Month: April 2026

मीरा-भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांचा “लोकदरबार”

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या समस्यांना मिळणार आता हक्काचं व्यासपीठ. प्रशासकीय कामांतील अडथळे असोत किंवा नागरी समस्या, आता प्रत्येक प्रश्नावर थेट चर्चा आणि तात्काळ निवारण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मीरा-भाईंदरचे लाडके…

-शिक्षण विभागाच्या उदासीनतेविरुद्ध ठाणे जिल्हा परिषदेवर रणशिंग

 आज ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने’चे विराट आंदोलन! अनिल ठाणेकर ठाणे, राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने’ने आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी येत्या गुरुवारी, १६ एप्रिल रोजी, जिल्हा परिषद ( बी. जे) . हायस्कूल  जांभळी नाका ठाणे या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने  दिला आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना निवेदन धाडण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक आणि मानसिक दडपणाखाली आहेत. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे शिक्षकांचे कंबरडे मोडले असून, वारंवार विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व वेतन तर्कहीन निकषांमुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे वेतन थांबवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.गेल्या २ ते ६ वर्षांपासून शिक्षकांची हक्काची देयके थकली आहेत. निधी उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कोट्यवधींचा निधी व्यपगत (Lapse) झाला असून, १५ एप्रिलपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून क्षकांना सक्तीने निवडणुकीच्या कामात (BLO) जुंपले जात आहे. हे अशैक्षणिक काम तातडीने थांबवण्याची मागणी पत्रात केली आहे. एप्रिल महिना अर्धा संपला तरी मार्चचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकले असून त्यांना नाहक दंड सोसावा लागत आहे. ‘१ तारखेला पगार’ ही परंपरा कायम राखण्याची आठवण संघटनेने करून दिली १० वी, ११ वी आणि १२ वीच्या परीक्षा आणि निकालाच्या धामधुमीत ‘पटपडताळणी’चा घाट घातला जात आहे, जो शिक्षकांना नाहक त्रास देणारा आहे. हा कार्यक्रम सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्याची मागणी केली आहे.”प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. जर हे प्रश्न तातडीने सुटले नाहीत, तर १६ एप्रिलचे आंदोलन हे केवळ सुरुवात असेल. शिक्षकांच्या हक्कासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत.”

देखाव्यातून उलगडला मूकनायकचा प्रवास

कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कल्याणमध्ये विविध प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले होते. मात्र पत्रीपूल येथे स्नेह वर्धक नगरच्या वतीने साकारण्यात आलेला देखावा आंबेडकरी जनतेच्या चर्चेचा विषय…

कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच

कल्याण : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी इको गाडीचा अपघात होऊन ११ जणांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर आरटीओ आणि वाहतूक पोलीस…

उल्हासनगरात ‘चार साहिबजादे’ एमआरआय-सिटी स्कॅन केंद्राचे उद्घाटन, स्वस्त दरात आधुनिक आरोग्यसेवा

आमदार कुमार आयलानी यांच्या उपक्रमाचे शहरात स्वागत; गरजूंना मोठा दिलासा सुनील इंगळे उल्हासनगर :उल्हासनगरात धीरज कुमार आयलानी यांच्या स्मरणार्थ ‘चार साहिबजादे एमआरआय आणि सीटी स्कॅन केंद्रा’चे भव्य उद्घाटन मंगळवारी सेंट्रल हॉस्पिटलजवळील…

 उल्हासनगरातील सुभाष टेकडीत मोफत पाणीपुरी वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  उल्हासनगर: उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथे भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हंसराज जामणीक व सुरेश…

 ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे कल्याणमध्ये आयोजन

शिस्त, सलोखा आणि क्रीडाभावनेचा अद्वितीय संगम कल्याण : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली २५ व्या ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संत निरंकारी मिशनच्या वतीने मुंबई झोन अंतर्गत राजीव गांधी स्टेडियम, बेलापूर येथे १७, १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुंबईतील सेवादल क्षेत्र I ते VII, डोंबिवली, वसई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, खरसई (रायगड), नागपूर, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, चिपळूण आणि गोवा येथील एकूण २१ निवडक संघ सहभागी होत आहे. उल्लेखनीय म्हणजे निरंकारी सेवादल आणि श्रद्धाळू भक्तांमध्ये आध्यात्मिक चेतनेसह मानवी मूल्यांचा व क्रीडाभावनेचा विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे आयोजन केवळ स्पर्धात्मकतेपुरते मर्यादित न राहता, खेळाच्या माध्यमातून शिस्त, एकता आणि सलोखापूर्ण वातावरणाची निर्मिती व्हावी, या दिव्य हेतूने सन २००० मध्ये बाबा हरदेव सिंहजी यांनी मुंबई येथे या क्रिकेट स्पर्धेची पायाभरणी केली. सुरुवातीला सन २०११ पर्यंत ही स्पर्धा केवळ मुंबई परिक्षेत्रापुरती मर्यादित होती; परंतु सन २०१२ पासून या स्पर्धेचे महाराष्ट्रातील विविध झोनमध्ये आयोजन केले जाऊ लागले, ज्यामुळे अधिकाधिक सेवादल सदस्य आणि श्रद्धाळू भक्त या उपक्रमाशी जोडले गेले. मंडळाच्या नेरुळ सेक्टरचे संयोजक वसंत गोड यांनी माहिती देताना सांगितले, की या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा, मेंबर इंचार्ज (वित्त व लेखा) जोगिंदर मनचंदा तसेच मेंबर इंचार्ज (प्रचार-प्रसार) मनमोहन छाबडा यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतील. याशिवाय महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांची उपस्थितीही या सोहळ्याला अधिक विशेष बनवेल. निरंकारी स्पोर्ट्स कमिटी (महाराष्ट्र) तर्फे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व्यापक आणि सुनियोजित तयारी करण्यात येत आहे. हि स्पर्धा युवकांमध्ये आत्मिक जागरूकतेसोबतच मानवी मूल्यांचे संवर्धन तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार करणारे प्रभावी माध्यम ठरेल. या माध्यमातून सहभागी युवावर्ग दिव्य गुण आत्मसात करून केवळ संतुलित, सुंदर आणि यथार्थ जीवनच जगणार नाहीत, तर त्याचबरोबर आपल्या जीवनाचे वास्तविक मुख्य ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करतील.

राज्य अजिंक्य कॅरम स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी

नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे सुरु असलेल्या ६० व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुण्याच्या संघाने ठाण्याच्या संघाचा २-१ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. पुण्याच्या अनिल…

श्री मावळी मंडळ आयोजित ७३ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात

ठाणे – श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने १०१ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३ व्या राज्यस्तरीय  पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संस्थेच्या क्रीडानगरीत पार…

 भाईंदर पश्चिमेत अत्याधुनिक क्रीडा संकुलाचे लोकार्पण

तरुण खेळाडूंना आधुनिक सुविधांचा लाभ मिरा भाईंदर :- मिरा भाईंदर शहरातील भाईंदर ( प )येथील प.पु.ग. जैनाचार्य श्री विजय अभयदेव सूरिश्वरजी म.सा. महापौर डिंपल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आमदार नरेंद्र मेहता यांच्या शुभहस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. वास्तूमुळे भाईंदर पश्चिमेकेतील क्रीडाप्रेमींना नक्कीच फायदा होईल. या वास्तूची जबाबदारी देखील आपल्या सर्वांची आहे असे मत आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केले. मिरा भाईंदर शहरात या अगोदर शहरातील क्रीडा प्रेमी खेळाडू यांच्या करता फक्त एकच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होते. मात्र शहरातील क्रीडा प्रेमी यांना प्रोत्साहन देण्याकरता पालिकेच्या मार्फत भाईंदर पश्चिम येथे एक क्रीडा संकुल इमारत बांधण्याचा निर्णय २०१८ साली घेण्यात आला. २०१९ साली प्रत्यक्षात इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर क्रीडा संकुल क्रीडाप्रेमींसाठी आजपासून सुरु झाले आहे. भाईंदर पश्चिम येथे तयार करण्यात आलेल्या प.पु.ग.जैनाचार्य विजय अभयदेव सुरीश्वरजी म.सा. क्रीडा संकुल वं सभागृह इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३४८२.५० चौ.मी.इतके आहे. मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील भाईंदर पश्चिमेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगत असलेल्या अग्निशमन केंद्र इमारतीच्या जागेत कम्युनिटी हॉल, क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. याचा अंदाजित खर्च ४२ कोटी १२ लाख २ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये स्टील पार्किंग सह चार मजल्याचे आहे. यामध्ये पहिल्या मजल्यावर एक सभागृह, दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय, कॅरम, टेबल टेनिस, जिम,स्टोररूम व तिसऱ्या मजल्यावर स्क्वॉश कोर्ट, तायक्वांदो कोर्ट तसेच बॉक्सिंग कोर्टाची सुविधा देण्यात आली असून, चौथ्या मजल्यावर आधुनिक क्रिकेट टर्फ विकसित करण्यात आले आहे. अशा पद्धतीने इमारतीचे स्वरूप आहे. निमंत्रण पत्रिकेत राज शिष्टाचाराचा भंग या लोकार्पण सोहळ्याची महानगरपालिकेने निमंत्रण पत्रिका छापली होती. या पत्रिकेत परिवहन मंत्र्यांचे नाव आमदार आणि महापौर यांच्या खाली छापण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी या प्रकाराची तक्रार करणारी पत्र संबंधित यंत्रणाना पाठविली आहेत.