Month: August 2026

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा

 रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या…

 क्रिकेट बॉल्स मध्ये  ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ची मोठी झेप

 जुन्या बॉलचा कायापालट अकादमींचे बजेट वाचवणार! मुंबई, ३० जुलै: भारतातील क्रिकेटवेडाचा विचार करता प्रत्येक गल्लीबोळात आणि नामांकित अकादमींमध्ये दररोज हजारो क्रिकेट बॉल्स सरावासाठी वापरले जातात. मात्र, अवघ्या काही सत्रांतच हे महागडे बॉल्स खराब होऊन कचऱ्यात जातात. या समस्येवर मुंबईतील ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ (A३ Sports Craft) या कंपनीने एक भन्नाट आणि पर्यावरणपूरक तोडगा शोधून काढला आहे. कंपनीच्या ‘ए३ रीक्राफ्टेड’ (A३ ReCrafted) या उपक्रमांतर्गत वापरलेल्या जुन्या क्रिकेट बॉल्सवर अत्याधुनिक प्रक्रिया करून ते पुन्हा सरावासाठी ब्रँड न्यू बनवण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.  यात प्रथम  पृष्ठभागाची दुरुस्ती (Surface रेस्टोरेशन)म्हणजे  बॉलचे बाहेरील लेदर पुन्हा मजबूत केले जाते.यानंतर  “कोर स्टॅबिलायझेशन” (Core स्टॅबिलिझशन) म्हणजे  बॉलचा आतील कडक भाग आणि त्याचे वजन संतुलित केले जाते. त्यानंतर  “फिनिशिंग” (फिनिशिंग), यात  बॉलचा गोल आकार आणि सीमची कामगिरी पूर्ववत केली जाते, ज्यामुळे गोलंदाजांना सराव करताना मूळ मॅच बॉलसारखाच अनुभव मिळतो. “नवीन क्रिकेट बॉल्सच्या वारंवार होणाऱ्या खरेदीमुळे अकादमी आणि क्लबचे बजेट कोलमडते. ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’च्या या रीकंडिशनिंग मॉडेलमुळे क्रीडा साहित्यावरील खर्च ५० ते ६० टक्क्यांनी कमी होतो. ही वाचलेली रक्कम तळागाळातील खेळाडूंच्या विकासासाठी आणि चांगल्या पायाभूत सुविधांसाठी वापरता येऊ शकते” असे कंपनी व्यवस्थापनाचे मत आहे. हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही क्रांतिकारी ठरत आहे. स्पोर्ट्स साहित्यामध्ये ‘सर्कुलर इकॉनॉमी’ (Circular Economy) म्हणजेच कचरा कमी करून पुनर्वापराला प्रोत्साहन देण्याचे काम ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ करत आहे. यामुळे नवीन उत्पादनाची गरज कमी होऊन कार्बन फूटप्रिंट (Carbon Footprint) घटण्यास मोठी मदत होत आहे. हे रीकंडिशन केलेले लाल आणि पांढरे बॉल्स प्रामुख्याने फक्त सराव सत्रांसाठीच डिझाइन केले आहेत.  खेळाला शाश्वत (Sustainable) आणि स्मार्ट बनवणारा मुंबईतील हा उपक्रम आगामी काळात देशातील क्रिकेट कोचिंगचा चेहरामोहरा बदलणारा ठरू शकतो, यात शंका नाही. ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’च्या या रीकंडिशनिंग मॉडेलला सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलाच प्रतिसाद लाभतो आहे.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी देखील या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या चेंडूंच्या पुनर्वापरामुळे होणाऱ्या बचतीला मनापासून दाद दिली आहे. क्रिकेट बॉल्सच्या वाढत चाललेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना भारतीय क्रिकेटसाठी अधिकच तारक ठरू शकेल.  मुंबई क्रिकेट संघटनेने देखील या संकल्पनेचे कौतुक केले आहे. भारताचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित,  साबा  करीम, राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य सुरेंद्र भावे, माजी कसोटीवर करसन घावरी अशा बऱ्याच क्रिकेटपटूंनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून त्यांनी आपल्या क्रिकेट संघटना, क्लब आणि अकादमी साठी हे चेंडू स्वीकारण्यास सुरुवातही केली आहे. एम.सी.ए. सह महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन , मध्य प्रदेश क्रिकेट अससोसिएशन, सौराष्ट्र, विदर्भ या संघटनांनीदेखील क्रिकेटचे जुने चेंडू नवीन करण्याच्या प्रकल्पाला जोरदार प्रतिसाद दिला आहे.  लवकरच तळागाळातील सगळ्या क्लब आणि क्रिकेट अकादमी या प्रकल्पाचा लाभ उठवतील असा ए३ स्पोर्ट्स क्राफ्टला विश्वास आहे. ००००

