Month: June 2026

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी

 शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांचे केडीएमसी आयुक्त, महापौरांना पत्र कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील काही बांधकामांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या बांधकामांना आवश्यक परवानग्या आहेत का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांनी संबंधित बांधकामांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे.  तसेच ही बांधकामे अनधिकृत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर एमआरटीपी अर्थात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज आणि बांधकामांच्या वैधतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मासिक महासभेमध्ये नगरसेवक मंदारं हळवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अनधिकृत बांधकाम व अनागोंदी कारभाराबाबत तहकुबी ठेवलेली होती. या तहकुबी मध्ये दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचे मुख्य कारण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांचा अंधाधुंदी कारभार व अनधिकृत बांधकाम. या तहकुबी मध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामाबाबत नगरसेवक रोहन कोट यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, बाजार समितीच्या मंजूर नकाशामध्ये ८-४ येथे २० व्यापारी गाळ्याचे बांधकाम चालू आहेत. प्रत्यक्षात कृ. उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा ३० जानेवारी २०२४ येथे २० गाळे बांधण्याचा ठराव करण्यात आला व त्या अनुषंगाने ११ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या नगर रचना विभागाकडून बांधकाम परवानगी २० दुकाने प्लस, १८ ऑफिस अशी घेण्यात आली. हे कोट यांनी पिठासन अधिकारी, आयुक्त व सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नगर रचना विभागात माहिती घेतली असता संचालक मंडळाचा ठराव बांधकाम घेताना नगर रचना विभागाला दिलेला नाही. नगर रचना विभागाकडून ही बांधकाम परवानगी कोणत्या अधिकारात देण्यात आले याचा अहवाल येणाऱ्या महासभेच्या २ दिवस आधी देण्याची मागणी रोहन कोट यांनी केली आहे. तसेच हा विषय गंभीर असून या प्रकरणाची आपण कसून चौकशी करावी व ही बांधकाम परवानगी रद्द करावी, कृषी उत्पन्न बाजार समितीवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करून हे बांधकाम निष्कासित करण्याची मागणी नगरसेवक रोहन कोट यांनी केली आहे.

घरकामगार महिलांच्या स्वतंत्र महामंडळासाठी पाठपुरावा करणार -संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे – मुंबईसह विविध शहरांत असंघटीत कामगारांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. गेली अनेक वर्षे घरकामगार महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करत असून येत्या अधिवेशनात त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आग्रही मागणी करणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन यांच्यावतीने १६ जून रोजी श्रम सन्मान सोहळ्याचे आयोजन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. मंचावर संघटनेचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसूझा, आमदार संजय केळकर, कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील, असंघटित कामगार क्षेत्रातील अभ्यासक आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिसे तसेच जेष्ठ पत्रकार संजय शिंदे हे ही मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात उपस्थित घरकामगार बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाणे-मुंबईसह राज्यभरात लाखो घरकामगार असंघटित असून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास दुर्लक्षित झाला आहे. घर कामगार महिला या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून घरकाम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजना कशा देता येतील, त्यांच्या रोजच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. येत्या पावसाळी अधिवेशनात देखील मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी आग्रह धरणार आहे. जोपर्यंत हे मंडळ स्थापन होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन श्री. केळकर यांनी केले. इतर कामगारांप्रमाणे या महिलांना देखील किमान वेतन, भरपगारी साप्ताहिक, प्रासंगिक, आजारपणाच्या सुट्ट्या, भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा, विविध बँकांमार्फत कर्ज योजना, आरोग्य विमा, मातृत्व लाभ अनुदान, निवृत्ती वेतन आदी सुविधांचा लाभ या महिलांना मिळायला हवा यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असेही  केळकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय घरकामगार चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसोझा यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे यांनी समाजातील या घटकांच्या प्रश्नांची दखल फार कमी घेतली जाते, असे सांगितले. या लढ्यात नेहमीच आपल्या सोबत असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. सोहळ्यात घरकामगार महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर आदी भागातून घर कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका जांभळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन साधना मोरे यांनी केले.

– मालमत्तेला आपला मोबाईल क्रमांक जोडा, सवलतीची माहिती मिळावा

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा उपक्रम कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना मालमत्ता करात मिळणा-या सवलतींचा लाभ मिळण्यासाठी आणि मालमत्ता करासंदर्भात इतर माहिती उपलब्ध होण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी  हा मालमत्ता क्रमांकाशी नोंदणी  करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर Property KYC वर क्लिक करा आणि Property No नोंदवून, आपला मोबाईल क्रमांक  व ई-मेल आयडी अपडेट  करा. हि सुविधा  करदात्यांच्या सहकार्य व सहभागावर अवलंबून आहे. मालमत्ता करातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आजच नोंदणी करा. मोबाईल क्रमांक नोंदणीची सुविधा सर्व प्रभागात कार्यालयात देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी, या सुविधेचा लाभ घेवून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मालमत्ता कर विभागातर्फे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त मुंबई काँग्रेसचा शहरभर ‘वृक्षारोपण कार्यक्रम’.

