Category: मुंबई

Mumbai news

दिव्यांग शाळा अनुदानासाठी डॉ. जितेंद्र ओव्हाळ आक्रमक

रमेश औताडे मुंबई : दिव्यांग शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर करून पात्र शाळांकडून प्रस्ताव स्वीकारले. मात्र आता अनुदानास पात्र असलेल्या शाळांची संपूर्ण यादी जाहीर न करता एक-एक प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली असून, वेळप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला आहे. कोणत्या नियमाच्या आधारे प्रस्ताव निवडक पद्धतीने मंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जात आहेत, याचा खुलासा दिव्यांग  कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला नाही. अनुदान हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संस्थांच्या हक्काचा विषय आहे तो कोणाच्या कृपेवर किंवा निवडक प्रस्तावांच्या प्रक्रियेवर अवलंबून राहता कामा नये. दिव्यांग मंत्रालयाने तातडीने अनुदानास पात्र सर्व शाळांची यादी, पात्रतेचे निकष, प्रस्तावांची सद्यस्थिती आणि मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी. अन्यथा आंदोलन करणार असल्याचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले. 0000000

अभियान सन्मानच्या ऐंशीव्या पुष्पात चाळीस कलाकार रंगमंच आविष्कार घडवणार

कलाश्रमने स्वतंत्र भारताचा ऐंशीवा वर्धापन दिन साजरा केला. योगायोग म्हणजे ‘मी पाऊस पहिला’ हे ऐंशी पानांचे पुस्तक प्रकाशित होत आहे. ऐंशीव्या पुष्पात निसर्गकवी ना. धों. महानोर कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना गीतांजली अर्पण केली जाणार. ऐंशीवे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता पंकज विष्णू उपस्थित रहाणार. स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ‘कलाश्रम’ ही संस्था गेली नऊ वर्षे ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम प्रत्येक महिन्याला राबवत असते. दिवंगतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान असे या उपक्रमाचे स्वरूप असते. सोमवार, ३१ ऑगस्ट,  दुपारी ३ वाजता, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, तिसरा मजला, लघु नाट्यगृह, प्रभादेवी येथे या उपक्रमाचे ८० वे पुष्प म्हणजे काव्य सादरीकरण नृत्य, गायन, वादन यांना प्राधान्य देणारा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धक कवी आणि इतर कलाकार असे चाळीस कलाकार आपला रंगमंच अविष्कार येथे घडवणार आहेत. अभिनेते पंकज विष्णू हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने १५ ऑगस्ट निमित्ताने स्वतंत्र भारताचा ८० वा वर्धापन दिन साजरा केला. परंतु योगायोग म्हणजे या संस्थेचे हे ८० वे पुष्प आहे. यानिमित्ताने ‘मी पाऊस पाहिला’ हा स्पर्धक कवींचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. तो सुद्धा ८० पानांचा आहे. शिवाय या उपक्रमात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. याही उपक्रमाचे हे ८०वे पुष्प आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर आणि कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे याच महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन त्यांच्या ‘अजंठा’ या चित्रपटातील पाऊस गीतावर ३० कलाकार येऊन गीतांजली अर्पण करणार आहेत. या अभिनव कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संस्थेच्या संचालिका नंदिनी पाटील यांची असून लेखन, दिग्दर्शन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केलेले आहे. ‘मी पाऊस पाहिला’ या शिर्षकात हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. चित्रपट निर्माते, पर्यावरण तज्ञ, संपादक डॉ. किशोर भोईर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ‘मी पाऊस पाहिला’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्या निमित्ताने याच नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. हा काव्यसंग्रह निवृत्त पोलीस अधिकारी आणि आदर्श गृहिणी शुभांगी जौंजाळ यांना अर्पण केला जाणार आहे. कार्यक्रमाला डॉ. कामिनीदेवी देसाई यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. या रंगारंग कार्यक्रमात चंचल कांबळे, पूजा मंत्री, खुशी जाधव यांची नृत्य अदा पाहायला मिळणार आहे. रविकिरण पाटील, प्रीतम शिंगे, ज्ञानेश्वर भगत, संजना जाधव, मंजुषा साष्टे यांचा स्वरसाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्योती शिंदे, सविता जाधव, प्रिया राजपूरकर, सावित्री कदम यांच्यावर सोपवलेली आहे. अमित सोळंकी हे संगीत समन्वयक तर रोहन वानखेडे यांची प्रकाशयोजना या कार्यक्रमाला लाभलेली आहे. पुस्तक प्रकाशन आणि ‘ते आज काव्य झाले’ ‘मी पाऊस पहिला’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येथे होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ००००००

राष्ट्रीय क्रीडा दिनी ‘बदलते क्रीडा जगत’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पोईसर जिमखाना येथे २९ ऑगस्ट, सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिकलबॉल खेळाचे भारतातील आद्य प्रवर्तक व ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील वालावलकर लिखित ‘बदलते क्रीडा जगत’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार व जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच प्रसंगी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. क्रीडाप्रेमी, खेळाडू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोईसर जिमखानाच्या वतीने करण्यात आले आहे.

नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीतून सीमांकन, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ठाणे: पर्यावरणाचे संवर्धन आणि कोळीवाड्यांच्या सिमांकनाच्या मुद्द्याचे पोस्टर हे चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच तर्फे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून काढलेले यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.  चेंदणी…

 उल्हासनगरात पुन्हा घुमला माता मंदिरातील घंटानाद

 सहा महिन्यांपासून बंद असलेली घंटा झाली मुक्त सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगरातील हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेशी निगडित असलेल्या एका महत्त्वपूर्ण विषयावर अखेर तोडगा निघाला असून, मागील सुमारे सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेल्या देवी मंदिरातील घंटा पुन्हा वाजू लागल्याने परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. उल्हासनगर-१ येथील जय अंबे माता मंदिरात मंगळवारी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी आणि शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली हरजिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर यांनी या विषयात पुढाकार घेतला. हिंदू समाजाच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याने त्यांनी मागे-पुढे न पाहता आवाज बुलंद करत मंदिरातील घंटा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमानंतर जय अंबे माता मंदिरात पुन्हा एकदा घंटानाद घुमला. मंदिरातील घंटा खुली करण्यात आली असून, लाऊडस्पीकरवर विधिवत सुंदरकांडाचा पाठ करण्यात आला. त्यानंतर माता राणीची महाआरती उत्साहात संपन्न झाली. यापुढे मंदिरात दररोज नियमितपणे आरती करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.महाआरती आणि सुंदरकांड पाठामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. सिंधी समाजातील स्थानिक नागरिकांनी विक्की भुल्लर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तहेदिलाने स्वागत केले. हिंदू समाजाच्या आस्था आणि धार्मिक श्रद्धेसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. या वेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी परिवहन सभापती संतोष पांडेय, उत्तर भारतीय शहर संघटक के. डी. तिवारी, म्हारळ युवासेना शहर अधिकारी अमित देशमुख, उपशहरप्रमुख जयकुमार केणी, अरुण तांबे, सुरेश सोनवणे, जितू उपाध्याय, नंदू भोईर, विभागप्रमुख विनोद सालेकर, प्रमोद पांडेय, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर मारसळे, कृष्णा सातपुते, विभाग संघटक आदेश पाटील, शिवसेना वैद्यकीय शहर समन्वयक बिपीन सिंग, महिला उपशहर संघटक शशिकला राजपूत, उपविभागप्रमुख विशाल आंबेकर, मुन्ना खान, सागर पगारे, संतोष पाठक, विक्की चौहान, समाजसेवक महेश यादव, ओमप्रकाश मिश्रा, रमेश सिंग चौहान (मिंटी), किशोर साळवी, राजेश त्रिपाठी, कुणाल सिंह, शिवम चुनिया आणि भावेश खत्री यांच्यासह स्थानिक शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि मंदिरांच्या पावित्र्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.या उपक्रमामुळे परिसरात एकच संदेश देण्यात आला की ‘श्रीराम मंदिराला कोणी रोखू शकले नाही, तर उल्हासनगरमध्ये हिंदू मंदिरातील आरती आणि श्रद्धेला कोण रोखणार?, मंदिर हे आमच्या श्रद्धेचे केंद्र आहे, आरती हा आमच्या भक्तीचा आवाज आहे आणि हिंदू समाजाच्या आस्थेचा सन्मान झालाच पाहिजे! हिंदुत्वाच्या विचारांसाठी, हिंदू समाजाच्या आस्थेसाठी आणि मंदिरांच्या सन्मानासाठी हरजिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर सदैव मैदानात राहतील’, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

