Category: होम

दिव्यात लहान मुलांसाठीच्या ‘विटामिन ए’ औषधाचा तुटवडा

 ७ दिवसांत पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा शिवसेना शहरप्रमुख सचिन पाटील यांचा इशारा आरती परब दिवा : दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये आणि आशा वर्कर्स (ASHA Workers) कडे लहान मुलांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘विटामिन ए’ (Vitamin A) या औषधाचा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तीव्र तुटवडा जाणवत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन  पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी पत्र लिहून औषधांचा पुरवठा तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांमधील कुपोषण, अंधत्व रोखण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ठराविक अंतराने ‘विटामिन ए’ चे डोस देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा पुरवठा खंडित झाल्यामुळे दिव्यातील शेकडो गरीब व गरजू कुटुंबांतील लहान मुले या आवश्यक डोसपासून वंचित आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या नियमांनुसार बालकांमधील अंधत्व निवारणासाठी ‘विटामिन ए’ चा डोस वेळेवर मिळणे हा त्यांचा आरोग्यविषयक हक्क आहे, तसेच माता व बाल संगोपन औषधांचा साठा अखंडित ठेवणे स्थानिक प्रशासनाचे (महानगरपालिका) कर्तव्य आहे. दिव्यातील गरीब जनता पूर्णपणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असताना औषधांचा हा तुटवडा म्हणजे बालकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखा आहे, असे सचिन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. शिवसेना दिवा शहरातर्फे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या: १. दिवा प्रभाग समिती अंतर्गत सर्व आरोग्य केंद्र आणि आशा वर्कर्सना ‘विटामिन ए’ चा पुरेसा साठा पुढील ७ दिवसांच्या आत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. २. गेल्या तीन- चार महिन्यांपासून हा औषध पुरवठा का खंडित झाला, याची सखोल चौकशी करून संबंधित दोषी विभागावर त्वरित कारवाई करण्यात यावी. या गंभीर विषयावर प्रशासनाने सात दिवसांच्या आत सकारात्मक पावले उचलून पुरवठा सुरळीत केला नाही, तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि बालकांच्या हक्कासाठी प्रशासनाविरोधात पुढील प्रशासकीय व कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशाराही शिवसेना शहरप्रमुख सचिन पाटील यांनी दिला आहे. 000000000

 सार्वजनिक गटारांमधील वीज केबल तातडीने हटवा

 नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे टोरंट पॉवरला निवेदन दिवा : शहरातील सार्वजनिक गटारांमध्ये टाकण्यात आलेल्या विद्युत केबलमुळे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यास अडथळा निर्माण होत असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी टोरंट पॉवर लिमिटेडच्या व्यवस्थापकांना निवेदन देत गटारांमधील विद्युत केबल तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक गटारे ही पावसाच्या पाण्याचा निचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठीची सुविधा असून त्यामध्ये विद्युत केबल टाकल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडतो. परिणामी मुसळधार पावसात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच अपघात, साथीचे आजार आणि विद्युत सुरक्षेचे धोकेही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय गटारांमधून टाकलेल्या केबलमुळे ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना गटारांची नियमित साफसफाई, गाळ उपसा आणि पावसापूर्वीची देखभाल करण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात दिले आहे. त्यामुळे गटारांमध्ये कचरा आणि गाळ साचून पाणी तुंबण्याची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे भगत यांनी म्हटले आहे. ऍड. आदेश भगत यांनी टोरंट पॉवरने संबंधित यंत्रणांसोबत संयुक्त पाहणी करून सार्वजनिक गटारांमधून टाकण्यात आलेल्या सर्व विद्युत केबल तात्काळ हटवाव्यात किंवा पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यास अडथळा होणार नाही अशा सुरक्षित पर्यायी मार्गाने त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचे काम करण्यापूर्वी संबंधित सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेऊन तांत्रिक निकषांचे पालन करावे, अशीही सूचना त्यांनी केली आहे. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर प्राधिकरणांकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी दिला आहे. 00000

