Category: होम

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी सदस्यांनी २२ अतिकुपोषित मुलांना घेतले दत्तक

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन, पदाधिकारी आणि सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.जिल्ह्यातील तीव्र कुपोषित (SAM) श्रेणीतील मुलांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याची जबाबदारी आता या…

नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांना पेन्शन लागू करा

रमेश औताडे मुंबई : मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन हे लोकशाहीच्या हिताचे तर होतेच, पण ते आणीबाणीपेक्षाही अधिक भयानक होते. वर्तमान शासनाने ‘मिसा’ कायद्यानुसार आणीबाणीच्या काळात जेलमध्ये राहिलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर लोकशाही आणि अस्मितेसाठी तब्बल सोळा वर्षे संघर्ष करणाऱ्या नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांनाही शासनाने पेन्शन घोषित करून त्यांचा सन्मान करावा, असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. नामांतर शहीद भीम सैनिक दिनानिमित्त इंदौरा, १० नंबर पूल येथील शहीद स्मारकात आयोजित मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुधा जनबंधू यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी दामू दादा कावरे, प्रवीण आवळे, प्रा. रमेश दुपारे, चरणदास गायकवाड, राजू कांबळे, जयदेव चिंवडे, वैशाली तभाने, नरेश खन, विद्यानंद गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

 सुनेत्रा पवार प्रकरणावर नाशिकमध्ये राजकीय रणकंदन

 काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा हरिभाऊ लाखे नाशिक: राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा उल्लेख समाजमाध्यमांवरील एका चित्रफितीत ‘गुंगी गुडिया’ असा करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर आंदोलकांनी काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या राजकीय घडामोडींमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपला मोर्चा महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे वळवला. आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. या आंदोलनात आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, भगूर नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, दिलीप खैरे यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चा एम. जी. रोडवरून पुढे सरकत असताना पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, काँग्रेसने ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्यातील सर्व महिला सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. दरम्यान, आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या गदारोळात आमदार अहिरे काँग्रेस पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचल्या, तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. वातावरण तणावपूर्ण होताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. यावेळी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाने राष्ट्रवादीचे हसू झाले… राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने काँग्रेस पक्ष कार्यालयावर मोर्चा काढून स्वतःचेच हसू करून घेतले आहे. त्यांनी आमच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी नाशिककरांच्या प्रश्नांवर, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवर आणि त्यात अनेक नागरिकांना गमवावे लागलेल्या जीवांच्या जबाबदारीचे भान ठेवून महानगरपालिकेवर मोर्चा काढला असता, तर त्यांचे हसू झाले नसते. त्यांना बुद्धी मिळो, हीच माफक अपेक्षा. — निलेश (बबलू) खैरे, अध्यक्ष, नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, नाशिक ०००००

अतिरिक्त आयुक्तपदावर मनिष जोशी, गजानन गोदेपुरे यांच्या शिफारशीवर आक्षेप

 नियमबाह्य असल्याचा नारायण पवार यांचा आरोप ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासाठी विद्यमान उपायुक्त मनिष जोशी आणि गजानन गोदेपुरे यांच्या नावांची सर्वसाधारण सभेतून करण्यात आलेली शिफारस नियमबाह्य असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.…

 टिटवाळ्यात शाळेसमोरच जीवघेणा खड्डा

केडीएमसीच्या ढिसाळ कारभाराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर कल्याण : टिटवाळ्यातील हरी ओम व्हॅली सोसायटीजवळील ओम संकुल परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. विवेकानंद इंग्लिश हायस्कूलच्या भिंतीलगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने भला मोठा खड्डा खोदून ठेवला असून, या धोकादायक कामामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून अगदी लगतच गटार उपलब्ध असतानाही पावसाचे पाणी त्यामध्ये वळविण्याऐवजी रस्त्यालगत खोल खड्डा खोदण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. त्याचबरोबर पालक, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने त्याची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे एखादा विद्यार्थी, पालक किंवा दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू करताना कोणतीही सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेली नाही. खड्ड्याभोवती संरक्षक कठडे, इशारा फलक किंवा रात्री परावर्तित होणारी सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा परिसर अधिक धोकादायक बनला आहे. शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकारी हरून इनामदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, “करतो… पाहतो… माणूस पाठवतो…” अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही दुरुस्ती अथवा सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, हा धोकादायक खड्डा तातडीने बुजवून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी शाश्वत व्यवस्था करावी, तसेच या निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज व्यक्त करत, “प्रशासनाला जाग येण्यासाठी एखादा निष्पाप जीव गमवावा लागणार आहे का?” असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. ०००००००

 ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम राबवण्यात यावे – आदिती तटकरे

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे: शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तू शासकीय कार्यालये व वसतीगृहांमध्ये सहज उपलब्ध झाल्यास नोकरदार महिलांना मोठा…

ठाण्यात प्रथमच ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान

००००००००० ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृतकालातील ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आशीर्वाद फाऊंडेशन, ठाणे यांच्या वतीने “राष्ट्रजागृती : आव्हाने, समाधान आणि सनातन धर्म” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी…

‘१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लॉकलमध्ये सयंचलित दरवाजे बसवावे’

 स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा – नरेश म्हस्के अनिल ठाणेकर ठाणे : केंद्रीय कामकाजाच्या नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. नरेश म्हस्के हे निवडून आल्यापासून मुंबई आणि ठाणे उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी संसदेत आवाज उठवत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी संसदेचे कामकाज गोंधळ घालून ठप्प केले आहे. आज खासदार नरेश म्हस्के यांना संसदेत बोलायची संधी मिळताच त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासावर आवाज उठविला. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) अंतर्गत ५७ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झालेली आहे. उपनगरीय रेल्वेच्या स्थितीत अजूनही सुधारणा करणे गरजेचे आहे. २०२४ मधील आकडेवारीनुसार अतिगर्दी, रेल्वे रुळ ओलांडणे आणि रेल्वेतून पडण्याच्या घटनांमुळे हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. सध्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा चारपट अधिक प्रवासी प्रवास करत असल्याने ‘सुपर-डेन्स क्रश लोड’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, दरवाज्यांवर लटकून प्रवास करणे आणि अपघात होणे ही नियमित बाब बनली असल्याचे नरेश म्हस्के यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिले. संसदीय समित्या आणि न्यायालयांच्या स्पष्ट निर्देशांनंतरही १५ डब्यांच्या गाड्यांचा विस्तार, स्वयंचलित दरवाजे, फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे यांसारख्या मूलभूत सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने होत असल्याची खंतही नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून सर्व १२ डब्यांच्या लोकलचे टप्प्याटप्प्याने १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करावे, सर्व रेकमध्ये ऑटो-डोअर क्लोजिंग सिस्टीम अनिवार्य करावी तसेच स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निगराणी यंत्रणा उभारावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. भविष्यात अशा दुर्दैवी मृत्यूंना आळा घालण्यासाठी या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचेही  नरेश म्हस्के यांनी  स्पष्ट केले.

 दिवा पोलीस स्टेशन कधी सुरू होणार? इमारत तयार, तरीही नागरिकांना मुंब्र्याची वारी!

 वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी आणि अपुरे पोलीस बळामुळे दिवेकर त्रस्त; रात्रीच्या वेळी तक्रार करण्यासाठी मोठी अडचण दिवा, दि. ५ ऑगस्ट (आरती परब) -दिवा शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या…

आरक्षणासाठी मराठ्यांचे वादळ दिल्लीत धडकणार

रमेश औताडे मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने ९ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मराठ्यांचे वादळ धडकणार असून आता आर या पार ची लढाई दिल्लीत लढणार.  असा इशारा  अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. मराठा समाज ३५ वर्षे संघर्ष करत आहे.  मात्र न्यायालयीन कसोटीवर टिकेल असे कायमस्वरूपी आरक्षण देण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. वेळोवेळी सरकारने मराठा समाजाला आश्वासन दिले होते. प्रत्येक वेळी आनंदोत्सवही साजरा केला; मात्र आरक्षणाचा प्रश्न आजही कायम आहे. नानासाहेब जावळे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या भावना अधिक काळ दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे आम्ही सरकारला मुदत दिली आहे. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होण्याअगोदर आरक्षणाचा योग्य निर्णय घ्यावा. सरकारने जर गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहिले नाही तर, देशातील मराठा समाजबांधवांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. भीमराव मराठे, लक्ष्मण शिरसाठ, पंजाबराव काळे, राहुल पाटील आदी समाजबांधव यावेळी उपस्थित होते.