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना दिलासा

 महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध –  मेघना साकोरे-बोर्डीकर रायगड-अलिबाग : महिलांना उद्योजक व आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत असून प्रत्येक महिला लखपती व्हावी, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पनवेल येथे सांगितले. महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. आमदार प्रशांत ठाकूर व अभिनेते-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, सातबारा उतारा आदी महसूल विषयक कागदपत्रांचे जलद वितरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या सक्षमीकरणासाठी तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राज्यात १० लाख नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असताना, रायगड जिल्ह्यातच सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांना समाधान शिबिरांचा लाभ मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासकीय योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मिनल भामरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत महसूल विषयक कामे तत्परतेने पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ००००

 डॉक्टर हल्ला प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्या अडचणी वाढल्या

न्यायालयीन कोठडीत १५ दिवसांची वाढ कल्याण: शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणी कमी होताना दिसत आहेत. कल्याण न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी आणखी १५ दिवसांसाठी वाढवली आहे. सोमवारी, रमेश म्हात्रे यांचा जबाब कल्याण न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात आला. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांना पुढील १५ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. या घटनेमुळे वैद्यकीय समुदायातही संतापाची लाट उसळली होती. रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची आणि रुग्णालयाच्या आवारात शिस्त राखण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांच्या तपासादरम्यान न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवल्याने आरोपी रमेश म्हात्रे यांच्या कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. पुढील १५ दिवसांत तपास कोणत्या दिशेने जातो आणि पोलीस या प्रकरणात कोणती नवीन तथ्ये उघड करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ आणि या घटनेशी संबंधित इतर पुराव्यांवरही या प्रकरणी चर्चा झाली. तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. ००००००

Heading – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली मॅरेथॉन स्पर्धा मार्गाची पाहणी

 स्पर्धा मार्गावरील आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनास सूचना ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २०२६ येत्या ३० ऑगस्टला उत्साहात पार पडणार असून या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मॅरेथॉन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली व स्पर्धा मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरूस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. या पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, नगरसेविका एकता भोईर, संध्या मोरे, विजया लासे, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे तसेच स्पर्धा मार्गावरील कार्यकारी अभियंता] ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सहसचिव राजेंद्र मयेकर, एकनाथ पोवळे आदी उपस्थित होते. मॅरेथॉनची सुरुवात ठाणे महापालिका भवन येथून होणार असून, महापौरांनी या प्रारंभस्थळाचीही पाहणी केली. यानंतर महापालिका भवन, नितीन कंपनी सर्व्हिस रोड, रोड क्रमांक १६, रोड क्रमांक २२, इंदिरानगर, वर्तकनगर, उपवन मार्ग, पोखरण रोड क्रमांक २, टिकूजीनीवाडी, उथळसर आणि कळवा या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली. प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सुविधा, वाहतूक नियंत्रण, रस्त्यांची गुणवत्ता आणि स्पर्धकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील बाबींची तपासणी करण्यात आली. महापौरांनी स्पर्धा मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. नितिन कंपनी सर्व्हिस रोड येथे जी कामे सुरू आहेत ती स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा संपेपर्यत बंद ठेवण्याबाबत संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या.  तसेच स्पर्धेच्या दिवशी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याच्या कडेला  उभी असलेली वाहने हटवून मार्ग  पूर्णपणे मोकळा ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या यावेळी स्पर्धा मार्गालगत झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून मार्ग मोकळा ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. तसेच वाहतूक पोलिसांनी स्पर्धेच्या दिवशी प्रभावी वाहतूक नियोजन करून मॅरेथॉन मार्ग निर्बध ठेवावा, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिल्या. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

शहरातील ११७ अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्सवर महापालिकेची कारवाई

ठाणे (०३) : ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागामार्फत शहरात अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्सविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत १ ते ३ ऑगस्ट २०२६ या तीन दिवसात विविध प्रभागसमिती हद्दीत…

