Category: होम

काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने…!

पेट्रोल -डिझेल -गॅस दरवाढीविरुद्ध सिंधुदुर्ग: पेट्रोल – डिझेल-गॅस दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘रद्द करा, रद्द करा,…

कांजूर डम्पिंगच्या विषारी विळख्यात ईशान्य मुंबई

पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे आयुष्य धोक्यात राजेंद्र साळसकर मुंबई : मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडने आता जागतिक स्तरावरही मुंबईची बदनामी केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस (UCLA) यांच्या २०२६ च्या STOP…

मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेत उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट

सरस्वती कन्या, श्री सह्याद्री, ओम युवा संघांची उपांत्य फेरीत धडक मुंबई : मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन मुंबई खो-खो संघटनेने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे २७ ते…

दिलीप सरांच्या क्रिकेट मधील योगदानाला भारतात तोडच नाही -अजिंक्य नाईक

१९ वर्षाखालील एच. डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक क्रिकेट स्पर्धा मुंबई : दिलीप वेंगसरकर सरांच्या क्रिकेट मधील योगदानाला भारतात तोडच नाही असे मुंबई क्रिकेट अससोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी म्हटले आहे.…

पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची विशेष तपासणी मोहीम

नवी मुंबईत ६६३ पाणी नमुन्यांची तपासणी; पाणी गुणवत्ता मानकांनुसार योग्य नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष पाणी गुणवत्ता…

रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”, “श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ” तसेच नादब्रह्म साधना मंडळ खारघर…

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण : जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि सत्यमेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य व मासिक पाळी जनजागृती विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व मुलींनी…

ठाणे महानगरपालिका व शेल्टर असोसिएट्सच्या वतीने   राजे श‍िवाजी विद्यालयात ‘मासिका महोत्सव’

ठाणे : जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएट्स संस्था आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य नगर येथील राजे शिवाजी शाळेत “मासिका महोत्सव” आयोजित करण्यात आला. मासिक पाळी…

माथेरानच्या ई रिक्षा स्टँडने घेतला मोकळा श्वास

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींची अनधिकृत टपऱ्यांवर धडक कारवाई मुकुंद रांजाणे माथेरान : मागील दोन ते तीन वर्षांपासून दस्तुरी ते टपाल पेटी नाक्यापर्यंत जागोजागी अनधिकृतपणे टपऱ्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र विद्रुपीकरण पहावयास मिळत आहे. पावसाळ्यात याच टपऱ्यांवर प्लास्टिक टाकण्यात येते त्यामुळे आपण एखाद्या ग्रामीण भागात आलो आहोत की काय असा भास पर्यटकांना झाल्याशिवाय राहत नाही. दिवसेंदिवस अशाप्रकारे वाढत्या टपऱ्या आगामी काळासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. इथले पर्यावरण त्याचप्रमाणे झाडी नष्ट होण्यास कारणीभूत ठरू शकतात ही बाब ओळखून नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी २८ मे  रोजी सायंकाळी स्वतः दस्तुरी येथील ई रिक्षा स्टँडवरील सर्व अनधिकृत टपऱ्या काढून टाकल्या आहेत. त्यामुळे रिक्षा स्टँड भोवती जो काही टपऱ्याचा गर्हाडा निदर्शनास येत होता तो काहीअंशी का होईना दूर करण्यात आला असूच ई रिक्षा स्टँडने मोकळा श्वास घेतला आहे. बहुतेक टपरी धारक हे परिसरातील असून काही वर्षांपूर्वी इथे स्थानापन्न झालेले आहेत. दस्तुरी पासून ते टपाल पेटीच्या नाक्यापर्यंत सर्वत्र ह्या टपऱ्या वाढत चाललेल्या आहेत. ई रिक्षा स्टँड ते अमन लॉज स्टेशन पर्यंत संपूर्ण रस्ता मोकळा झाल्यास पर्यटकांना, नागरिकांना चालणे सुलभ होऊ शकते. बाजारपेठ मधील मुख्य रस्त्यावरील सुध्दा जी काही हॉटेल धारकांनी विद्रुपीकरण केलेली आहेत ती सुद्धा वेळीच काढून टाकल्यास संपूर्ण भाग सुंदर आणि स्वच्छ राखण्यासाठी नगरपरिषदेला मदत होऊ शकते असे नागरिक बोलत आहेत. शासकीय अधिकारी वर्ग नियमितपणे दस्तुरी पासून आरामात ई रिक्षांची सुविधा उपभोगून येत असतात.परंतु डोळ्यासमोर दिसत असून सुद्धा ही अनधिकृत कामे हटविण्यास दिरंगाई करत होते. केवळ पगारापूरते कामे करणारी काही अधिकारी मंडळींची जबाबदारी असताना देखील बघ्याची भूमिका बजावत होते. अखेरीस स्वतः नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी ही अनधिकृत कामे दूर केली आहेत. 00000000

 “राजकारण बाजूला ठेवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!”

NEET घोटाळा नाशिकमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन हरिभाऊ लाखे नाशिक : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज दिनांक २९ मे २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकचे जिल्हाध्यक्ष मिहिर प्रमोद गजबे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतनजी गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा महासचिव विश्वनाथ भालेराव, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष रवी पगारे, दामोदर पगारे, राजू दादा दोत्रे, डॉ. अनिल कुरे, अमोल चंद्रमोरे, दीपक पगारे, युवराज मनारे, ताराचंद मोतमल आदी उपस्थित होते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने अनिकेत काशीद, आदित्य निरभवणे, सम्यक बच्छाव, श्रेयस अहिरे, विजय सावंत, पूर्वेश, यश जाधव, ऋत्विक जाधव, वैभव वानखेडे, सम्राट संघारे, प्रणव खंडीजोड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी बोलताना मिहिर गजबे म्हणाले, “पेपर फुटीच्या या सत्रामुळे देशातील अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा.” आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीने, “हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे आवाहन केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशातील सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा आर्थिक व मानसिक संघर्ष यावर पाणी फेरले गेले असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. NEET ची फेरपरीक्षा तात्काळ जाहीर करून ती पूर्णपणे विनामूल्य घेण्यात यावी. Public Examinations (Prevention of Unfair Means)…