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा देणारा दिवस आहे. १९ जून हा राहुल गांधी यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी मुंबई…

– पीटीकेएस जिम्नॅस्ट्सची दमदार कामगिरी

मुंबई महापौर करंडक स्पर्धा मुंबई : अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे १३ व १४ जून २०२६ रोजी झालेल्या मुंबई महापौर करंडक कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पीटीकेएसच्या मुला-मुलींनी उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल…

सत्तेसाठी लाचार खासदारांची लोकशाही व जनतेशी गद्दारी, विरोधक संपवण्याचा भाजपाचा खेळ – वर्षा गायकवाड

0000000000 मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली…

आगळ्या वेगळ्या मराठी कलावंत मल्लखांब कार्यशाळेचे बोरिवली येथे आयोजन

मुंबई- आंतरराष्ट्रिय मल्लखांब दिनाचे औचित्य साधुन‌ बोरीवली पश्चिम येथे आशिष देवल व संचिता देवल यांच्या संकल्पनेतून मल्लखांब लव संघ व बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संजय दळवी यांच्या…

नाल्याची तोडलेली संरक्षक भिंत पुन्हा बांधली

कल्याण:   डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये ‘पावसाळा तोंडावर… नाले सफाई अपूर्ण’ या संदर्भात बातमी आली होती. मिलापनगर मध्ये असलेल्या नाल्याची संरक्षक भिंत ही नाल्याची साफसफाई करण्यासाठी तोडण्यात आली होती. त्या नाल्यात मोठ्या…

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकात दोन अतिरिक्त खिडक्या-नरेश म्हस्के

०००००००००००००० ठाणे : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात. यावर्षीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त खिडक्या…

मासुंदा तलाव परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा – नितीन देशपांडे

अनिल ठाणेकर ठाणे : मासुंदा तलाव परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करा, अशी मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव व पोलीस आयुक्त आशतोष डुंबरे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे. मासुंदा तलाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १८ जून रोजी ‘धर्मराज्य पक्षा ‘च्या वतीने ई-मेलद्वारे निवेदन सादर करून मासुंदा तलाव परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून सदर निवेदनाची दखल घेऊन आवश्यक कार्यवाहीसाठी सदर प्रकरण उप पोलीस आयुक्त, झोन-१, ठाणे यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे ई-मेल द्वारे कळविण्यात आले होते. मात्र, अलीकडेच मासुंदा तलाव परिसरात घडलेल्या दुर्दैवी खुनाच्या घटनेनंतर पुन्हा एकदा या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर घटनेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून तलाव परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे. परंतु ही मागणी आजची नसून यासंदर्भात ठाणे न्यायालयाचे तत्कालीन संयुक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. देशमुख यांनी १९ जून रोजी दिलेल्या निकालामध्ये मासुंदा तलाव परिसरात सहा महिन्यांच्या आत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेकडून तसा ठराव देखील संमत केल्याची नोंद उपलब्ध आहे. मासुंदा तलाव हा ठाणे शहरातील अत्यंत गर्दीचा व नागरिकांची सतत वर्दळ असलेला सार्वजनिक परिसर आहे. दररोज मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, विद्यार्थी, पर्यटक तसेच सर्वसामान्य नागरिक येथे विरंगुळा, व्यायाम व विविध सामाजिक उपक्रमांसाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून सार्वजनिक सुरक्षेशी आणि नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणाशी संबंधित गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत घडणारी कोणतीही अनुचित किंवा गुन्हेगारी घटना नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण करू शकते. त्यामुळे या ठिकाणी प्रभावी व कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारणे ही संबंधित प्राधिकरणांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. तथापि, न्यायालयीन आदेशानंतर जवळपास अनेक वर्षांचा कालावधी उलटूनही सदर आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. परिणामी, तलाव परिसरात वारंवार घडणाऱ्या अनुचित घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकतीच घडलेली खुनाची घटना ही प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत झालेल्या दुर्लक्षाचे गंभीर उदाहरण मानावे लागेल. यापूर्वी दिनांक १८ जून २०२४ रोजी ‘धर्मराज्य पक्षा’ने आपणास निवेदनाद्वारे या विषयाकडे लक्ष वेधले होते. तरीही आवश्यक उपाययोजना न झाल्याने आणि त्यानंतर अशी गंभीर घटना घडल्याने संबंधित प्राधिकरणांनी न्यायालयाच्या आदेशाची अपेक्षित अंमलबजावणी न केल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मासुंदा तलाव परिसरात तात्काळ व कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा, ठाणे सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबाबत व न्यायालयीन निर्देशांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याच्या संदर्भात उपलब्ध कायदेशीर पर्यायांचा अवलंब करून संबंधित न्यायालयात पुन्हा दाद मागण्याचा विचार करावा लागेल. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण, कायद्याचे राज्य व न्यायालयीन आदेशांचा सन्मान या दृष्टीने आपण तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.