Category: मुंबई

Mumbai news

महिला आरक्षण विधेयकावरून भाजपा व मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिशाभूल

– विधेयक २०२३ मध्येच मंजूर –वर्षा गायकवाड मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा विरोध आहे असा खोटा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. काँग्रेस पक्षानेच महिला आरक्षणचा निर्णय देशात सर्वात आधी घेऊन तो लागूही केला पण भाजपाची महिला विरोधी मानसिता असल्यानेच २०२३ मध्ये संसदेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊनही भाजपाचे काही बोलघेवडे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३% आरक्षण देणारे ‘संविधान (१०६ वी घटनादुरुस्ती) विधेयक’ २०२३ मध्ये संसदेत मंजूर झाले आहे, या विधेयकाला काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांनीही एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे पण त्याची अंमलबजावणी मात्र भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने अद्याप केलेली नाही. महिलांना आरक्षण देण्याची मानसिकता भाजपाची नाही. त्यांच्या मुळ विचारसरणीत आरक्षणाला विरोध आहे आणि महिलांबद्दलचा भाजपाचा दृष्टीकोन सर्वांना माहित आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेले आहे पण आता भाजपा सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयक मांडण्याचा प्रयत्न करत आहे. डिलिमिटेशन विधेयक हे देशाचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकड्यात विभाजन करणारे विधेयक आहे म्हणून त्याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धीभेद करू नये असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमात महिलांची सुरक्षा, अधिकार व त्यांच्या समस्यांवर चर्चा केली. ही चर्चा सर्व जाती धर्माच्या मुली व महिलांसाठी होती पण प्रत्येक गोष्टीकडे जात व धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची विकृत मानसिकता भाजपाची असल्याने ते या मुद्द्यालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. छात्रों की गुंज कार्यक्रमात मुलींनी भाजपाला योग्य तो संदेश दिल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून बिथरलेला भाजपा राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. ००००००

 आधारवाडी कारागृहात बंदींची शिपायासोबत धक्काबुक्की

 खडकपाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल कल्याण : आधारवाडी कारागृहात ई-मुलाखतीच्या कारणावरून दोन न्यायाधीन बंदींनी कारागृह शिपायासोबत धक्काबुक्की आणि झटापट केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शिपाई राजू पोरे यांच्या खांद्याला दुखापत झाली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन्ही बंदींविरोधात बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कारागृह शिपाई राजू पोरे हे सोमवारी बंदींच्या नातेवाईकांसोबत होणाऱ्या ई-मुलाखतीच्या कक्षात ड्युटीवर होते. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी विक्रम ऊर्फ विकी राजेंद्र कवठणकर आणि हितेश ऊर्फ मोगली कवठणकर हे दोघे आधारवाडी कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून आहेत. दोन्ही बंदींच्या नातेवाईकांनी ई-मुलाखतीसाठी केलेल्या विनंतीला शिपाई पोरे यांनी मंजुरी दिली होती. मात्र, काही कारणामुळे ई-मुलाखत कनेक्ट होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही बंदींना मुलाखत कक्षाबाहेर उभे राहण्यास सांगण्यात आले. मात्र, दोन्ही बंदी पुन्हा ई-मुलाखत कक्षात आले आणि तेथील लॅपटॉप उचलला. शिपाई पोरे यांनी त्यांना लॅपटॉप घेण्यास मनाई केली. यावरून दोन्ही बंदींनी पोरे यांच्या वर्दीला हात घालत त्यांच्यासोबत धक्काबुक्की व झटापट केली. यावेळी बंदींनी पोरे यांना कमरेला पकडून उचलण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार शिपाई राजू पोरे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही न्यायाधीन बंदींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. ००००

ठाण्यात मंगळागौरीच्या उत्साहाची नजाकत

– स्नेहा सखी गटाला राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिल ठाणेकर ठाणे : पारंपरिक खेळांना आधुनिकतेची जोड देत शेकडो महिलांनी ठाण्यात मंगळागौरीचा उत्सव उत्साहात साजरा केला. युवतींसह मध्यमवयीन महिलांनी सादर केलेल्या मंगळागौरीच्या…