मामाने मेहुणी सोबत लग्न लावून देण्यास नकार दिल्याने भाच्याने केले मामाच्याच मुलाचे अपहरण

 डोंबिवलीत बंद रिक्षात बाळाला सोडून भाचा फरार, कल्याण : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुंबई आणि डोंबिवलीत समोर आली आहे. मामाने लग्नाला विरोध करून सोयरिक मोडल्याच्या रागातून एका मूकबधिर…

कल्याण डोंबिवली नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात

शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्यांची चलती  मनपा प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव नसणारयांची खोगीर भरती    कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाचा नगररचना विभाग या ना त्या कारणाने वादाच्या भोवर्यात सापडत असल्याचा प्रत्यय पुनश्च आला आहे. तीन वर्ष सहाय्यक नगररचनाकार पदावर काम केलेल्या प्रतिनियुक्तीवर आलेला अधिकारी पुनश्च या महापालिकेत नगररचनाकार पदावर नेमणूक करण्यात आल्याने त्यांची सहाय्यक नगररचनाकार म्हणून ढिसाळ कामगिरी पाहता, नगररचनाकार पदावर नेमणूक कशी कोणाच्या अशिवार्दाने झाली. या मागचा सूत्रधार कोण, अशा आरोपाच्या चर्चा महापालिका वुर्तळात रंगल्या असल्याने नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पालिका वुर्तळात संचालक नगरचना संतोष डोईफोडे, सहाय्यक नगररचनाकार स्वप्नील दळवी यांची भ्रष्टाचाराची रात्रीस खेळ चाले ही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.  यांची खमंग चर्चा पालिका वुर्तळात धुमाकूळ घालत असताना स्वप्नील दळवी हे मागील तीन वर्ष सहाय्यक नगररचनाकार म्हणून केडीएमसीत कार्यरत होते. मागील तीन वर्षातील त्यांची सुमार कामगिरी पाहता, मनपाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी कोणतेही भरीव कामगिरी केली नाही, तरी देखील त्यांची बदली पुन्हा मनपात करण्यात आली आहे. यामध्ये  त्यांची मागणी मनपाने केलेली नसताना पुन्हा त्यांची वर्णी नगररचनाकार म्हणून नेमणूक होते.  यामागे संचालक नगररचना डोईफोडे यांचा अदृश्य हात आहे का असा गंभीर आरोप जाणकारांकडून होत आहे.  महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपा आयुक्त, सर्व साधरण सभेला असताना, मनपाच्या प्रशासकीय सेवेमध्ये दळवीसाठी  अशी मागणी संचालक नगररचना यांचेकडे कोणी केली   याबाबत संपूर्ण चौकशीपुर्ण होईपर्यंत दळवी यांना महापालिका सेवेमध्ये हजर करून घेण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे. डोईफोडे यांनी जर दळवी यांच्यासाठी मागणी केली असेल तर डोईफोडे यांना परत शासनाकडे पाठविण्यात यावे,अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे. केडीएमसी  नगररचना विभाग संचालक नगररचना संतोष डोईफोडे अकार्यक्षम असल्याच्या चर्चा होत आहेत. डोईफोडे यांचे सुरू असलेल्या कार्यकाळात मनपाचे नगररचना विभागाचे अर्थिक उद्दिष्ट २०० कोटींनी घसरले. वास्तु शिल्पकार व विकासक यांचे प्रस्ताव विहित कालावधीत मंजूर न झालेबाबत तक्रारी, बाह्यवळण रस्ता अथवा आरक्षणाच्या,भुसंपादनात दुर्लक्ष केल्यामुळे शहाराचा विकास भकास, मनपाच्या पैशाची उधळपट्टी सुमारे २५ कोटीची कामे ठाण्याच्या एकाच संस्थेस दिली. त्यांच्या कार्यकाळात नगररचना विभागात सर्वात जास्त प्रतिनियुक्तीवरील अधिकारी भरणा, सहाय्यक संचालक नगररचना यांच्यासह सर्वच अधिकारी यांना नवीन मनपा प्रशासनाचा अनुभव नाही. क्लस्टर योजना कागदावरच असून याची  अमंलबजावणी मात्र शून्य ठाण्यातील संस्थेस कंत्राट दिले संस्थेचे काम मात्र शुन्य. मनुष्यबळ नाही, तरी देखील कोट्यवधीची बीले, यातच भर म्हणून कलस्टर योजना अमंलबजावणीसाठी नगररचनाकार कृष्णा शिंदे या प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकारी यांची वर्णी लावली. संचालक पुणे नगररचना यांचेकडून महापालिका प्रशासानाचे सहाय्यक नगररचनाकार दळवी यांना नगर रचनाकार पद्दोतीने नेमणूक दिली असून डोईफोडे व दळवी यांचे भ्रष्टाचार व्हिडीओक्लिप काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाली होती. या सर्व चर्चा पाहता केडीएमसीचा नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला असून यासर्व वादग्रस्त कर्मचाऱ्यांबाबत स्थायी समिती अथवा महासभेने दखल घ्यावी अशी मागणी यानिमित्ताने जाणकारांकडून होत  असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत संचालक नगररचना संतोष डोईफोडे यांच्याशी दळवी यांच्या नगररचनाकार नियुक्ती  संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, हा सामान्य प्रशासनाशी निगडित विषय असून माझा संबंध असण्याचा प्रश्नच नाही. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता दळवी यांची नेमणूक सामान्य प्रशासन विभागाने केली नसल्याचे सांगितले.”

