Author: bittambatami.com

अनधिकृत बांधकामाविरोधात घणसोली ‍विभागामार्फत कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त…

सहाय्यक आयुक्त रूपाली कदम यांचा सत्कार

रमेश औताड मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के-उत्तर विभागाच्या  सहाय्यक आयुक्त रूपाली कदम यांची सदिच्छा भेट घेऊन विभागातील विविध विकासकामे तसेच नागरिकांना महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष युवक सचिनभाऊ लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष गोसोद्दीन शेख आणि तालुका सदस्य जिब्रान शेख यांच्या वतीने  रूपाली कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या समस्या, विकासकामांची गती आणि महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी सकारात्मक चर्चा झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त रूपाली कदम यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत के-उत्तर विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी वॉर्ड क्र. ७९ युवक अध्यक्ष नितीन लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ०००००००००

शुक्ला कंपाउंड रहिवाशांना मिळवून दिला न्याय ; माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा सत्कार                                             

मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  दहिसर येथील शुक्ला कंपाऊंड येथील रहिवाशांना न्याय मिळवून दिला आणि त्यांना बेघर होण्यापासून वाचवले. याबद्दल माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा दहिसर च्या आमदार मनीषा चौधरी यांच्या शुभहस्ते…

गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी नाशिक सज्ज

हरिभाऊ लाखे नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. याच पार्श्वभूमीवर गर्दीचा अंदाज, भाविकांची हालचाल, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा निरीक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद या सर्व बाबींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याबाबत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या समन्वय बैठकीत चर्चा करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान कोट्यवधी भाविकांचे आगमन लक्षात घेता गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पावले उचलली आहेत. यासाठी विविध विभागांना एका एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर आणण्याचे नियोजन करण्यात येत असून, यासंदर्भात आंतरविभागीय समन्वय बैठक झाली. विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहर पोलिस, ग्रामीण पोलिस, नाशिक परिक्षेत्र पोलिस, महामार्ग वाहतूक पोलिस, नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, आयआयएम नागपूर, ईवाय मोबिलिटी टीम, पीडब्ल्यूसी टीम तसेच संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पीडब्ल्यूसीकडून प्रस्तावित तंत्रज्ञान आराखडा आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे नव्हे तर एकात्मिक पध्दतीने काम करणे NASHIK SHANEY आवश्यक आहे. रिअल टाइम माहिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागांमधील समन्वय यामुळे गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि भाविकांना सुविधा पुरविणे अधिक प्रभावी होईल. त्यादृष्टीने सक्षम आणि भविष्यातील गरजा लक्षात घेणारी यंत्रणा उभारण्यावर भर आहे. बैठकीत साधुग्राम नियोजन, घाट व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था, मंगल कार्यालये व इतर सुविधांचे नियोजन, पोलिस दलाची तयारी, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

तूर प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी : सन २०२६-२७ च्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत तूर पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले…

उद्योगपती कान्हाशेठ ठाकूर यांचे अल्पशा आजाराने निधन

अशोक गायकवाड पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सख्खे चुलत बंधू आणि आमदार प्रशांत ठाकूर व परेशशेठ ठाकूर यांचे काका, प्रसिद्ध उद्योगपती कान्हाशेठ ठाकूर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे जन्माला आलेल्या कान्हाशेठ ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगधंद्यात जम बसविला. एकेकाळी मचव्यातून रेती व्यवसाय करीत असलेले कान्हाशेठ ठाकूर आज रेल्वेमधील प्रसिद्ध ठेकेदार म्हणून गणले गेले. न्हावा ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या निर्भिड स्वभावाप्रमाणे त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. उद्योगधंद्यात नावारुपाला आल्यानंतर अनेक गरजूंना त्यांनी उदारहस्ते मदत केली. देवभोळे असल्यामुळे अनेक धार्मिक कार्यांना, मंदिरांनाही त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. उद्योगधंद्यात कार्यरत असताना आपल्या न्हावेखाडी गावाकडे त्यांचे नेहमीच लक्ष असायचे. उद्योगव्यवसायात त्यांची मुले, सागरशेठ ठाकूर, सम्राट ठाकूर, रोशन ठाकूर, जावई अल्केश बैकर त्यांचा वारसा चालवत आहेत. कान्हाशेठ यांच्या पश्‍चात धर्मपत्नी देवकाबाई (बाय) ठाकूर, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे आणि मोठा ठाकूर परिवार आहे. कान्हाशेठ ठाकूर यांच्या पार्थिवावर न्हावेखाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, कृष्णाशेठ ठाकूर, नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, प्रवीण पाटील, मधु पाटील, नरेंद्र ठाकूर, वासुदेव पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, उद्योगपती विजय जाधव कडू, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, सुनिल म्हसकर, चेतन उर्फ भायाशेठ म्हात्रे, संजय पाटील, हरिश्‍चंद्र पाटील यांच्यासह नातेवाईक आप्तेष्ट, मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