भारतमाता चौक नामकरणासाठी १५ वर्षांची लढाई यशस्वी…

भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले यांच्या वतीने आभार ठाणे : शिवाईनगर, देवदयानगर येथील मुख्य चौकाला भारतमाता चौक असे नाव देण्यासाठी सुमारे १५ वर्षांपासून सुरू असलेल्या हिंदू संघटनांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भाजपचे नगरसेवक सिताराम राणे यांच्या प्रयत्नाने अखेर या चौकाच्या नामकरणाचा ठराव मंजूर झाला. त्याबद्दल भाजपचे  शिवाईनगर-वसंत विहार मंडल अध्यक्ष राकेश चौगुले यांच्या वतीने सिताराम राणे यांचा, तर भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल नताशा सोनकर यांचा सत्कार करण्यात आला. शिवाईनगर, देवदयानगर परिसरातील चौकात अनेक वर्षांपासून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी भारतमातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. या चौकाचे भारतमाता चौक असे नामकरण करावे, अशी मागणी सातत्याने भाजप, हिंदूत्ववादी संघटना आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून केली जात होती. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. महापालिकेच्या निवडणुकीत या भागातून नगरसेवकपदी भाजपचे सिताराम राणे यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केला. या संदर्भात महापालिकेत प्रस्ताव सादर केल्यानंतर नुकत्याच झालेल्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे या चौकाला लवकरच भारतमाता चौक असे नाव देण्यात येणार आहे. या कार्याबद्दल भाजप शिवाईनगर-वसंत विहार मंडलाचे अध्यक्ष राकेश चौगुले यांनी नगरसेवक सिताराम राणे यांचा सत्कार केला. तसेच नागरिकांच्या वतीने आभार मानले. येऊर, उपवन भागात अनेक वर्षांपासून भाजपचे संघटनात्मक आणि आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या नताशा सोनकर यांची नुकतीच भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाली. त्याबद्दल त्यांचाही राकेश चौगुले यांनी सन्मान केला. या कार्यक्रमाला भाजप पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी भारतमातेच्या विजयाचा जयजयकार करण्यात आला.

 साउथ मुंबईचा मुंबई स्नायपर्सवर निसटता विजय

बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग मुंबई, २६ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित आणि नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या विद्यमाने खेळवल्या जाणाऱ्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई पर्वात गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर…

आज राष्ट्रवादी (श.प.) क्लस्टर कार्यालयावर धडक देणार – मनोज प्रधान

अनिल ठाणेकर ठाणे :  शहरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी “क्लस्टर विकास कंपनी” ला ठाणे महानगर पालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरूवारी हजारो ठाणेकरांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तीन हात नाका ते कशीश पार्क येथील क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली. खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणे ठरविण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आला आहे. यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंट बाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार सदर कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार आहे. तसेच, ठाणे महानगर पालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा देखील हा अपमान आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखविल्यासारखे झाले आहे, असा आरोप करीत डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या यांच्या उपस्थितीत मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात येणार आहे. याबाबत मनोज प्रधान म्हणाले की,  या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मूलभूत प्रश्नांना हात घालणार आहोत. या शहरात 4 हजार एकरवर बांधकाम केले जाणार आहे. त्यांना १२.५ चा एफएसआय कोणत्या आधारावर दिला जात आहे? या बांधकामानंतर ठाण्यात किती घरांची निर्मिती होणार आहे? ठाण्यात किती लोक वास्तव्यास येतील? त्यांना पाणीपुरवठा कसा करणार? सांडपाणी आणि मलनिस्सारण याचे नियोजन कसे करणार? जर मालकी हक्काची घरे दिली जाणार आहेत तर ३० वर्षांचे करार का केले जात आहेत. मोठी घरे असणाऱ्यांनाही ३२३ चौरस फुटाचीच घरे देऊन पुढील आकारमानासाठी दर आकारणी का केली जाणार आहे? वाणिज्य वापराच्या सदनिकांना १८० चौरस फुटाच्या पुढे दर का आकारले जाणार आहेत? घरांच्या खालील जमिनीची मालकी ठाणे महानगर पालिकेकडेच का असणार आहे? आदी प्रश्न आम्ही विचारणार आहोत, असे प्रधान म्हणाले. दरम्यान, या मोर्चात किमान ३ हजार ठाणेकर नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मोर्चानंतरही क्लस्टर कंपनी रद्द करून नियोजनपूर्वक विकास केला नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही प्रधान म्हणाले.