सामाजिक जाणीवेतून आंतरराष्ट्रीय मैदान बनवणार: अमरीश पटेल

मुंबई प्रतिनिधी :मुंबईतील तीन मैदानांची १६ एकर जागा श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एसव्हीकेएम) ट्रस्टला देण्यात आल्याप्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून गैरसमजातून झाल्याचा दावा ट्रस्टचे अध्यक्ष अमरीश पटेल यांनी २६ ऑगस्टला ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केला. यावेळी विरोधकांकडून वारंवार मुख्यमंत्र्यांनी ट्रस्टला भूखंड मोफत देण्यात आल्याच्या आरोपांचे अमरीश पटेल यांनी खंडन केले. तसेच एसव्हीकेएम ट्रस्टला भूखंड मोफत देण्यात आलेले नसून ते परवाना पद्धतीने मिळालेले आहेत. त्याचबरोबर या भूखंडांच्या जागेची मालकी सरकारचीच असल्याचेही यावेळी पटेल यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पटेल यांनी सामाजिक बांधिलकीतून मुंबईकरांसाठी काहीतरी देणे लागत असल्याच्या भावनेतूनच क्रीडा जगतासाठी उत्कृष्ट सुविधा देण्याची प्रामाणिक इच्छा असल्याने मुंबईत मोठे क्रीडांगण व्हावे, यासाठी भूखंडाचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच भूखंड वाटपाबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आल्याचे पटेल यांनी म्हटले. यावेळी पटेल यांनी, “मी जगातून गेल्यावरही मुंबईकर माझी आठवण काढतील, हीच माझी प्रामाणिक इच्छा असून याच उद्देशाने या भूखंडावर चांगले क्रीडांगण उभारण्याचा मानस आहे,” असे सांगितले. तसेच हे क्रीडांगण सर्व मुंबईकरांसाठी खुले राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच याप्रसंगी अमरीशभाई पटेल यांनी मुंबईत खेळाडूंना सातत्याने सराव आणि प्रशिक्षण घेता येईल, अशा दर्जेदार क्रीडा सुविधांची गरज अधोरेखित केली. “भारत २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धांचे तसेच इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर क्रीडा संस्कृतीही मजबूत करणे गरजेचे आहे. मुंबईतील तरुण खेळाडूंना चांगल्या सुविधा, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्यातून भविष्यातील विजेते घडू शकतात. याच उद्देशाने मुंबई उपनगरातील एक लाख तरुणांपर्यंत जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे पटेल यांनी म्हटले. दरम्यान, एसव्हीकेएम संस्थेने आतापर्यंत एकात्मिक क्रीडा परिसंस्था विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. मुंबईतील तरुणांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने सप्टेंबर २०२५ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. सात संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला, तर चार संस्थांचा अंतिम मूल्यांकनासाठी विचार करण्यात आला. एसव्हीकेएमने एकूण महसुलातील ५० टक्के हिस्सा देण्याची सर्वाधिक बोली सादर केली असल्याचे संस्थेने म्हटले आहे. मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा देण्याचा संस्थेचा उद्देश असून, मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एसव्हीकेएम) शहरातील तीन ठिकाणी क्रीडा सुविधांचा विकास आणि व्यवस्थापन करणार आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डन आणि अंधेरीतील डी. एन. नगर येथील सिमेंट गोडाऊन या तीन ठिकाणांचा त्यात समावेश असून, या जागांचे एकूण क्षेत्रफळ १६ एकर नसून १४.११ एकर आहे. या तिन्ही जागांची मालकी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे (म्हाडा) कायम राहणार आहे. एसव्हीकेएमला म्हाडाच्या जागा ३ वर्षांसाठी, तर मुंबई महापालिकेचे क्रीडा संकुल १० वर्षांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने मर्यादित कालावधीसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे जागांचे कायमस्वरूपी हस्तांतरण संस्थेकडे झालेले नसून, मालकी मुंबई महापालिका आणि म्हाडाकडेच राहणार असल्याचे एसव्हीकेएमने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पांतर्गत स्थानिक नागरिक, मुले आणि युवा खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. भारतीय खेळ खो-खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, अॅथलेटिक्स, टेनिस, बास्केटबॉल, पिकलबॉल, तसेच इनडोअर जिम्नॅशियम आणि इनडोअर खेळांच्या सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारा भांडवली खर्च, संचालन आणि सुविधांच्या विकासासाठीचा सर्व देखभाल खर्च एसव्हीकेएम करणार आहे. अंधेरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त ४० ते ५० प्रमाणित प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी, समन्वयक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. एसव्हीकेएमच्या म्हणण्यानुसार, संस्थेच्या क्रीडा उपक्रमांमध्ये सध्या १४८ हून अधिक क्रीडा प्रशिक्षक कार्यरत आहेत. दरम्यान, या तीन जागांचे एकत्रित क्षेत्रफळ १६ एकर नसून १४.११ एकर असल्याचेही एसव्हीकेएमने स्पष्ट केले आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे क्षेत्रफळ ११.५७ एकर, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डनचे ०.९२ एकर आणि डी. एन. नगरमधील जागेचे १.६२ एकर आहे. एसव्हीकेएमची खेळाबद्दल दूरदृष्टी आणि कटिबद्धता • २०३६ मध्ये भारत ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. • ऑलिंपिक स्पर्धा भारतात होणार असतील, तर त्यासाठी सक्षम क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. • त्यामुळे सर्वोत्तम आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा तयार होणे आवश्यक आहे. • मुंबईतील खेळाडूंना सर्वोत्तम क्रीडा सुविधा आणि प्रशिक्षण मिळावे, यासाठी एसव्हीकेएम ही तयारी करत आहे. 0000