 मिलापनगर तलावातील हजारो मासे मृतावस्थेत

Unit-६ कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी व ऑक्सिजन कमी झाल्याने मासे झाले मृत कल्याण :  डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील मिलापनगर तलाव म्हणजे पूर्वीचा गणेश विसर्जन तलावात गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मरून ते पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हे मासे कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी खराब व ऑक्सिजन कमी झाल्याने मृत पडत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे.  अजूनही या तलावात हजारोंनी अनेक जातींचे मासे आणि कासवे जिवंत असून त्यांना वाचविले गेले पाहिजे. त्यासाठी तातडीने उपाययोजना केडीएमसीच्या स्वच्छता आणि पर्यावरण विभागाने करणे आवश्यक आहे. या  तलावातील हजारो मासे मरत असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून केडीएमसी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी येऊन तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम चालू केले आहे. ५ जून पर्यावरण दिन हा सर्वत्र साजरा करतांना असे तलावातील मासे मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरण प्रेमींनी खंत व्यक्त केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी कल्याणच्या प्रसिद्ध काळा तलावातील मासे मृतावस्थेत आढळले होते. असे तलावातील मासे का मृतावस्थेत आढळत आहेत याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पण याची तपासणी करून माहिती घ्यावी. याच मिलापनगर गणेश विसर्जन तलावात काही वर्षापूर्वी असेच मासे मेले होते. मिलापनगर रेसिडेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि डोंबिवली वेलफेअर असोसिएशन यांनी केलेल्या याचिकानुसार राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाने गेल्या दहा वर्षापासून या तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी आहे. या तलावाची नियमित साफसफाई होताना दिसत नाही. काही नागरिक यात निर्माल्य आणि कचरा टाकत असल्याने तलावातील पाणी अस्वच्छ, खराब होत असते. बऱ्याच वर्षात या तलावातील गाळ काढला गेला नाही आहे. हा तलाव जर जिवंत ठेवायचा असेल तर येथे एक कायमस्वरूपी सुरक्षारक्षक, साफसफाई कर्मचारी ठेवावा, सीसी कॅमेरे बसवावेत, नियमित साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जर या तलावाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर काही दिवसांनी हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केडीएमसीचे कार्यतत्पर उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  रामदास कोकरे यांनी या तलावाच्या साफसफाई आणि नागरिकांच्या मागणीवर जरूर विचार करावा तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी यांनी या तलावातील पाण्याचे आणि मृत माशांची प्रयोगशाळेत तपासणी करून आलेल्या अहवाल प्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे. ०००००००००

मध्य रेल्वेची युनियन बँकेवर मात

१५ वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा २०२६ मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) एलिट पुरुष गटाच्या सामन्यात मध्य रेल्वेने युनियन बँक ऑफ इंडियावर २-१ अशी मात…

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे शिवसेनेवर पीएचडी करुन डॉक्टरेट मिळविणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अकोला जिल्हा महिला संघटक डॉ. सरिता विजय वाकोडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे…

महापौर नितीन पाटील यांनी केली पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पाहणी

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी गुरुवारी प्रभाग क्रमांक १४ मधील विविध ठिकाणी नालेसफाई व पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच नाल्यांमधील गाळ व अडथळे तातडीने दूर करण्यात यावेत, यासाठी महापौरांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत कामांची गुणवत्ता आणि गती यावरही त्यांनी भर दिला. प्रभागातील विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी भाजपाचे चारही उमेदवार सातत्याने पाठपुरावा करत येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले. या पाहणी दौऱ्यावेळी पनवेल भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष सतिश पाटील, माजी नगरसेवक गणपत म्हात्रे, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, भाजपा पनवेल मंडल सरचिटणीस रुपेश नागवेकर, उपाध्यक्ष अतुल भगत, प्रभाग अध्यक्ष गणेश म्हात्रे, भाजपा नेते शैलेश म्हात्रे, रोहीत आठवणे, रुपेश आंबोलकर, अभिजित जाधव, सचिन गमरे, युवा मोर्चा अध्यक्ष कुणाल पाटील व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिका अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी सांगितले कि, प्रभाग १४ मधील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महापौर नितीनभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव जनतेसोबत उभा आहे.