Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला सुरुवात

उल्हासनगरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला सुरुवात सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचे काम झाले नव्हते. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी कंपनी मालकांसह परिसरातील उद्योजकांकडून केली जात होती. अखेर इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाची भूमिपूजन माजी आमदार पप्पू कलानी व महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याचवेळी त्या रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात आले. महापौर अश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक ७ मधील विकास कामांना गती देत त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी जवळपास ४० करोड रुपयांचा मूलभूत सुविधा निधी उपलब्ध करण्यात आले असून याच निधीच्या अंतर्गत सुमारे एक करोड रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी, व्यापारी वर्गांनी महापौर अश्विनी निकम यांचे आभार प्रकट केले आहे. या रस्त्याच्या निर्मनामुळे इंडस्ट्रियल एरियाच्या परिसराची शोभा वाढली आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, सभागृह नेता अरुण आशान, नगरसेवक जमनादास पुरसवाणी, दुर्गा राय, नगरसेविका संघमित्रा हजारे, कमलेश निकम, राजवानी यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ७ मध्ये हा रस्ता सिमेंट काँक्रिटी तयार करण्यात येणार आहे. इंडस्ट्रियल एरियाचा हा सिमेंट काँक्रिटी रस्ता २० दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कमलेश निकम यांनी सांगितले.

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आज वह्यावाटप आणि सत्कार

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आज वह्यावाटप आणि सत्कार ठाणे : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप व ६० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चिंतामणी कोळी यांच्यातर्फे सलग १९ व्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात ठाणे शहरातील गरजू विद्यार्थी व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, गटनेते मुकेश मोकाशी आदी उपस्थित राहणार आहेत.

वाढवण बंदर प्रकल्पामुळे तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार संधी प्राप्त होणार

वाढवण बंदर प्रकल्पामुळे तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार संधी प्राप्त होणार रवींद्र चव्हाण यांचे भारत लीडरशिप समिटमध्ये आश्वासक वक्तव्य मुंबई : लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नुकताच मुंबईतल्या अंधेरी येथे “भारत लीडरशिप समिट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राजकीय सामाजिक आणि मनोरंजन वर्तुळातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली.६ जून रोजी अंधेरी पूर्व येथील कोर्ट यार्ड बाय मॅरीएट येथे या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.”सन्मान गुणवंतांचा संवाद महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचा” या संकल्पनेवर आधारित या समिटमध्ये अनेक महत्त्वाचे विषय मांडले गेले. महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि राज्य व देश हिताच्या विषयांवर राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमात सखोल चर्चा केली. यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक रवींद्र चव्हाण आणि युवा नेते सिद्धेश कदम यांच्यातील चर्चा चांगल्याच रंगल्या. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात लोकशाही समूह नवीन इंग्रजी वृत्तवाहिनी लॉन्च करत असण्याची घोषणा करण्यात आली. लोकशाही इंग्लिश या नावाने लवकरच इंग्रजी वृत्तवाहिनी कार्यान्वित होणार आहे. भारत लीडरशिप समिटमध्ये आपले विचार मांडताना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वाढवण बंदर प्रकल्प उभारणी बाबत अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे विधान केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याला तब्बल ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. सध्या या ठिकाणी मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण यांचे माध्यमातून बंदरे कार्यान्वित असली तरी देखील त्यांच्या मर्यादा ध्यानात घेता या ठिकाणी जागतिक स्तरावरील बंदराची निर्मिती झाली पाहिजे अशी सर्वांचीच धारणा होती. परंतु आमच्या अगोदरच्या सरकारांनी फक्त विचार केला, त्याला मूर्त आणि वास्तव स्वरूप दिले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच. तब्बल ७२ हजार २२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून वाढवण बंदर उभे राहत आहे. ज्याप्रमाणे जे एन पी ए नजीक नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाले आहे तशाच पद्धतीने वाढवण बंदरा नजीक देखील विमानतळ कार्यान्वित करण्याचे व्हिजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यानंतर दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. भारतात २० मीटर खोली असलेल्या बंदराचा अभाव असल्याने मालवाहू जहाजांना प्रथम कोलंबो (१५ मीटर खोल) किंवा सिंगापूर (१२ मीटर) या बंदरावर माल उतरावा लागतो. जो नंतर लहान मालवाहू जहाजातून जेएनपीटी (११ मीटर खोली)सारख्या भारतीय बंदरांवर येतो. आपला आयात-निर्यातीचा ९०% माल समुद्रमार्गे जात असल्याने आयातदार व निर्यातदारांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. यासाठी भारताला पश्चिम किनाराऱ्यावर २० मीटर खोलीचे बंदर झाल्यास मालवाहतूक वाढेल. कंटेनर जहाजांचा वाढता आकार असल्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खोल कंटेनर पोर्ट विकसित होणेही अत्यावश्यक आहे. वाढवण किनाऱ्याजवळ जवळपास २० मीटरची नैसर्गिक खोली आहे, ज्यामुळे बंदरावर मोठ्या जहाजांना हाताळणे शक्य होईल. या बंदराच्या विकासामुळे १६०००-२५००० टीईयू क्षमतेच्या कंटेनर जहाजांची वाहतुकीसाठी कॉलिंग सक्षम झाल्याने मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेचा फायदा होऊन इतर खर्च कमी होईल. या समिटमध्ये लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकर हे देखील सहभागी झाले होते तसेच मर्दिनी या मराठी चित्रपटाची टीम देखील सहभागी झाली होती आणि त्यांनी निवोदितांना संधी व अभिनयातील आव्हानांवर आपले विचार मांडले.