लाडकी बहिण योजनेसाठी मागासवर्गीय समाजाच्या बहिण-भावांवर अन्याय का?

मुंबई : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्षाबंधनापूर्वीच १५०० रुपये जमा होण्यास सुरु झाले आहेत पण यासाठी सामाजिक न्याय विभागातून ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आला…

 कल्याणमध्ये युवक काँग्रेसची महागाई विरोधात ‘अंत्यसंस्कार यात्रा’

 तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत सरकारची काढली अंत्यसंस्कार यात्रा कल्याण : कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने साखरेच्या दरवाढीविरोधात तहसील कार्यालयावर  ‘अंत्यसंस्कार यात्रा’ काढण्यात आली. साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुगर डॅडी असा उल्लेख असलेला बॅनर हातात घेऊन भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढती महागाई सरकारने कमी करावी अशी मागणी यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी केली. यावेळी कॉंग्रेसच्या गटनेत्या तथा महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. साखर महागली, चहाचा गोडवा पळाला, भाजप सरकारच्या कारभाराने जनतेचा खिसा मात्र जळाला. आता चहात साखर टाकायची की साखरेसाठी कर्ज काढायचं? असा उपरोधिक टोला लगावत साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. ऊस शेतकऱ्याचा, साखर जनतेची, पण दरवाढीचा फटका जनतेच्या खिशाला. गोड बोलणाऱ्या सरकारने साखर मात्र कडू केली. महागाईच्या या तडाख्याला आता युवक काँग्रेस सडेतोड उत्तर देत जनतेच्या हक्कासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी दिली.

 गरीबाच्या घराची जबरदस्तीने तोडफोड केल्याचा आरोप

नगरसेवक महेश गायकवाड विकासकावर संतापले; ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गंगाराम राठोड यांचे घर पाडले कल्याण : कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात गॅस कंपनी जवळ सोसायटीच्या विकासकामादरम्यान एका गरीब कुटुंबाच्या घराची कथितरित्या जबरदस्तीने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली विकासक संतोष केंगळे यांनी गंगाराम राठोड यांच्या घराची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राठोड कुटुंब गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून या घरात वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले. तोडफोडीच्या कारवाईत घरातील संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाल्याने गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत विकासकाच्या कारवाईबाबत तीव्र संताप व्यक्त केला. “मी कोणत्याही गरीबावर अन्याय होऊ देणार नाही. विकासाच्या नावाखाली गरीबांच्या घरांवर कारवाई करून त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली. तसेच विकासक आणि त्यांना कथितरित्या राजकीय पाठबळ देणाऱ्यांच्या दादागिरीविरोधात आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. पीडित गंगाराम राठोड आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, विकासक संतोष केंगले यांनी महेश गायकवाड यांनी आपल्यासोबत मारहाण केल्याचा तसेच जातिविषयक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. घटनेमुळे परिसरात नाराजीचे वातावरण असून, पोलीस आणि प्रशासनाकडून या प्रकरणात कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

खाजगी हितसंबंधामुळे स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

रमेश औताडे मुंबई : विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अद्यापही पालिकेकडून कोणताही अधिकृत माहिती फलक न लावल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ सेक्टर १४ येथील या मोकळ्या भूखंडासमोर रिजसी नावाचा मोठा  टॉवर आहे. या टॉवर मधील घरांची विक्री सुरळीत व्हावी यासाठीच प्रशासन जाणूनबुजून स्मशानभूमीचा अधिकृत बोर्ड लावण्यास व बांधकामास टाळाटाळ करत तर नसेल ना ? असे मिरजे यांनी सांगितले. पालिकेकडून होत असलेल्या या दिरंगाई विरोधात  मिरजे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून १५ दिवसांचा इशारा दिला आहे. 0000