ठाण्यातील झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या पांडुरंग भुवड यांना शिवसेनेचा मदतीचा हात

ठाणे – ठाण्यात वृक्ष कोसळून मृत्युमुखी पडलेल्या पांडुरंग भुवड यांचा गुरुवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले – जाधव यांनी…

 टॉर्चच्या प्रकाशात डॉक्टरांनी केली यशस्वी प्रसूती

 डॉ.प्रीती करवंदे आणि डॉ. उत्कर्षा मनवर यांचे कौतुक अशोक गायकवाड रायगड-कर्जत : मुसळधार पावसामुळे मोहिली (ता. कर्जत, जि. रायगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजता एक…

 पावसाळा कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे

 महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे सर्व अधिकाऱ्यांना निर्देश ठाणे (09): ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती सहायक आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत सर्व सहायक आयुक्तांना…

 डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भाल टेकडीवर वृक्षारोपण

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानांतर्गत लावण्यात आली १५०० झाडे कल्याण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या तर्फे व पद्मडॉ. दत्तात्रय धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त कल्याण पूर्वेतील भाल टेकडी, भाल क्रिकेट मैदान, भाल गांव याठिकाणी  वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत एकूण १५०० झाडे लावण्यात आली. या अभियाना अंतर्गत प्रामुख्याने दीर्घायुषी व जास्त ऑक्सिजन देणाऱ्या भारतीय वृक्षांची लागवड केली आहे. या झाडांमुळे परिसरातील जैवविविधता वाढण्यास मदत होईल. अभियानास केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, उद्यान निरीक्षक तथा उपायुक्त संजय जाधव, बदलापूर वनविभाग अधिकारी संजय धारवणे, राजू शिंदे, वैभव वाळिंबे, वृक्ष प्राधिकरण समिती अध्यक्ष तथा नगरसेवक किरण भांगले, कल्याण वनविभाग अधिकारी निलेश आखाडे, आमदार राजेश मोरे, माजी आमदार नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेवक निलेश खंबायत, कैलाश जोशी, पल्लवी जोशी, स्वप्नाली केणे, आकांक्षा भोईर, माजी नगरसेवक प्रकाश तरे, जगदीश तरे, मनविसे कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे तसेच भाल गावातील नागरिक, श्रीसदस्य, लोकप्रतिनिधी यांचा समावेश होता.

माथेरानमध्ये काहीअंशी का होईना रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात

बातमी इम्पॅक्ट मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानमध्ये पावसाळ्यात नालेमय बनलेल्या रस्त्यावरून पायी चालत जाणे किंवा ई रिक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणे अत्यंत जिकिरीचे बनले होते.त्यामुळे ९ रोजी प्रसिद्ध…

कल्याण पूर्वेत दरड कोसळून घर जमीनदोस्त

सुदैवाने जीवितहानी टळली; कुटुंब बेघर, प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन कल्याण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील टेकडीचा काही भाग अचानक खचला. टेकडीवरून कोसळलेल्या माती…

नद्यांमध्ये गाळ काढल्याने पूर पातळी नियंत्रणात – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री, काळ, पाताळगंगा, अंबा आदी महत्वाच्या नद्या वाहतात. ऐन पावसाळ्यात या नद्यांमधील गाळामुळे पाण्याची पातळी धोकादायक रीतीने वाढून यातील पाणी नदीकाठच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये, शहरामध्ये…

पावसाळ्यात कोसळणारी झाडे वाचविण्यासाठी वैज्ञानिक वृक्ष-व्यवस्थापनाची गरज

देशी वृक्षप्रजातींना प्राधान्य देण्याची मागणी अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे शहरात पावसाळा सुरू होताच झाडे उन्मळून पडणे, मोठ्या फांद्या तुटणे आणि त्यामुळे वाहतूक तसेच जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.…