 ‘हा धर्मवीर ठाण्याचा’ गीतातून आनंद दिघेंना सुरांची आदरांजली

स्मृतिदिनाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गीताचे अनावरण अनिल ठाणेकर ठाणे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत त्यांच्या कार्याला आणि विचारांना सुरांची आदरांजली वाहणारे ‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ हे गीत साकारण्यात आले असून, या गीताचे अनावरण शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी यावेळी खासदार नरेश मस्के, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख सचिन दाने,सदाशिव गव्हाणे उपजिल्हाप्रमुख,अंकुश नाना कुंभार शहरप्रमुख, सतीश पाटील संघटक, बालाजी पवार, गट प्रमुख भगवान शिंदे, शुभम लोखंडे युवासैनिक, नितीन कांबळे, विशाल कोल्हे.व सर्व लातूर जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे धर्मवीर आनंद दिघे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जात. सामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळा, सामाजिक कार्य, हिंदुत्वाची भूमिका आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी त्यांनी केलेले कार्य आजही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी मानले जाते. दिघे साहेबांच्या याच कार्याची आणि विचारांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हे गीत तयार करण्यात आले आहे. शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांच्या संकल्पनेतून ‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. दिघे साहेबांच्या कार्याचा वारसा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे. भगव्याचा स्वाभिमान, शिवसेनेची निष्ठा आणि दिघे साहेबांप्रती असलेली शिवसैनिकांची भावना या गीतातून व्यक्त करण्यात आली आहे. या गीताला विक्रम कोतवाड यांनी आवाज दिला असून विनायक राठोड यांनी संगीतबद्ध केले आहे. गीतलेखन महादेव ढमने यांनी केले असून, व्ही ट्यून्स संगीत स्टुडिओ, लातूर येथे संगीतनिर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाला शिवसेना सचिव संजय मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. ‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ हे गीत लवकरच स्पॉटिफाय, जिओसावन आणि यूट्यूब म्युझिक यांसह विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रदर्शित होणार आहे. दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त साकारण्यात आलेले हे गीत त्यांच्या कार्याला वाहिलेली भावपूर्ण संगीतात्मक आदरांजली ठरणार असून, त्यांच्या आठवणी आणि विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशातील पहिला अंतराळ संशोधन मेळावा महाराष्ट्रात

रमेश औताडे मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने भारतातील पहिल्या भव्य अंतराळ संशोधन मेळावाची घोषणा उद्योग मंत्री उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. हा मेळावा अंतराळ, विज्ञान आणि सायन्स-फिक्शन वर आधारित असणार आहे. असे सामंत यांनी सांगितले. मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. अंतराळ क्षेत्रातील ज्ञान, नवकल्पना, गेमिंग आणि मनोरंजन यांना एकाच व्यासपीठावर आणून महाराष्ट्रातील स्पेस-टेक स्टार्टअप्सना जागतिक गुंतवणूकदार व तज्ज्ञांशी जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.असे न नोडविण गेमिंग चे संस्थापक अक्षत राठी यांनी सांगितले. जागतिक तज्ज्ञांची चर्चासत्रे, सायन्स-फिक्शन गेमिंग झोन, स्पेस तंत्रज्ञान प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष शाळा-कॉलेज उपक्रम आयोजित केले जातील. असे आय ए एस डॉ. पी. अनबलगन, आय ए एस दीपेंद्रसिंग कुशवाह  आणि प्रिमस पार्टनर्सच्या आरती हरभजंका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या निश्चित तारखा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

 फक्त मुंबई नव्हे, संपूर्ण राज्य ‘ग्रोथ इंजिन’ बनविणार : एकनाथ शिंदे

मुंबई-एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी वेगाने पावले टियर-२, टियर-३ शहरांच्या विकासावर भर अनिल ठाणेकर मुंबई : महाराष्ट्राला केवळ मुंबईपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्याला देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट…

प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या तुर्भेतील बांधकामस्थळावर कारवाई

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी अशोक गायकवाड नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिका क्रमांक ३/२०२३ मध्ये २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर तातडीने व प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकामस्थळांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण तसेच सुरुंगस्फोटासाठी अवलंबावयाची मानक कार्यपद्धती जाहीर करण्यात आली असून, तिचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व बांधकामधारकांना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही आवश्यक सुधारणा न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान तुर्भे सेक्टर १९ मधील भूखंड क्रमांक ११ येथे मे. शेल्टॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या बांधकामस्थळी मानक कार्यपद्धतीतील अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर संबंधित बांधकामधारकास तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बांधकाम स्थळी आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या नसल्याचे निदर्शनास आल्याने तुर्भे विभाग कार्यालय मार्फत संबंधित बांधकामस्थळ सीलबंद करण्यात आले. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून तुर्भे विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक तैनात होते.