 वाहतूक कोंडीचा नाट्यप्रयोगाला फटका

तर बंद उपहारगृहामुळे नाट्यरसिकांची गैरसोय कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाजवळ असलेल्या आचार्य अत्रे नाट्यगृहात रविवारी झालेल्या ‘ऑल द बेस्ट’ या हाऊसफुल नाट्यप्रयोगाला शहरातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. सायंकाळी ४ वाजता सुरू होणारा प्रयोग कलाकार वाहतूक कोंडीत अडकल्याने सुमारे अर्धा तास उशिराने सुरू झाला. रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कलाकार वेळेत नाट्यगृहात पोहोचू शकले नाहीत. आयोजकांनी प्रेक्षकांना विलंबाची माहिती दिल्यानंतर रसिकांनी संयम राखत प्रतीक्षा केली. या प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. मात्र, नाट्यगृह परिसरात उपहारगृह व अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रेक्षकांची गैरसोय झाली. यामुळे वाहतूक नियोजनासह सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर हे कल्याण-डोंबिवलीसह बदलापूर, अंबरनाथ आणि परिसरातील नाट्यरसिकांसाठी प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या रंगमंदिरातील उपहारगृह गेल्या काही आठवड्यांपासून बंद आहे. यामुळे प्रेक्षकांची मोठी गैरसोय होत असून मध्यंतरात बाहेर जाऊन पाणी, खाद्यपदार्थ आणावे लागत आहे. विशेष म्हणजे, उपहारगृह चालविणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नवीन ठेका अद्याप कोणालाही देण्यात आला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ००००००

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीचे आमरण उपोषण मागे

 नगरसेवक शैलेश पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता आरती परब दिवा : दिवा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा तसेच त्यासंदर्भातील ठराव ठाणे महापालिकेच्या महासभेत तातडीने मांडून मंजूर करावा, या मागणीसाठी समाजसेविका सुवर्णा कांबळे आणि समाजसेवक सौरव अढांगळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची अखेर दुसऱ्या दिवशी सांगता झाली. शिवसेना उपशहर प्रमुख तथा नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषय ठाणे महापालिकेच्या महासभेत मांडण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल तसेच पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे लेखी आश्वासन शैलेश पाटील यांनी दिले. लेखी आश्वासनानंतर नगरसेवक शैलेश पाटील यांनी सुवर्णा कांबळे आणि सौरव अडागळे यांना नारळपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. त्यामुळे पुतळा उभारणीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे दिवा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ नेते एकनाथ भगत (बाबा) यांच्या सामाजिक आणि चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने दिव्यातील एका रस्त्याचे नामकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी तेव्हा ग्वाही देण्यात आली. या प्रसंगी अजित भगत, भालचंद्र भगत, विश्वास भालेराव, बालाजी कदम, गंगाधर गायकवाड, रवी कदम, सुनील कांबळे, भरत मोहिते, प्रवीण उतेकर, सरला गायकर, शिला बहिरूने यांच्यासह शिवसैनिक, आंबेडकरी चळवळीचे अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषण मागे घेतल्यानंतर समाजसेवक सौरव अडागळे आणि सुवर्णा कांबळे यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, आंबेडकरी संघटना, महिला मंडळे, शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि दिवा शहरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.