Author: bittambatami.com

ठाण्यात ‘आशाये’ पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात

प्लास्टिक मुक्तीसाठी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा पुढाकार सिद्धेश शिगवण ठाणे :जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने “आशाये” हा पर्यावरणपूरक आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेण्यात आला…

अमृत महोत्सवी मोहिते ट्रॉफी शालेय कॅरम स्पर्धा १ जूनला

मुंबई :  आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे अमृत महोत्सवी क्रीडापटू गोविंदराव मोहिते ट्रॉफी १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा १ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. परेल…

माथाडी नेते निवृत्ती धुमाळ यांचा हीरक महोत्सवी वाढदिवस उत्साहात

मुंबई : निवृत्ती धुमाळ यांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त कामोठे येथील दत्तूशेठ पाटील आंतरराष्ट्रीय शाळेत अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. सामाजिक, राजकीय, कामगार, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला…

 टिटवाळा स्टेशन परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई

५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल कल्याण : टिटवाळा स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन याविरोधात स्वतंत्र वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या तब्बल ४० दुचाक्यांवर कारवाई करण्यात आली असून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकावर, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणाऱ्या चार जणांवर तसेच विनायूनीफॉर्म वाहन चालविणाऱ्या सात वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत एकूण ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक शाखेकडून टिटवाळा स्टेशन परिसरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. बी. घोरपडे, पोलीस शिपाई निलेश मोरे, पोलीस शिपाई अमित पवार आणि महिला पोलीस शिपाई वैशाली ढेरे यांनी ही कारवाई केली. स्टेशन परिसरातील बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, टिटवाळ्यासह ठाणे ग्रामीण परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष ॲड. जितेंद्र जोशी यांनी सातत्याने लावून धरली होती. वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारा शहर विस्तार, स्टेशन परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ००००००००

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात माजी पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरु’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, सुरक्षा अध‍िकारी घनश्याम फर्डे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 दिव्यातील वीज समस्येने नागरिक त्रस्त

स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी दिवा, दि. २७ मे : कडक उन्हाळ्यात दिवा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. उकाड्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत असून स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिव्यात वाढत्या वीज चोरीचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण येत असून त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पूर्ववत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे मोठ्या लोकवस्तीच्या भागासाठी एकाच ट्रान्सफॉर्मरवर भार असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती वारंवार करावी लागत आहे. दिव्यातील काही भागात दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याच्या वेळेतही वीजपुरवठा बंद होत असल्याने अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित वीज कंपनीने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दिवेकरांकडून जोर धरत आहे. ०००००००

 सानवी तिडकेचा चुरशीच्या लढतीत विजय

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई, २७ मे: वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींमध्ये सानवी तिडकेने चुरशीच्या लढतीत पहिला…

एसआयआर प्रक्रियेवर लक्ष ठेवा- वर्षा गायकवाड

एकाही मुंबईकराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई : लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू नये, यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवावी व एकाही मुंबईकराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा स्पष्ट सुचना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. राजीव गांधी भवन येथे खासदार वर्षा गायकवाड यांनी एसआयआर प्रक्रियेसंदर्भात मुंबई क्षेत्रातील जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुंबई काँग्रेसच्या फ्रंटल संघटना आणि सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते. बैठकीत शहरातील एसआयआर प्रक्रियेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांना कोणत्याही कारणामुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी बीएलए कार्यकर्ते घेत असलेल्या विविध उपाय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील काळात  संघटित पद्धतीने काम करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. लोकशाही मजबूत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाचा मताचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला आहे. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणे आणि सरकारला जाब विचारणे ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्याबरोबर जनतेच्या प्रश्नावर विविध आंदोलने करण्याच्या सुचनाही खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली. ००००००००

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, वझिरा येथे NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न

मुंबई : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, वझिरा यांच्या वतीने संघातील ज्येष्ठ सभासदांसाठी NCMC कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फेस्काम मुंबईचे अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने हे…

येऊरमधील अनधिकृत बंगले पुन्हा चर्चेत

अनधिकृत नळजोडणी, बंगल्याची वन विभाग आणि महापालिकेकडे कागदोपत्री नोंदच नाही ठाणे : येऊर आणि अनधिकृत बंगले यांची सांगड जुनीच आहे.  अनधिकृत नळ जोडणी, स्विमिंग पूल आणि महिन्याला हजारो रुपयांची कमाई करून देणाऱ्या बंगल्याची महापालिका सोडाच पण आदिवासींच्या वन जमिनीवर बांधलेल्या बंगल्याची वन विभागाकडे कुठलीही कागदोपत्री नोंदच नसल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. सर्वश्री गणेश टाक, गौतम मोरे, संजय पडवळ आणि हितेश राठोड या चौघा मित्रांनी २०१०-११ दरम्यान वन विभाग शेणाचा पाडा येथील जागा भूमापन क्र न स ७ उपविभाग १५(७/१७) ही १० गुंठे  जागा विकत घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी गणेश टाकने हितेश राठोडला त्याचे पैसे परत दिले. यादरम्यान घेतलेल्या जमिनीत भराव टाकून त्याठिकाणी बोअर वेल, वृक्षारोपण केले होते. नंतर गणेश टाकने इतर दोघांना डावलून त्याठिकाणी जलतरण तलाव असलेल्या हेरंब फार्म नावाचे पक्के अनधिकृत बांधकाम केले. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या पाणी विभागाचा कंत्राटदार असलेल्या गणेश टाकने या फॉर्ममध्ये १इंची पाण्याची पाईप लाईनही जोडून घेतली. बेकायदेशीर असलेला हा फॉर्म शनिवार – रविवार भाड्याने देऊन महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहे. या बंगल्यासंदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता, या बंगल्याची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचे ठाणे महापालिका आणि वन विभागाने लिहून दिले आहे. महापालिकेचा हजारो रुपयांचा महसूल बुडवणारा गणेश टाक हा महापालिकेचा कंत्राटदार असल्याने त्या बंगल्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.