण पंचांनी राष्ट्रीय परीक्षेला बसावे आणि राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी २ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पूर्ण करावी. यासाठी प्रशांत पाटणकर (मो. क्र. ९९६७५६२४६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने पंचांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. 0000000000

सरस्वती, प्रबोधन, ॐ साईश्वर आणि अमरहिंदची दमदार कामगिरी अनेक संघांची विजयी आगेकूच

 मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा मुंबई : मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन मुंबई खो-खो संघटनेने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे २७ ते ३० मे कालावधीत आयोजन केले…

मध्य रेल्वेचा निसटता विजय

 १५वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) पुरुष एलिट गटात मध्य रेल्वेने मुंबई पोर्ट अथॉरिटीवर ३-२ असा निसटता विजय मिळवला. वांद्रे येथील…

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा २०२६

हरियाणाचा हर्षल उपांत्य फेरीत मुंबई : अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाच्या हर्षल राणाने दमदार झुंजार खेळ करत कर्नाटकच्या आर्यमन सिंगला चार गेममध्ये पराभूत केले. वांद्रे पश्चिम येथील ऑटर्स क्लबच्या स्क्वॉश कोर्टमध्ये गुरुवारी दोन १५ वर्षीय प्रतिभावान खेळाडूंमध्ये वर्चस्वासाठी तीव्र चुरस पाहायला मिळाली. गेल्या वर्षीचा ज्युनियर राष्ट्रीय विजेता हर्षल पहिला गेम हरला. पण डावपेचात्मक खेळ करत त्याने पुढील तीन गेम जिंकताना ६-११, ११-६, १२-१०, ११-९ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल दोन मानांकित खेळाडूंपैकी, श्रेयांश झा याने प्रदीपसिंग राठोडचा ११-६, १२-१०, ११-३ असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित अगस्त्य राजपूतने अगस्त्य बन्सलवर ११-८, ३-११, ११-९, ११-३ अशी चार गेममध्ये मात केली. निकाल (१३ वर्षांखालील मुली – उपांत्यपूर्व फेरी): १-ईशा शेळके विजयी वि. सीरत घुमन ११-२, ११-5, ११-4; श्रिया माहेश्वरी विजयी वि. रुही लोढा ११-२, ११-२, ११-5; अक्षरा माखिजा विजयी वि. अरणा राव ११-७, ११-३, ११-८; २-आध्या ग्रोव्हर विजयी वि. सानवी तिडके ११-9, १0-१२, ११-9, ११-६. १३ वर्षांखालील मुले: झेन अली विजयी वि. निर्वाण उप्पल १0-१२, ११-८, 9-११, ११-4, ११-३; निर्मान चमरिया विजयी वि. निर्वाण पारिख ११-4, 5-११, ११-9, ११-5; रिदान गुप्ता विजयी वि. कृशिव मित्तल ११-७, ११-5, ११-१; आर्यन एस के. विजयी वि. अरित्रा देबनाथ ११-9, ११-८, ११-७. १५ वर्षांखालील मुली : शनाया रॉय विजयी वि. समीरा गोरसिया ११-६, ११-4, ११-9; नंदिकाश्री कलैवनन विजयी वि. रायशा नाईक ११-१३, ११-८, ११-5, १0-१२, ११-9; २-त्रिशा शहा विजयी वि. एकम घुमन ११-२, ११-5, 5-११, ६-११, ११-२. मुले: रुआन राम तडंकी विजयी वि. आर्यन प्रभू ११-5, ११-६, 4-११, १२-१0; विनय शिंदे विजयी वि. ऋषभ श्याम ११-६, 5-११, ११-9, ८-११, ११-६; फरीद अंद्राबी विजयी वि. प्रभू बाजोरिया ११-9, ११-5, ११-६; अयान धनुका विजयी वि. २-वेदांत अग्रवाल ११-4, ११-६, ३-११, ११-६. १७ वर्षांखालील मुली : वसुंधरा नांगरे विजयी वि. आरवी रैना ११-१, ११-5,११-5; फबिहा नफीस विजयी वि. अहाना सिंग 9-११, ११-६, 9-११, ११-३, ११-८; देवश्री अरोरा विजयी वि. अनुष्का जोहरी ११-८, ११-5, १4-१२; २-आरिका मिश्रा बीटी अमायरा मेहता ११-4, ११-६, ७-११, ११-२; मुले : १-श्रेयांश झा विजयी वि. ११-६, १२-१०, ११-३ प्रदीपसिंग राठोड; हर्षल राणा विजयी वि. आर्यमन सिंग ६-११, ११-६, १२-१0, ११-9; सहर्ष शहारा विजयी वि. इंद्रांशसिंग राकेश बडगुजर ११-5, ११-4, १२-१0; २-अगस्त्य राजपूत विजयी वि. अगस्त्य बन्सल ११-८, ३-११, ११-9, ११-३. 000000000

