Category: होम

 नाशिकच्या पावसाळी पर्यटनाला बहर

आदिवासी भागातील ‘होमस्टे’मुळे स्थानिकांना रोजगार हरिभाऊ लाखे नाशिक: पावसाची एक सर कोसळली की नाशिककरांना वर्षा सहलीचे वेध लागतात. शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ, तर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा परिसरातील धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांनी फुलून जातात. या गर्दीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत असली, तरी आदिवासीबहुल भागातील स्थानिकांसाठी हा पावसाळा रोजगाराची नवी संधी घेऊन येत आहे. विशेषतः ‘होमस्टे’ संकल्पना, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांमुळे या भागातील पर्यटनाला वेगळी ओळख मिळत आहे. उन्हाच्या कडाक्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या पहिल्याच सरी वर्षा सहलीचे निमंत्रण घेऊन येतात. यंदा जूनमध्ये तुरळक पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही काळ पर्यटनावर परिणाम झाला असला, तरी मुसळधार पाऊस, धबधबे आणि निसर्ग अनुभवण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. नाशिक शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ आणि इतर पर्यटनस्थळांवर दर आठवड्याच्या शेवटी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम मका कणीस, भुट्टा, वडापाव, कांदा भजी, खारे शेंगदाणे आणि फुटाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रांग लागते. त्यामुळे लहान-मोठ्या विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे. त्र्यंबकेश्वरमधील आंबोली, वाघेरा घाट, कश्यपी धरण, हरसूलमधील दावलेश्वर, खैराई किल्ला, तसेच सुरगाणा परिसरातील भिवतास धबधबा, खोकविहीर येथील केळावण, तातापाणी, पिंपळसोड, भारुंडी आदी ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत आहेत. शहराच्या कोलाहलापासून दूर असलेल्या या आदिवासीबहुल परिसरात नाशिकसह मुंबई, पुणे आणि परराज्यांतील पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. दिवसभर निसर्गाचा आणि जैवविविधतेचा अनुभव घेतल्यानंतर आदिवासी कुटुंबांकडून त्यांचा पारंपरिक पाहुणचार केला जातो. त्यामुळे या सहलींना केवळ पर्यटन नव्हे, तर ग्रामीण आणि आदिवासी जीवनशैलीचा अनुभव अशीही ओळख मिळत आहे. नाशिकमधील काही पर्यटन व्यावसायिकांकडून या सहलींचे नियोजन केले जाते. त्याअंतर्गत आदिवासी बांधवांच्या घरांमध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली जाते. महिला बचत गटांकडून भोजनाची जबाबदारी सांभाळली जाते. पर्यटकांच्या पसंतीनुसार शाकाहारी किंवा मांसाहारी भोजनाची व्यवस्था केली जात असली, तरी बहुतांश पर्यटक शाकाहारी जेवणालाच पसंती देतात. भात, डाळ, उडीद डाळीचे भुजिया, नागलीची भाकरी, विविध रानभाज्या आणि स्थानिक पद्धतीचे पदार्थ यांचा समावेश असलेले अमर्यादित भोजन अवघ्या १२० ते १५० रुपयांत उपलब्ध करून दिले जाते.

स्वच्छता दूत फाउंडेशनतर्फे सफाई कामगारांना साहित्य वाटप

रमेश औताडे मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दूत फाउंडेशन व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कामगारांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मेंटॉर व डी आय सी सी आय च्या महिला विभागाच्या सदस्या सीमा कांबळे म्हणाल्या की, “स्वच्छता दूत फाउंडेशन गेल्या वीस वर्षांपासून सफाई कामगारांना न्याय मिळवून देत आहे.फाउंडेशनच्या समन्वयक मैत्रयी कांबळे यांनी सांगितले की, प्रशिक्षक पाखरे यांच्या फाउंडेशनने प्रशिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी दिल्या आहेत. काही खासगी कंपन्या सफाई कामगारांच्या प्रशिक्षणासाठी सुमारे ४० हजार रुपये शुल्क आकारतात. मात्र, स्वच्छता दूत फाउंडेशन हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत देत आहे. रत्नमाला राजगिरे, माया साबळे, रिबेका पाखरे, पल्लवी पाखरे, हबीब खान, लता गायकवाड, रामचंद्र गायकवाड यांच्यासह सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

 पीठासीन अधिकाऱ्यांचे अधिकारी वर्गाने मानले आभार मुंबई, दि.  (प्रतिनिधी) :महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ३ ऑगस्ट रोजी पदोन्नतीचे आदेश रवाना झाले असून अधिकारी वर्गाने त्याबद्दल पीठासीन अधिकारी तसेच सचिव यांच्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. पदोन्नती प्राप्त झालेल्या १८ अधिकाऱ्यांची नांवे आणि पदोन्नतीचे पद पुढील प्रमाणे आहे. पदोन्नतीनुसार उपसचिव पदाकरिता सीमा तांबे, पुष्पा दळवी आणि घननीळ देबडवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अवर सचिव पदाकरिता विनोद राठोड, कैलास पाझारे, जयश्री म्हात्रे, जीवन गावकर, पवन म्हात्रे आणि नेहा कोठारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अवर सचिव (समिती) पदासाठी नितीन अहेर, रविंद्र मेस्त्री आणि अलका पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कक्ष अधिकारी पदावर जान्हवी गमरे, दिनेश तरे, संतोष सुद्रिक, ज्योती कामतेकर, शुभांगी जगे आणि शितल मोरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.काल संध्याकाळी याबाबतचे आदेश विधान मंडळ सचिवालय, आस्थापना विभाग यांच्या मार्फत जारी करण्यात आले. ०००००