तूर प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी : सन २०२६-२७ च्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत तूर पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले…

 मिलापनगर तलावातील हजारो मासे मृतावस्थेत

Unit-६ कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी व ऑक्सिजन कमी झाल्याने मासे झाले मृत कल्याण :  डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील मिलापनगर तलाव म्हणजे पूर्वीचा गणेश विसर्जन तलावात गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मरून ते पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हे मासे कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी खराब व ऑक्सिजन कमी झाल्याने मृत पडत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे.  अजूनही या तलावात हजारोंनी अनेक जातींचे मासे आणि कासवे जिवंत असून त्यांना वाचविले गेले पाहिजे. त्यासाठी तातडीने उपाययोजना केडीएमसीच्या स्वच्छता आणि पर्यावरण विभागाने करणे आवश्यक आहे. या  तलावातील हजारो मासे मरत असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून केडीएमसी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी येऊन तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम चालू केले आहे. ५ जून पर्यावरण दिन हा सर्वत्र साजरा करतांना असे तलावातील मासे मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरण प्रेमींनी खंत व्यक्त केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी कल्याणच्या प्रसिद्ध काळा तलावातील मासे मृतावस्थेत आढळले होते. असे तलावातील मासे का मृतावस्थेत आढळत आहेत याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पण याची तपासणी करून माहिती घ्यावी. याच मिलापनगर गणेश विसर्जन तलावात काही वर्षापूर्वी असेच मासे मेले होते. मिलापनगर रेसिडेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि डोंबिवली वेलफेअर असोसिएशन यांनी केलेल्या याचिकानुसार राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाने गेल्या दहा वर्षापासून या तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी आहे. या तलावाची नियमित साफसफाई होताना दिसत नाही. काही नागरिक यात निर्माल्य आणि कचरा टाकत असल्याने तलावातील पाणी अस्वच्छ, खराब होत असते. बऱ्याच वर्षात या तलावातील गाळ काढला गेला नाही आहे. हा तलाव जर जिवंत ठेवायचा असेल तर येथे एक कायमस्वरूपी सुरक्षारक्षक, साफसफाई कर्मचारी ठेवावा, सीसी कॅमेरे बसवावेत, नियमित साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जर या तलावाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर काही दिवसांनी हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केडीएमसीचे कार्यतत्पर उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  रामदास कोकरे यांनी या तलावाच्या साफसफाई आणि नागरिकांच्या मागणीवर जरूर विचार करावा तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी यांनी या तलावातील पाण्याचे आणि मृत माशांची प्रयोगशाळेत तपासणी करून आलेल्या अहवाल प्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे. ०००००००००

मध्य रेल्वेची युनियन बँकेवर मात

१५ वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा २०२६ मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) एलिट पुरुष गटाच्या सामन्यात मध्य रेल्वेने युनियन बँक ऑफ इंडियावर २-१ अशी मात…

 सोलापूर, धाराशिव, पुणे आणि मुंबई उपनगरची उपांत्य फेरीत धडक!

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा मुलींच्या गटात सांगली, सोलापूर, धाराशिव व ठाणेची आगेकूच (स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीतून) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर…

सभागृहनेते अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार १ जून रोजी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नवीन पनवेल शहराध्यक्ष अमोल राजन जाधव आणि दिव्यांग सेल नवीन पनवेल अध्यक्ष प्रथमेश भगवान भंडारे यांच्यावतीने नवीन पनवेल, सेक्टर ६ येथील रुषिवन व रुपवन या दोन्ही वृध्दाश्रमात जावून सभागृह नेता अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या हस्ते वृध्द पुरुष-महिलांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी या दोन्ही वृध्दाश्रमाचे संचालक संतोष पवार यांनी सभागृह नेता अॅड. प्रकाश बिनेदार यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या व तेथील महिलांनी औक्षणही केले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी सरचिटणीस प्रभाकर पवार, भाजपा उत्तर रायगड जिल्हा सदस्य श्याम साळवी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नवीन पनवेल शहराचे सरचिटणीस अॅड. शिवकुमार कांबळे, कोष्याध्यक्ष संतोष म्हस्के, सेलचे संयोजक विलास फडके, सागर येसनकर, जयेश कांबळे, साईनाथ भटकळ, अजिंक्य माने, भावेश बाईट, अनिकेत पंडीत, सुदेश तावडे, सुमित सकपाळ, कुणाल भंडारे आदि मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या वेदना आणि श्रद्धेचा संवेदनशील प्रवास; ‘देऊळ बंद २’ ठरतो प्रभावी अनुभव

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक वास्तव आणि अध्यात्म यांचा संगम घडवणारे चित्रपट क्वचितच पाहायला मिळतात. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’मधून श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानवी संघर्ष यांचा वेगळा…

टिटवाळा इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

  संघर्ष रहिवासी संघटनेचे केडीएमसी, पोलिसांना पत्र कल्याण : टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटना, तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी संघर्ष…