बाल गोपाळ-आयडियल कॅरम सेंटरला काळाचौकीत उत्तम प्रतिसाद

मुंबई : बाल गोपाळ मित्र मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमाने काळेवाडी-काळाचौकी परिसरात कॅरमप्रेमी स्व. दशरथ चव्हाण स्मृती बाल गोपाळ-आयडियल कॅरम सेंटरचा शुभारंभ शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण,…

चॉकबॉल स्पर्धेचे अंतर्गत राज्यस्तरीय सराव शिबिर संपन्न

कल्याण : महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ दिनांक २८ मे ते ३१ मे २0२६ रोजी मडगाव गोवा येथे होणाऱ्या १६व्या वरिष्ठ गट…

डिजिटल युगातही जिवंत आहे ब्रश आणि रंगांची कला

– रंगमंचावर आजही हाताने तयार होतात पेंटिंग बोर्ड कल्याण : आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक काम संगणक आणि ग्राफिक डिझाइनद्वारे काही क्षणांत पूर्ण होते, तिथेच रंगमंचावर ब्रश आणि रंगांच्या माध्यमातून हाताने पेंटिंग करण्याची जुनी परंपरा आजही टिकून आहे. ही परंपरा चार दशकांहून अधिक काळ जपून ठेवली आहे पेंटर हेमंत यादगिरे यांनी. हेमंत यादगिरे यांच्या मते, ही कला हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असली तरी रंगमंच, गणेशोत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मंडप सजावट व बोर्ड पेंटिंगचे काम आजही हातानेच केले जाते. एकेकाळी त्यांच्या हाताखाली १५ ते २० जण काम करत होते. ते सांगतात की, पूर्वी राजकीय पक्षही पूर्णपणे हाताने केलेल्या पेंटिंगवर अवलंबून होते. नेत्यांची मोठमोठी चित्रे देखील ब्रश (तूलिका) आणि रंगांच्या माध्यमातून तयार केली जात होती. सण-उत्सवांच्या काळात कामाची प्रचंड मागणी असायची. मात्र संगणक युग सुरू झाल्यानंतर आणि फ्लेक्स प्रिंटिंगचा प्रसार झाल्यामुळे या पारंपरिक कलेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हाताने पेंटिंगचे काम मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तरीही कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या नाट्यप्रयोगांचे बोर्ड आजही ब्रश आणि रंगांच्या साहाय्याने हातानेच तयार केले जातात. त्यामुळे ही लुप्त होत चाललेली कला काही प्रमाणात तरी जिवंत राहिली आहे. हेमंत यादगिरे यांचे म्हणणे आहे की, ही कला आपली सांस्कृतिक ओळख आहे आणि ती जपणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ते आजही या रंगमंचावर तूलिका आणि रंगांच्या कलेला जिवंत ठेवण्याचे कार्य करत आहेत.

माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त स्मारकास वरळी मुंबई येथील अभिवादन

मुंबई : मुंबई-मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त माता रमाई स्मारक वरळी मुंबई येथे बुध्द वंदनासह अभिवादन सभेमधून मानवंदना त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांना  हजारोंच्या संख्येत उपस्थितीत आंबेडकरी…