मिरा -भाईंदर मेट्रोच्या अखेरच्या टप्प्याची चाचणी सुरू

मिरा -भाईंदर: मिरा – भाईंदरच्या जनतेसाठी आनंदाची बातमी आली असून काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान या अखेरच्या टप्प्याची मेट्रो चाचणी सुरू झाली आहे.  मिरा -भाईंदर शहरातून मुंबईच्या दिशेने लवकरच मेट्रोला सुरुवात…

नवनिर्वाचित महाराष्ट्र शासन महसूल, नोंदणी व मुद्रांक विभाग, सह दुय्यम निबंधक कर्जत-१, जिल्हा- रायगड, भरत सूर्यवंशी यांचे, दैनिक बित्तंबातमीचे मुंबई, कोकण प्रतिनिधी अशोक गायकवाड यांनी सोमवारी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत…

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका कायम कटिबद्ध : शर्मिला पिंपळोलकर

अनिल ठाणेकर | ठाणे भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, परंपरा आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणेही सुलभ…

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक थेरपी सेंटर सुरू

अनिल ठाणेकर ठाणे-जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत पंचायत समिती भिवंडी मार्फत शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक बहुउद्देशीय संसाधन कक्ष (थेरपी सेंटर) नव्याने सुरू करण्यात आला.…

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कल्याण तालुका अध्यक्षपदी सोमनाथ मिरकुटे यांची नियुक्ती

कल्याण :  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कल्याण तालुका अध्यक्षपदी सोमनाथ मिरकुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस अविनाश जाधव,जिल्हा अध्यक्ष विधा वेखंडे, माजी…

राज्यातील परिचारिकांचे दोन तास काम बंद आंदोलन

मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी निदर्शने मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाचे सुधारित सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध ठप्प झालेली पदोन्नती प्रक्रिया या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत राज्यभर दोन तास काम आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम नसल्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नती पासून वंचित आहेत सुधारित आकृतीबंधास मान्यता न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती आणि पदभरती रखडली असून परिचारिका संवर्गावर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे, असे मत संस्थेच्या सल्लागार कमल वायकोळे यांनी व्यक्त केले आहे. रिक्त असलेली पदे त्वरित न भरल्यास तसेच परिचारिकांच्या संवर्गाच्या  रखडलेल्या पदोन्नतीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बृहन्मुंबई  राज्य सरकारी परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस कविता ठोंबरे यांनी दिला आहे. सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करावेत; सुधारित आकृतीबंधास त्वरित शासन मान्यता द्यावी; परिचारिका संवर्गातील सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी; रिक्त पदावरील  वरील सरळ सेवा भरती त्वरित सुरू करा; परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवाविषयक प्रश्नावर कालबद्ध निर्णय घेण्यात यावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. परिचारिका संवर्गाच्या या आंदोलनास बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गणेश बकशेट्टी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

 कल्याण- शिळफाटा वाहतूक कोंडीवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक

– अतिक्रमण, बेकायदा पार्किंगवर कारवाईचे निर्देश दिवा, दि. ४ ऑगस्ट (आरती परब): कल्याण- शिळफाटा ते देसाई नाका या परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कल्याण फाटा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात काल महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी डीसीपी शिरसाट यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच परिसरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यानंतर संबंधित अधिकारी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत वाय जंक्शन ते कल्याण फाटा, कल्याण फाटा ते देसाई नाका तसेच शिळफाटा ते महापे रोड या मार्गांवरील वाहतूक कोंडीची कारणे तपासण्यात आली. अनधिकृत अतिक्रमण, हातगाड्या, फेरीवाले, गॅरेज, हॉटेलसमोरील बेकायदा पार्किंग, सर्व्हिस स्टेशन तसेच महामार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, कचरा हटविणे आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे अडसर दूर करण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विविध विभागांनी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. यापूर्वीही कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत वाहतूक नियोजनाबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कल्याण-शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत असून, प्रशासनाने समन्वयाने काम करून नागरिकांना लवकरात लवकर वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीस माजी उपमहापौर तथा नगरसेवक रमाकांत मढवी, डीसीपी शिरसाट, पोलिस निरीक्षक (पीआय) आहेर, विभागप्रमुख निलेश पाटील, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सचिन भालेराव, कार्यकारी अभियंता अंजुम, मनसेचे शरद पाटील, विनोद वास्कर, साहिल पाटील, बापूराव मुंडे, गणेश मुंडे, रवी पाटील, संतोष पाटील, पंचक्रोशीतील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.